कण
Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
8
रवा-साखरेच्या एक कण
ढीगभर मुंग्यानी ओढत ओढत
वारुळात नेला
पुढे काळोखात त्याचे काय झाले माहिती नाही:
बहुतेक..सगळ्यांनी मिळून संपवला असेल
कारण परत दुसर्या दिवशी
आणखी एक शिस्तबद्द रांग
आणखी एका कणाला वाहून नेताना मी पाहिली.
इथे भर उजेडात माणसे स्वार्थी, धुर्त, लबाड होतात
इतरांच्या तोंडचे पळवून नेतात
केसांनी एकमेकांचे गळे कापतात
निरपराध लोकांना फसवतात
स्वत:च चंगळ करतात,
स्वत:च दंगल करतात,
स्वतःचे मंगल करतात!
इतके स्वार्थी की..
हिसकवून घेतलेल्यातला एक कणही मुंग्याना मिळणार नाही!
- बी
विषय:
प्रकार:
शेअर करा
'बी' स्टाईलची वाटली नाही.
'बी' स्टाईलची वाटली नाही.
रिया ही कविता
रिया ही कविता भ्रष्टाचाराबद्दलची आहे. हो ही माझी नेहमीची शैली नाही. स्वार्थ ह्या विषयावर कविता लिहायची होती आमच्या "शब्दगंध" वर्गासाठी म्हणून लिहिली. तू ती वाचलीस. छान वाटले. धन्यवाद.
'बी' स्टाईलची वाटली
'बी' स्टाईलची वाटली नाही.
>>
सहमत,
मला कवितावाचन आवडत नाही की फारसे समजत नाही, पण आपल्या कविता अधूनमधून वाचतो. कारण मला त्यात एक ललितही दिसते. यात ते मिसिंग वाटले.
बी, बहुदा वाचली सगळ्यांनी
बी, बहुदा वाचली सगळ्यांनी असेल पण तुम्हाला स्पष्ट मत आवडेल की नाही ते न कळल्याने प्रतिसाद दिला नसेल.
कारण तुमच्या 'कविता' नेहमीच आवर्जुन वाचल्या आणि प्रशंसल्या जात इथे.
अर्थात हे माझं मत आहे...मी सुद्धा प्रतिसाद २ वेळा खोडला पण शेवटी लिहिलाच
कारण मला त्यात एक ललितही
कारण मला त्यात एक ललितही दिसते.>> अरे किती सुंदर प्रतिक्रिया दिलीस.
कारण तुमच्या 'कविता' नेहमीच आवर्जुन वाचल्या आणि प्रशंसल्या जात इथे.
परत असे करु नकोस. खरीखुरी प्रतिक्रिया लगेच कळते आणि आवडतेच.
अर्थात हे माझं मत आहे...मी सुद्धा प्रतिसाद २ वेळा खोडला पण शेवटी लिहिलाच >> हा हा हा
मलापण फारशी भावली नाही, बी टच
मलापण फारशी भावली नाही, बी टच नाही वाटला.
वाह वाह ! बी कवींनी बी कण
वाह वाह !
बी कवींनी बी कण वेचलेत या कवितेत.
तु बी अन मी बी !!
कविता आवडली. माणसातल्या
कविता आवडली.
माणसातल्या स्वार्थीपणाचे यथोचित वर्णन आहे.