निरवानिरव
Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
35
रोजची दुपारची.. रात्रीची
निरवानिरव करता करता
एक दिवस डळमळतं
आयुष्य काठावर येतं
आणि सुरु होते
शेवटची निरवानिरव
जड वाटतात तेंव्हा
मोठ्या जिकरीने
साठवलेल्या ..
संग्रह केलेल्या
गाठोड्यात बांधून ठेवलेल्या
ठेवणीतल्या
वस्तू..
गजबजलेल्या संसाराचं
रिक्त..रिकामं चित्रं!
निर्जीव वाटायला लागतात
त्यावेळेसचे ते सर्व क्षण अन क्षण
काहीच उरलेलं नसतं
उरलं असतं
एक न पेलणार ओझं
प्रत्येक आग्रहातला अट्टाहास
हास्यास्पद होऊन जातो!
जिवाला जड झालेल्या वस्तू
आणि जड झालेला जिव
दोन्हीच्या त्यागातंच
आयुष्याची निरवानिरव होऊन जाते!
- बी
विषय:
प्रकार:
शेअर करा
मस्त. निरवानिरवा तेव्हढ
मस्त. निरवानिरवा तेव्हढ बदलणार का! निरवानिरव पाहीजे ना?
बी. सुंदर कविता. प्रत्येक
बी.
सुंदर कविता.
प्रत्येक आग्रहातला अट्टाहास
हास्यास्पद होऊन जातो!>>>
हे छान लिहिलंत.
मला तर अश्या सुंदर कविता लिहिणारे बी आणि तसले धागे काढणारे बी एकच की वेगवेगळे असा प्रश्नं पडतो.
धन्यवाद साति आणि आभा. तुमच्या
धन्यवाद साति आणि आभा. तुमच्या प्रतिक्रियात प्रेरणा आहे.
सुंदर रचना साती +१
सुंदर रचना
साती +१
मस्त !
मस्त !
बी खूप सुंदर कविता. मनापासून
बी खूप सुंदर कविता. मनापासून आवडली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्या बात है 'बी' .....-
क्या बात है 'बी' .....- अंतर्मुख करायला लावणारी रचना ....
खूप आवडली कविता. अंतर्मुख
खूप आवडली कविता.
अंतर्मुख करायला लावणारी रचना ....
>>>>>>>>>>>>>१००
सुंदर! मोजक्या शब्दात मोठा
सुंदर! मोजक्या शब्दात मोठा अर्थ.
Aavadali.
Aavadali.
वा, सुरेख कविता आहे बी
वा, सुरेख कविता आहे बी
आवडली मला तर अश्या सुंदर
आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला तर अश्या सुंदर कविता लिहिणारे बी आणि तसले धागे काढणारे बी एकच की वेगवेगळे असा प्रश्नं पडतो.>> +१
आवडली..
आवडली..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवडली.
आवडली.
आवडली
आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवडली.
आवडली.
शेवटच्या 'व' वर अनुस्वार
शेवटच्या 'व' वर अनुस्वार नकोय.
बाकी कविता ठीकेय.
बी, छान कविता.. पण या
बी, छान कविता.. पण या शब्दासोबतच एक उदासी आहे, बिलासखानी सारखी. ती नाही आवडत मला.
दिनेशदा, बरोबर. ही कविता
दिनेशदा, बरोबर. ही कविता लिहितानाच माझ्यापुढे एक उदास चित्र होते.
सगळ्यांचे धन्यवाद.
अप्रतिम सुंदर!
अप्रतिम सुंदर!
सुंदर आहे कविता.
सुंदर आहे कविता.
ही कविता मृत्युवर नाही आहे.
ही कविता मृत्युवर नाही आहे. ही कविता आयुष्यात शाश्वत असे काहीच नाही ह्याची खंत बाळगणारी आहे.
सुरेख !
सुरेख !
सुरेख.
सुरेख.
आवडली.
आवडली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान कविता बी, वाचून मनात
छान कविता बी, वाचून मनात फिलॉसॉफिकल विचार येऊ लागले.
बी या कवितेतून जी हुरहुर
बी या कवितेतून जी हुरहुर लागते त्याने फार कासावीस व्हायला होतं. प्रत्येकाचा हातून असं लिखाण नेहमीच होणार असतं असं नाही. पण जेव्हा केव्हा ते होईल तोवर धीर धरायला काय हरकत आहे?
आवडली........... पण निराश
आवडली........... पण निराश नको राहुस नेहमी आनंदी रहा..
वेका धन्यवाद पण शेवटच्या
वेका धन्यवाद पण शेवटच्या वाक्यातील अर्थ नाही कळला. मी अधीर होऊन कविता करतो असे म्हणायचे आहे का तुला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद सुष्टी. मी तसा बर्यापैकी आनंदीच असतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बी मला खूप आवडली
बी मला खूप आवडली कविता.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आयुष्य जसं जसं पुढे जातं तसं तसं त्याचा एक वेगळाच पैलू दिसायला लागतो आणि कळतं की हे जे काही आहे मिळवणं आणि गमवणं ते सगळं क्षणभंगूर आहे.
ही समज मनात घोळत असते पण शब्दबद्ध करता येत नाही. तुला छान जमलंय ते करायला. मी फार रिलेट केली.
Pages