हर्ट यांचे रंगीबेरंगी पान

प्रहर

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

शून्य शहर.. शून्य प्रहर
शून्य मनाच्या भोवती...
... काळोखाने वेढले आहे!!

एक एक तारका निखारा आहे
रात्र काळी कभिन्न वाढतच आहे
प्रत्येक उगवत्या दिवसाचा शेवट
उध्वस्त होणार आहे!!!!

कशासाठी हे चालले आहे?
कोण मागे उरले आहे?
वर्तमानाला सन्मुख
अख्खा भुतकाळ झाला आहे!!!

बी

विषय: 
प्रकार: 

नवरात्रीनिमित्त गायलेली गाणी

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

आम्हाला संगीत शिकवणारे गुरुजी श्री रविन्द्र परचुरे, माझे गुरुभाऊ आणि मी असे आम्ही सर्वांनी मिळून नवरात्रीनिमित्त श्री रामावर चार गाणी बसवली होती. ती इथे तुमच्यासाठी देतो आहे. धन्यवाद.

१) श्री ह्या रागावर आधारीत ही एक बंदीश आहे - चलो री मायी रामसिया दरसन को, रघुनंदन रथ मे आवत है"

http://youtu.be/-bjUVCjciMg

२) हे एक मराठी भजन आहे. राम होऊनी राम गावे, रामासी.. शरणा निघा रे.

http://youtu.be/wFIMaumV2BU

प्रकार: 

फडे

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

fadaa1.jpg

पुण्याला आमच्याकडे तीन गॅलर्‍या आहेत. एका गॅलरीत आम्ही झाडे लावलीत. कुंडीतील गाळ फरशांना चिकटून राहतो. इथली माती लाल आहे. आमच्याकडे अकोल्यात मातीचा रंग असा आहे की लगेच आठवण होते - काळ्या मातित मातित तिफण चालते. तो गाळ बघून मी केरसुनी घेतली पण केरसुनी ओलीचिंब होऊन आठ दिवस सुकवत ठेवावी लागली. एक खराटा होता त्यानीही गाळ निघत नव्हता. आई म्हणाली फडा घेऊन ये.

विषय: 
प्रकार: 

आम्ही गायलेला राग मालगुंजी - रैना कारी डरावन लागी रे

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

मला संगीत शिकवणारे गुरुजी श्री रविन्द्र परचुरे ह्यांच्यासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही गुरुबांधवानी मिळून राग मालगुंजी मधील एक बंदीश गायली - "रैना कारी डरावन लागी रे..."

त्याची तू-नळीवरची लिंक इथे देतो आहे:

http://youtu.be/7l2AKrCWjak

विषय: 
प्रकार: 

चाफ्याची शेंग

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

परवा अंधार पडायच्या वेळी मी चाफ्याच्या अगदी जवळून गेलो आणि घाबरुन एकदम बाजूला झालो. काळीकुट्ट, निमुळती आणि चकाकणारी चाफ्याची शेंग ओळखण्या अगोदर मला तिची एकदम भिती वाटली. तुम्हाला सर्वप्रथम भितीच वाटेल! नंतर मी थोडे बळ एकवटून एक एक कण पुढे सरकत जवळ जाऊन पाहिले तर ती चाफ्याची शेंग होती. चाफ्याची फांदी तोडून जमिनीत टोचली की महिनाभरात तिला पागोरे फुटतात. चाफ्याच्या बिया असतात हे माझ्या गावी देखील नव्हते. खरे तर मला असे वाटते बहुतेक झाडी ही फांदीपासूनच नवा जन्म घेतात. आमच्या घरी आणि बाजूला तगरीची झाडे आम्ही असेच लावायचो.

