Knight Rider BRM- नाईट रायडर २००
नाईट रायडर २०० !
भारतात मध्य मार्च पासून उन्हाचा चटका वाढतो आणि कुठलाही क्रिडा दिवसा करणे हा प्रकार नकोसा होतो, सायकलींगही त्याला अपवाद नाही, शिवाय १३ १/२ तास, २७ तास वगैरे अश्या उन्हात करणे म्हणजे भयंकरच. पण म्हणून सायकलींगच करायची नाही असे तरी का? म्हणून २८ मार्चला पुणे रॅन्डोनी नाईट रायडर आयोजीत केली.
२८ मार्च ला सध्यांकाळी ७ वाजता सुरू होऊन २९ मार्चला सकाळी ८:३० वाजता संपण्याची वेळ होती. मार्ग होता, पुणे विद्यापीठ - कात्रज - कापूरहोळ - चांदणी चौक - लोणावळा - रूपाली असे एकुण २०३ किमी.