शंभर मिनारांचं शहर - प्राग - चेक रिपब्लिक

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

युरोपमधे आल्यापासूनच प्राग बघायचे आहे हे ठरवलं होतं पण प्लॅन बनत नव्हता. यावर्षी शेवटी प्लॅन जमून आला.

प्राग (चेकमधे प्राहा Praha) ही चेक रिपब्लिकची राजधानी, वाल्टावा (Vlatava) नदीच्या दोन्ही किनार्‍यावर वसली आहे. प्रागला जगातल्या सर्वात सुंदर शहरांपैकी एक मानले जाते. जवळजवळ ११०० वर्षापूर्वी हे शहर वसवलं गेलं आणि तेव्हापासून हे मध्य युरोपातले सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाचे शहर बनले. २ रोमन सम्राटांनी इथूनच राज्य केलं होतं. चेकोस्लोवाकियाची राजधानीसुध्दा प्रागच होती आणि त्याच्या विघटनानंतर चेक रिपब्लिकची राजधानी बनली.

तर अशा या ऐतिहासिक आणि सुंदर शहराची काही प्रकाशचित्रं...

ओल्ड टाउन स्क्वेअर - या चौकातल्या ओल्ड टाउन हॉलच्या टॉवरवरून -

टॉवरवरून दिसणारे प्राग -

याच ओल्ड टाउन हॉलच्या दक्षिणेकडच्या भिंतीवर हे प्रसिध्द खगोलशास्त्रीय घड्याळ (Astronomical Clock) आहे

ओल्ड टाउन चौकातले हे यान हुसच्या स्मरणार्थ निर्मिलेले शिल्प (Jan Hus Memorial) -

ओल्ड टाउनमधूनच आम्ही एका सिटी टूर बसमधून नदीपलीकडच्या प्राग किल्यावर गेलो. तिथून दिसणारं प्राग - प्रागला "शंभर मिनारांचं शहर" (The City of a Hundred Spires) का म्हटलं जातं हे इथून दिसणार्‍या नजार्‍यावरून कळून येतं

संध्याकाळ बरीच झाली होती आणि किल्ला बघायची वेळ संपत आली होती. पूर्ण किल्ला बघायला जवळजवळ ३ तास लागतात. शिवाय टूर बस १ तासातच परत निघणार होती त्यामुळं किल्ल्यात जे काही थोडंफार फिरता येइल तेव्हढं फिरून परत निघालो. किल्ल्यात आतमधे एक सुंदर सेंट व्हायटस कॅथेड्रल आहे.

कॅथेड्रलचा फोटो. मोबाइल मधला सेल्फी मोड वापरून काढला आहे.. (केपीच्या आग्रहावरून Wink )

किल्ल्यावरून परत आम्ही ओल्ड टाउन स्क्वेअरमधे परत आलो. नदीकाठच्या एका कॅफेमधे बसून कॉफी घेतली आणि तिथून प्रसिध्द चार्ल्स ब्रिजकडे निघालो. नदीकाठाहून नदी आणि मागं दिसणारा किल्ला

चार्ल्स ब्रिज आणि मागं दिसणारा किल्ला

चार्ल्स ब्रिजचे प्रवेशद्वार

हा प्रागमधला सगळ्यात प्रसिध्द पूल. १३५७ साली सहाव्या चार्ल्सनं याचं काम चालू केलं जे १४०२ साली पूर्ण झालं. या पुलावर बरोक शैलीतले ३० पुतळे आहेत. त्यापैकी हा एक

पुलावरूनच काढलेला हा अजून एक फोटो

प्रकाशात उजळलेला चार्ल्स ब्रिज

वाल्टावा नदी, चार्ल्स ब्रिज आणि मागे प्राग किल्ला

प्रागमधली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फारच मस्त आहे.. तिथलं एक मेट्रो स्थानक

ओल्ड टाउन आणि न्यू टाउन (जे चौदाव्या शतकात वसवलं गेलं होतं) यांच्या सीमेवर असलेलं पावडर गेट. या टॉवरमधे सतराव्या शतकात गन पावडर साठवली जायची त्यामुळं हे नाव पडलंय

नॅशनल थियेटर ऑफ चेक रिपब्लिक.. प्रागचं स्टेट ओपेरा हाउस याच इमारतीत आहे. बर्‍याच हॉलिवूडपटांचं चित्रीकरण इथं झालंय (मिशन इंपॉसिबल - घोस्ट प्रोटोकॉल, XXX, इ.)

