शंभर मिनारांचं शहर - प्राग - चेक रिपब्लिक
युरोपमधे आल्यापासूनच प्राग बघायचे आहे हे ठरवलं होतं पण प्लॅन बनत नव्हता. यावर्षी शेवटी प्लॅन जमून आला.
प्राग (चेकमधे प्राहा Praha) ही चेक रिपब्लिकची राजधानी, वाल्टावा (Vlatava) नदीच्या दोन्ही किनार्यावर वसली आहे. प्रागला जगातल्या सर्वात सुंदर शहरांपैकी एक मानले जाते. जवळजवळ ११०० वर्षापूर्वी हे शहर वसवलं गेलं आणि तेव्हापासून हे मध्य युरोपातले सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाचे शहर बनले. २ रोमन सम्राटांनी इथूनच राज्य केलं होतं. चेकोस्लोवाकियाची राजधानीसुध्दा प्रागच होती आणि त्याच्या विघटनानंतर चेक रिपब्लिकची राजधानी बनली.