बाइक्स

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

बर्‍याच दिवसांनी मोबाइल वापरून काढलेले काही फोटो डाउनलोड केले... इंडियानापलिसच्या एका मॉलच्या बाहेर काही मस्त बाइक्स (अमेरिकेतील भाषेत मोटरसायकल्स, इथे सायकलला बाइक म्हणतात) होत्या. त्यांचि काही प्रकाशचित्रे.... मोबाइलवरून काढलीत त्यामुळे फोटोंची क्वालिटी फारशी चांगली नाही. बाइकप्रेमी काय काय करू शकतात याचा एक नमुना म्हणून हे टाकले आहे...

सगळ्या modified Suzuki Hayabusa (1300 CC) आहेत. Indy मधल्याच एकाने या सगळ्या बाइक्सचे बॉडी वर्क केले आहे.. काही बाइक्सवर काही खेळाडूंचे (Colts players, Wrestler from WWE) चेहरे रगंवलेत...
Image016.jpgImage013.jpgImage012.jpgImage011.jpg

अशा स्पोर्टस बाइक्स बघितल्या किंवा कोणी स्पोर्टस बाइकवर जाताना दिसले की माझ्या Yamaha YZF750 ची खूप आठवण येते आणि हात शिवशिवायला लागतात...

Yamaha_012.jpg

This was an amazing bike... I could easily go upto 90 MPH... I even touched 115MPH once.. एकदम रिकामा रस्ता होता (country side). पण नंतर परत कधी ११५ पर्यंत तर सोडाच ९० पर्यंत पण जायचे धाडस नाही झाले आणि यापुढे तसले धाडस करणार पण नाही. आता विचार केला तरी भिती वाटते.. एका लहानशा चुकीमुळे काहिही झाले असते...
बाइक घेतली तेव्हा पहिल्यांदा खूप nervous होतो.. त्यात त्या बाइक डीलरने थोडे घाबरवून ठेवले होते.. (according to him it was too heavy for me... it weighed 450 LBs with full tank of gas) पण एकदा चालवायला लागल्यावर काही प्रॉब्लेम नाही. शिवाय यामाहाच्या बाइक्स कंट्रोल करायला easy असतात असे माझे मत (आणि अनुभव पण).
भारतात असताना माझ्याकडे Yamaha RX १०० होति. तेव्हापासून मी बाइक्स च्या बाबतीत Yamaha चा पंखा झालोय.. पण भारतात RX100 नंतर यामाहाला चांगली बाइक नाही बनवता आली (म्या पामराचे अजून एक मत happy.gif). शिवाय 2-stroke मधे जी मजा होती ती 4-stroke मधे नाही. (तेव्हा पेट्रोलच्या किमतीपण तुलनेने कमी होत्या wink.gif)

I just hope I will own n ride such a bike again in future.... (बायकोने हे वाचले तर माझी काही धडगत नाही wink.gif)

विषय: 

छान आहेत. Happy
(मला पहिल्या पानावर दिसले नाही, आता दिसतेय का?)

मस्तच. माझ्या बहिणीला फार आवडते बाइक्स उडवायला, अर्थातच भारतात.

आवडल्या बाईक. भारताबाहेर मी कधीच टू व्हीलर चालवली नाही आणि बसलेपण नाही. एकदा इथेपण हे करुन बघायला पाहीजे.
लालू दिसते की हे नवीन लेखन मध्ये.

मनीषच्या रंगीबेरंगीमध्ये दिसत होते, पण पहिल्या पानावर नाही. मी प्रतिक्रिया लिहिल्यावर दिसायला लागले.

>>>भारतात RX100 नंतर यामाहाला चांगली बाइक नाही बनवता आली

जाउदे, RX100 बद्दल लिहायला लागलो तर थोड्या वेळात रडू येईल Sad

झाले बहू होतील बहू पण यासम ही

>>>भारतात RX100 नंतर यामाहाला चांगली बाइक नाही बनवता आली

लाखात एक रे...
तुझं वाक्य पण आणि RX100 पण
_______
धूम मचाले...!!!

अहाहा, डोळ्याचं पारणं फिटलं. काय एकसे एक दिस्ताहेत! थँक्यु मनीष!

भारतात खूप उडवली सुझुकी सामुराई. पण इथल्या भारी बाइकला हात पण नाय लावायला मीळाला! (१०० सीसीच्या वर असली तर स्टँडवरून तरी काढता येईल का कोण जाणे! Happy )

वा छान... मला एकदा तरी ह्या पैकी एखाद्या बाईक वर long drive ला जायचय... इथ अमेरीकत Happy

सासशी सहमत..

बाईक्स मस्त आहेत एकदम!! Happy

मस्त आहेत बाईक. भारतातल्यासारखी बाईकवर बसायची मजा बाहेर कुठे अनुभवता आली नाही.