पेट्रीन (Petřín) टेकडीच्या पायथ्याला असलेलं कम्युनिझमचं स्मारक

चार्ल्स ब्रिजचं दिवसाचं रूप

पारंपारिक स्लोवाक केक ट्रेडल्निक (Trdelník)

वेन्सेस्लास चौकातील (Wenceslas Square) चेक नॅशनल म्युझियम

सेंट वेन्सेस्लासचा पुतळा

नॅशनल म्युझियमच्या पायर्‍यांवरून वेन्सेस्लास चौक - ७५० मी लांब आणि ६० मी रूंद अशा या भव्य चौकात एका वेळी ४ लाख लोक मावू शकतात

काही प्रॅक्टिकल माहिती -

चेक रिपब्लिक युरोपियन महासंघाचा सदस्य आहे शिवाय शेंगेन विभागाचाही सदस्य आहे पण युरो झोनचा सदस्य नाही. कोरूना (Czech koruna) हे इथलं चलन. युरो सगळीकडं घेतात पण सुट्टे परत द्यायचे असतील तर ते कोरूनामधेच दिले जातात. चेक ही इथली अधिकृत भाषा पण बहुतेक ठिकाणी इंग्रजी चालते

सुंदर आहे प्राहा. पायी फिरुन पहात रहावं . बरोबर कोणी नसेल तर उत्तम ( पोरं तर नक्कीच नकोत) आपल्याला जे अन जस पहायचय ते अणि तस पहायला आवडणारे सहप्रवासी असतील तर बेस्ट.
फोटो मधे सांडलेला केशरी सोनेरी उजेड मस्त आहे Happy

सुंदर आहेत फोटो. प्राग किल्ल्याचे रात्रीचे फोटो तर फारच छान आले आहेत. हे शहर जुने असल्याची छाप सगळीकडे दिसते आहे. टोलेजंग इमारती नाहीत.

मस्त आहे रे मनीष. कुठल्यातरी बाँडपटात येथिलच सगळे शुटींग आहे. रस्त्यावर रनगाडा पळवलाय जनु बांडेने Happy

त्या ३ र्‍या का ४ थ्या फोटोत कमानीतुन दिसणार्‍या दोन बिल्डींग आहेत त्याचे नाही का फोटो. एखाद्या मोठ्या चर्चसारखे दिसत आहे ते.

मागे एक प्रोजेक्टकरता लंडनवरुन एका टीमला पॅरीस, इटलीला जायचे होते तर दुसरीला झेकला. मी नेमका पॅरीसवाल्या टींममधे होतो याचे आता दु:ख होत आहे. Happy

मस्त फोटो. बरोबर ३ वर्षापुर्वी इथे गेलो होतो - अर्थात तेव्हा सगळे ग्लुमी होते. उन्हाळ्यातल्या प्रागची मजा औरच्च जी फोटोंमधून पुरेपूर उतरली आहे

क्या बात है!!!
सगळेच प्रचि मस्त. शेवटचा प्रचि प्रचंड आवडला Happy

सुंदर आहे प्राहा. पायी फिरुन पहात रहावं . बरोबर कोणी नसेल तर उत्तम ( पोरं तर नक्कीच नकोत) आपल्याला जे अन जस पहायचय ते अणि तस पहायला आवडणारे सहप्रवासी असतील तर बेस्ट.>>>>>>इन्ना +१००००० Happy

धन्यवाद मंडळी..

आता तुम्ही मराठी पर्यटकांना मार्गदर्शन करा बॉ.>> रैना.. कधी काढतीयेस युरोप ट्रीप सांग Wink

दिनेश.. यावेळी २ च दिवसाची ट्रीप होती शिवाय जास्त फिरता नाही आलं त्यामुळं फोटो तसे कमीच काढले Happy

केपी.. कॅसिनो रोयालचं शूटींग प्रागमधेच झालंय. पहिल्या मिशन इंपॉसिबलचं पण.

नलिनी.. झब्बू मस्त आहे.. अजून द्या Happy

धन्यवाद पराग, अमितव..

पराग... ट्रीप फारच छोटी होती.. शिवाय यावेळी कुठली वॉकिंग टूर वगैरे घेतली नाही त्यामुळं फारशी माहिती (फर्स्ट हँड) नाही मिळाली Happy त्यामुळं फारसं वर्णन नाही लिहिलं

आहाहाहाहा Happy अप्रतिम Happy
रॉकस्टार चित्रपटामुळे, मला या शहराबद्दल खूपच आकर्षण वाटतं... आयुष्यात एकदातरी प्रागला जाईनच Happy
धन्स प्रचिंबद्दल, एक से बढकर एक आहेत सगळेच Happy

खूप सुंदर फोटो. लालचुटूक कौलांच्या इमारती....सगळं शहरच एक म्युझियम वाटतंय. पण फोटो पाहताना प्रत्येक वास्तूची माहितीही सोबत हवी होती असं वाटत होतं. ती शोधून लिहिली तर आणखी मजा येईल. फर्स्ट हॅण्डच हवी असं कोणी म्हटलंय? आणि कोण तपासणार आहे? Wink

Pages