पूर्व युरोप भाग २ - बुडापेस्ट
भाग पहिला www.maayboli.com/node/50524
आम्ही डीनर क्रूझवर फक्त क्रूझचाच पर्याय घेतला होता. बोटीवरून बुडापेस्टचा रात्रीचा नजारा मस्तच होता.
चेन ब्रिज आणि बुडामधला राजप्रासाद
भाग पहिला www.maayboli.com/node/50524
आम्ही डीनर क्रूझवर फक्त क्रूझचाच पर्याय घेतला होता. बोटीवरून बुडापेस्टचा रात्रीचा नजारा मस्तच होता.
चेन ब्रिज आणि बुडामधला राजप्रासाद
मागच्या वर्षी ऑक्टोबरमधे युरोपच्या या टर्म मधली पहिली ट्रीप करायचे ठरवले. स्वाती आणि मुलींचे बेल्जियमचे रेसिडंट कार्ड अजून आले नव्हते त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत जायचे की नाही आणि गेलो तर कधी आणि कुठे जायचं ते ठरत नव्हते. शेवटी कुठेच जायचं नाही आणि डिसेंबरच्या सुट्टीत जाउ असं ठरवलं. तोच मुलीच्या शाळेला एक आठवडा सुट्टी लागायच्या बरोबर ३ दिवस आधी अनपेक्षितपणे तिघींचेही कार्ड आले आणि मग परत एकदा प्लॅनिंगला लागलो. खरंतर पोर्तुगालचा प्लॅन करत होतो पण व्हिएन्ना, ऑस्ट्रियाचे फ्लाइटचे चांगले डील दिसले आणि तिकीटं बूक करून टाकली.
आता जाउन देखिल बरेच महिने झाले... मागच्या वर्षी मे मधे आठवडाभर सुट्टी काढुन ऑस्ट्रियाला गेलो होतो. व्हिएन्नाला माझा मावसभाउ असतो. त्यामुळे संधी मिळाली की तिकडे जायचेच होते. आपलं कोणी असेल तर सगळं कसं निवांत होतं... दोन महिने आधी भावाला फोन करुन तो आहे का ते विचारुन घेतलं आणि विमानाची तिकीटे काढली. कधी नव्हे ते जाताना ऑस्ट्रियन आणि येताना एअर फ्रान्स ची तिकिटं स्वस्तात (हे महत्वाच!) मिळाली. जरा बरं वाटलं की यावेळी सामान चेक-इन करुन नेता येइल! [१] पण त्यानंतर आठवडाभराची आखणी भावावर सोडुन दिली... ते निघण्याच्या आठवडाभर आधिपर्यंत आम्ही काही म्हणजे काहीही विचार केला नाही!