हंगेरी

पूर्व युरोप भाग २ - बुडापेस्ट

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

भाग पहिला www.maayboli.com/node/50524

आम्ही डीनर क्रूझवर फक्त क्रूझचाच पर्याय घेतला होता. बोटीवरून बुडापेस्टचा रात्रीचा नजारा मस्तच होता.

चेन ब्रिज आणि बुडामधला राजप्रासाद

हंगेरी २: गुयाश कम्युनिझम

Submitted by टवणे सर on 19 January, 2013 - 14:54

साम्यवादाबद्दल मला लहानपणापासून जबर कुतुहल होते. पुढे महाविद्यालयात असताना विविध खरी-खोटी पुस्तके वाचून साम्यवादाबद्दल वेगवेगळ्या कल्पना डोक्यात होत्या. पुर्वाश्रमीच्या एखाद्या साम्यवादी देशातल्या लोकांकडून साम्यवाद, त्यावेळची राजकीय परिस्थिती, समाजजीवन ह्याबद्दल बरेच ऐकावे, बोलावे असे मनात होते. पण हंगेरीत ते मात्र अजूनही पुर्ण झालेले नाही. त्यामुळे ह्यात जे लिहिन ते बरेचसे मी वाचलेल्या व बघितलेल्या गोष्टींवर अवलंबून आहे आणि थोडेसेच इथल्या लोकांकडून ऐकलेल्या गोष्टींवर.

विषय: 
शब्दखुणा: 

हंगेरी - १

Submitted by टवणे सर on 13 January, 2013 - 11:01

२०१० मध्ये पहिल्यांदा हंगेरीला आलो तोपर्यंत ह्या देशाबद्दल 'पुर्वाश्रमीचा साम्यवादी देश' ह्यापलिकडे काहिही माहिती नव्हती. खरेतर मी हंगेरीला जाईन असे मला स्वप्नातसुद्धा आले नव्हते. मी 'कराड'मध्ये दीड वर्ष इन्फोसिससाठी एक प्रोजेक्ट करत होतो आणि ते संपल्यावर महिना-दोन महिने सुट्टीवर जायचे असा बेत आखत होतो. आणि अचानक एके दिवशी एकाने विचारले 'अरे हंगेरीत एक प्रोजेक्ट सुरु होणार आहे, जाणार काय?' आणि मी हो म्हणालो. बास. नोव्हेंबर २०१०च्या शेवटल्या आठवड्यात इथे आलो तो २०११ संपेपर्यंत इथेच होतो. आणि आता पुन्हा सप्टेंबर २०१२ला पुन्हा इथे आलोय.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - हंगेरी