कविता महाजन अभिनंदन!

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

'भिन्न' सारखे नवीन काहीतरी पुस्तक वाचून मला ते पुस्तक विचार करायला प्रवृत्त करणारे वाटले. फक्त पुस्तक लिहिण हे एकवेळ सोप काम असेल पण जे लिहिल तस आयुष्य जगण हे फार अवघड काम आहे. 'भिन्न' वाचून कविता महाजनांविषयी मला फार आदर वाटायला लागला. नंतर फेसबुवकर त्यांच्याशी मैत्री झाल्यानंतर त्यांचे लेखन मला जादू सारखे संमोहित करुन टाकणारे वाटू लागले. त्यांचे शब्द आणि वाक्य अतिशय तरल असतात म्हणून पदोपदी सवड मिळाली की माझी गाडी त्यांच्या वॉलवर जाते. अलिकडे त्यांची 'कुहु' पाहिली. त्यांच्या 'कविता' त्यांचे नाव सार्थ करतात. आज वाचले...

ismat chugataai.jpg
माझ्या "रजई" या पुस्तकाला साहित्य अकादेमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. इस्मत चुगताई यांच्या या कथा मी अनुवादित केल्या, त्यातून जे बळ मिळालं, त्यामुळेच मी पुढे "ब्र" लिहिण्याचं धाडस करू शकले. इस्मतजींविषयी अपार कृतज्ञता मनात आहे.

विषय: 
प्रकार: