मे महिन्याच्या कविता
ह्यावेळी आम्हाला विषय आहे: कुणी काही म्हणा आणि दुसरा विषय अधिकार. ह्यावर केलेल्या कविता:
कुणी काही म्हणा
सुरवात करायची आहे.
नवीन काहीतरी करायचे
जिथे आहे तेथून सुरवात करायची आहे.
पण भिती वाटते
मग भितीपासूनच सुरु करा!
संकोच वाटतो
मग संकोच सोबत घेऊन सुरवात करा.
हात थरथर कापतात
मग शेकहॅन्ड पासून सुरवात करा
आवाज अडखळतो
मग अडखळणार्या आवाजापासून सुरवात करा
नैराश्य वाटते.. दु:ख जाणवते
मग ह्या दोन्हीसोबत सुरुवात करा.
सुरवात करा.. कुणी काही म्हणा
जिथे आहे तेथून सुरवात करा.
- बी