विषय: 
प्रकार: 

ब्लाऊस पिस

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

आमच्याकडे विदर्भात खास करुन अकोल्यात आणि आजूबाजूच्या गावात कुणाच्या भेटीला एखादी स्त्रि गेली असेल आणि ती जर जवळची असेल तर तिला ब्लाऊज पीस देतात. आमच्याघरी जेंव्हा कपाट नव्हते तेंव्हा आई वेगवेगळ्या रंगाचे ब्लाऊज पीस एखाद्या कापडी पिशवीत नाहीतर पेटीत बोचकून ठेवून द्यायची. बर्‍याचदा तेच ब्लाऊज पीस आई इतर कुणाला द्यायची. दुकानदाराकडे जर तुम्ही डझनानी ब्लाऊज पीस विकत घ्यावयास गेलात तर ते आधी विचारत कुणाला द्यायला वगैरे असेल तर दुसरे पीस दाखवतो. ही दुसरी पीसे म्हणजे कमी किमतीची, सुती, आणि ६०-६५ सेंटीमीटरची असत.

विषय: 
प्रकार: 

पूर्वज

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

पाचशे वर्ष जुन्या
प्राचीन वटवृक्षाप्रमाणे असतात
आपले पुर्वज
आपले आईवडील

आपल्या नसानसात
रुजलेली असतात त्यांची पाळंमुळं
आणि लाल रक्ताच्या
पांढर्‍या आणि तांबड्या पेशीतून
वाहत असतो
त्यांनीच दिलेला प्राणवायू

ते नसूनही आपल्याच आजूबाजुला असतात
ते असतात आपल्या आत्मविश्वासात
ते असतात आपल्या तत्त्वात आणि व्यक्तिमत्त्वात
ते असतात आपल्या दैनदिन आचारविचारात

त्यांना रोज पाहता .. अनुभवता येत
आपल्या डोळयांच्या रंगात
त्वचेच्या स्पर्शात
हसण्याच्या खळखळाळात
केसांच्या सुगंधात
स्पंदणार्‍या हृदयात
आपल्या प्रत्येक सवयीत
हालचालीत तेच तर असतात!!!!!

प्रकार: 

देणे

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

सुकलेले गवत गोळा करुन
सुंदर सुंदर घरटी बांधायला
कोण बर शिकवत असेल
चिमन्या पाखरांना?

पंखात बळ येताच
आईच्या कुशीतून
बाहेर पडून
आपल जग शोधायला
कोण बर शिकवत असेल
चिमण्या पाखरांना

निळ्याभोर विस्तिर्ण आकाशात
जागेचा अडचण नसताना
शिस्तित विहार करायला
कोण बर शिकवत असेल
चिमण्या पाखरांना?

त्या त्या जन्मात
ती ती शिकवण
आपसूक मिळालेली असावी?
रक्तातच उतरलेली असावी?
वंशातून आलेली असावी?
जगायला माफक तेवढी
निसर्गद्त्त बहाल केली असावी!!!!

बी

प्रकार: 

स्वैपाकघरातील फुले

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

आठवते तुला...गुलमोहराच्या पाकळ्यांची चव
चिंचेचा फुलांचा सांडलेला बहर
हादग्याच्या फुलांवर तुटुन पडलेले रावे
काशीकोहळ्याच्या एखाद्या हळदपिवळ्या फुलाला धरलेले फळ
अंबाडीच्या फुलापासून बनवलेल्या शरबताचा गुलाबी रंग
तव्यावर अरतपरत केलेले करडे दगडफुल
केळीच्या पानावर वाढलेली केळफुलांची भाजी
कोंथींबीरीच्या फुलांना आलेले हिरवे ओले धणे
हिवाळ्यात वालाच्या वेलीवरील जांभळ्या फुलांचे पांघरुन
गगनजाईच्या फुलांच्या देठामधील चाखलेले मध
महादेवाच्या पिंडीवर गळून पडलेले तुळशीच्या मंजिरीतील निळेसावळे कण
तळहातावर घेऊन जिभेने चाखलेला गुलकंद
शेवग्याच्या फुलांचे केलेले थालिपीठ

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - हर्ट यांचे रंगीबेरंगी पान