पूर्वज
पाचशे वर्ष जुन्या
प्राचीन वटवृक्षाप्रमाणे असतात
आपले पुर्वज
आपले आईवडील
आपल्या नसानसात
रुजलेली असतात त्यांची पाळंमुळं
आणि लाल रक्ताच्या
पांढर्या आणि तांबड्या पेशीतून
वाहत असतो
त्यांनीच दिलेला प्राणवायू
ते नसूनही आपल्याच आजूबाजुला असतात
ते असतात आपल्या आत्मविश्वासात
ते असतात आपल्या तत्त्वात आणि व्यक्तिमत्त्वात
ते असतात आपल्या दैनदिन आचारविचारात
त्यांना रोज पाहता .. अनुभवता येत
आपल्या डोळयांच्या रंगात
त्वचेच्या स्पर्शात
हसण्याच्या खळखळाळात
केसांच्या सुगंधात
स्पंदणार्या हृदयात
आपल्या प्रत्येक सवयीत
हालचालीत तेच तर असतात!!!!!
आपल चालणं बोलंणं दिसणं हसंणं रडणं नाचणं गाणं
आपल सुखदु:ख
हरेक .. हरेक गोष्टीशी
चिवटपणे
जोडलेले असतात त्यांचे धागे!
पूर्वज आपल्याला सोडून कुठे जातात?
त्यांची शिकवण पिढ्यांपिढ्या सोबतीला असते
त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच पुढच पाऊल उचलता येत
त्यांच्या नावामुळेच आपल नाव उंचावल जात
पुर्वज पाचशे वर्ष जुन्या वटवृक्षाप्रमाणे असतात
ते मरत नसतात..
ते आपल्यामधुनच परत परत जन्म घेत असतात..
घेत राहतात!!!!
बी
वादोत्पादक मुद्दा!
वादोत्पादक मुद्दा!
खूप सुंदर, ही कविता खूपच
खूप सुंदर, ही कविता खूपच आवडली. अमिताभची एक add आठवली.
बी थोडं शब्दाचं सांगते. 'नाचणं' असा शब्द हवा, आपलं नाव 'उंचावलं जातं' असे हवे असं मला वाटतं.
कविता एकदम भिडली, अगदी खरीखुरी.
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=0AfoomfNqVU >>
हीच का ती जाहिरात ?
पुर्वज आपल्याला सोडून कुठे
पुर्वज आपल्याला सोडून कुठे जातात?
त्यांची शिवकण पिढ्यांपिढ्या सोबतीला असते>>
शिकवण , पूर्वज असे हवे.
अमित बाबू काय संवाद फेक करतात पण. मान गये.
मस्तच!
मस्तच!
हो मेधा हीच add. पेट थेरपी
हो मेधा हीच add. पेट थेरपी करेक्ट 'शिकवण', माझे नाही लक्ष गेले तिकडे.
अत्यंत संवेदनशिल,subtle
अत्यंत संवेदनशिल,subtle कविता, आवडली.
धन्यवाद सर्वांचे. अन्जू, तू
धन्यवाद सर्वांचे.
अन्जू, तू नेहमीच मदत करतेस. त्याबद्दल धन्यवाद.
बी , कविता आवडली. आपल चालण
बी , कविता आवडली.
आपल चालण बोलण दिसण हसण रडण नाचण गाण >>> ह्या ओळीत प्रत्येक शेवटच्या अक्षरावर अनुस्वार देणार का? प्लीज!
केला तोही बदल शुगोल.
केला तोही बदल शुगोल.