>>>मला एकदा तरी ह्या पैकी एखाद्या बाईक वर long drive ला जायचय

मलापण. पण इंडियन श्टाईलमधे जावं म्हणते. मुलगा पुढे पेट्रोलच्या टाकीवर आणि नवर्‍याच्या मागे मुलगी. Proud

पण इंडियन श्टाईलमधे जावं म्हणते. मुलगा पुढे पेट्रोलच्या टाकीवर आणि नवर्‍याच्या मागे मुलगी. >>>
त्यासाठी तूला इटालीची एक चक्कर करावी लागेल. Happy

सहीच ! बाईक्स आणि प्रकाशचित्रे दोन्ही मस्त आहेत.
तू 'अमेरिकन चॉपर' नावाची डिस्कव्हरीवरची मालिका बघतोस का ? मस्त असते. त्यात मी काही अचाट 'खेळणी' बघितली आहेत. इंडी म्हणजे मिलवॉकी नामक बाईकमक्केहून फार दूर नाही Happy

    ***
    Entropy : It isn't what it used to be.

    सायो महान.
    मला चॉपर आवडतात पण त्यापेक्षा जास्त दुकाती आणि कावासाकी निन्जा आर एक्स. (सुपर बाइक)
    RX100 महान होती. नंतर तशी फायरिंग कुठल्याही बाईक आली नाही. सगळ्या साल्या एक जात टुकार. बाईकवरुन पार माहूर ते चिपळून पर्यंतचा महाराष्ट्र कव्हर केला आहे.

    (सुझूकी फियारो उडवनारा) बाईकप्रेमी केदार Happy

    झक्कास दिसताएत बाईक्स!!! Happy

    सायो Lol डोळ्यासमोर आलीस!!

    असल्या बाईक्स वरुन (मागची सीट थोडीशी उंच असेल तर उत्तमच :P) वारा पीत, समुद्रकिनार्‍यावरुन सुसाट जायचं....आहाहा!! अन हो, पुणेरी स्टाईल स्कार्फ नको चेहर्‍याला Wink

    अरे वा!! बरेच बाइक फॅन्स आहेत की...

    सायो... lol.gif

    मृ... सुझुकी सामुराई पन मस्त होती.. पॉवरफुल्ल... (पण शेवटी RX100 ती RX100 light.png) फ्लोरिडा तर बाइक्सवाल्यांसाठी नंदनवन आहे... १२ महिने उडवू शकता.. एकदा तरी ट्राय करून बघच..
    साइड स्टँड(च) असतोच त्यामुळे स्टँडवरून काढणे अवघड नाही....

    स्लार्टी... अमेरिकन चॉपर कधी कधी बघतो.. मला चॉपर फारशा नाही आवडत... ओन्ली स्पोर्टस बाइक्स.. happy.gif

    असल्या बाईक्स वरुन (मागची सीट थोडीशी उंच असेल तर उत्तमच ) वारा पीत, समुद्रकिनार्‍यावरुन सुसाट जायचं >> अगदी अगदी...

    एकदम जबरी..

    भारतात बाइक उडवायला तसे चांगले रस्ते शोधायला पाहिजेत आधी.. पुण्यात तर असे रस्ते शोधायलाच लागतात.. आणि त्यात रस्ता जरी बरा असेल तरी गर्दी कुठेच गेलेली नाही..

    बाइक उडवायला तरी अमेरिकेत जाऊन यायला पाहिजे एकदा...
    =========================
    रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...

    झक्कास आहेत बाईक्स..!!
    अमेरिकेत असताना कधी विचार ही केला नाही बाईक चालवायचा.
    पण इथे नुकतीच Royal Enfield ची Thunderbird घेतली आहे. ३५० cc cruiser.
    It's really an amazing motorcycle.
    लवकरच कोकणांत जायचा विचार आहे.
    ---------------------------------
    देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

    ती हायाबुसा डेंजर बाईक आहे एकदम.. चुकुन सुद्धा अ‍ॅक्सलरेटर थोडा जोरात पिळला गेला तर पुढचं चाक हवेत जातं (व्हिली).... १३०० सी सी... Proud आपल्या मारुतीच्या सी सी ह्या पेक्षा कमी होत्या ...
    फोटु मस्त आलेत पण

    धन्स मंडळी...

    आपल्या मारुतीच्या सी सी ह्या पेक्षा कमी होत्या >> मी Yamaha घेतली तेव्हा माझ्या डोक्यात पहिला विचार हाच आला होता... laughing.gif

    भारी आहेत बाईक एकदम. इति नवरा . :)typical Texan कडे असतेच असली एखादी बाईक.

    वा! छान आहेत की बायका ! (बाईक चे अनेकवचन असा अर्थ घ्यावा) Proud

    १३०० cc म्हणजे काहीच्या काही आहे... माझ्याकडे स्प्लेंडर होती, ती फक्त ९८ cc होती. अर्थात त्या गाडीचं वजनही कमी होतं. माझ्याकडे आत्ता जी कार आहे ती १८०० cc आहे, पण तीचं वजन २६०० पौंड आहे... त्यामानाने १३०० cc ला ४५० पौंड वजन काहीच नाही. काय बूंगाट पळत असतील ह्या सगळ्या गाडया... Happy

    त्यामानाने १३०० cc ला ४५० पौंड वजन काहीच नाही. >> 450 पौंड वजन त्या हयाबुसाचे नाहि... ते माझ्याकडे पुर्वी असलेल्या यामाहा YZF750 चे... ती 750 सीसी होती... ती पण मस्त पळायची...

    सीमा.. नवर्‍याला सांग असली एखादी घ्यायला... laughing.gif

    कोणा-कोणाला फिरायचंय हायाबुसा १३००cc वर... या ह्युस्टन ला... Proud

    Hayabusa.jpg