सुपर रॅन्डो ! ४०० किमी बीआरएम - माझी लाँग डिस्टन्स सायकलींग कहाणी ४
सुपर रॅन्डो होण्यासाठी प्रत्येकाला २००,३००,४०० आणि ६०० ब्रेव्हे कराव्या लागतात. माझ्या २००,३०० आणि ६०० ह्या तिन्ही झाल्या होत्या. पण मी मध्ये असणारी ४०० स्किप केली. माझी ६०० झाल्यावर पुण्यात ४०० ब्रेव्हे होणार नव्हती, त्यामुळे फेब्रुअरी मध्ये जिथे ४०० असणार होती (गोवा, अहमदाबाद किंवा नाशिकला) तिथे जाणे भाग होते. पण नाशिकची ४००, माझी ६०० झाल्यानंतर लगेच ५ दिवसांनी होती आणि ती मी टाळली. २१ फेबला गोवा आणि अहमदाबादला जी ४०० होणार होती त्यापैकी कुठे तरी जाऊ असे ठरवून मी नाशिकला गेलो नाही.
गोव्याचा विचार केला पण गोव्यात जायला पुण्याहून फारसे कोणी तयार झाले नाही त्यामुळे आयोजकांनी पुण्यात करुया का ह्याची विचारणा सर्वांना केली. नेकी और पुछपुछ? मी लगेच ४०० पुण्यात झाली तर मी तयार आहे, हे दुसर्या मिनिटाला सांगीतलं आणि माझ्याप्रमाणे इतर लोकं मग २००, ३०० आणि ६०० ला तयार झाले. "लास्ट चान्स ब्रेव्हे" असे ह्या चारही राईडचे नामकरण केले गेले. कारण आता उन्हाळा वाढतोय, आणि उन्हात एवढ्या लाँग डिस्टन्स सायकलींग म्हणजे शुद्ध हरपण्याची गॅरंटीच !
३००, ४०० व ६०० शनिवारी, २१ फेबला तर २०० ची लोनावळा, लव्हासा लुप ही रविवारी,२२ फेबला ठेवण्यात आली. माझ्या ग्रूप मधील अभिषेक ३०० करू की ४०० ह्या संभ्रमात होता, मी त्याला ४०० साठी तयार केले आणि २१ ची वाट पाहू लागलो.
किमी - अवधी
200 Km – 13.5 Hrs
300 Km – 20 Hrs
400 Km – 27 Hrs
600 Km – 40 Hrs
1000 Km – 75 Hrs
1200 Km – 90 Hrs
माझी ह्यावेळी ४०० किमी ब्रेव्हे असल्यामुळे मला ती २७ तासात पार करणे आवश्यक होते.
ह्यावेळचा मार्ग पुणे - सातारा - येलुर - सातारा - पुणे असा सरळ होता. वाटेत दोन घाट ( कात्रज आणि खंबाटकी ) व दोन तीन खिंडी आहेत. सुरूवात सकाळी ६ वाजता चांदणी चौकातील कॅफे कॉफी डे पासून होती तर शेवट कॅफे नुक, बाणेरला होता.
आदली रात्र सगळी स्वप्न पडण्यात गेली. नीट झोप आली नाही, मी सकाळी ४:४५ ला चांदणी चौकाकडे जायला निघालो, पण घरून सुरूवातीचला निघाल्यावरच झोप न झाल्यामुळे थकल्यासारखे वाटले. औंधला गेल्यावर मला एक रिक्षावाला दिसला, सरळ त्या रिक्षात बसलो आणि CCD ला पोचलो. तिथे वेळेआधी (रिक्षात) आल्यामुळे मी मस्त पैकी क्रोसाँ घेऊन सकाळचा नाश्ता ५:३० च्या सुमारास केला. यथावकाश सायकल चेक वगैरे पार पडले.
ह्या वेळी नाशिक, मुंबई वरून लोकं आली होती. आमच्यासोबत (४००) यामिनी नावाची एक मुलगी पण होती. सगळ्यांशी हाय हॅलो होतेय तितक्यात अभिषेक आणि अर्जुन देखील आला. अर्जुन देखील ४०० ला भाग घेणार होता. त्याने माझ्यासोबत ६०० करण्याच्या प्रयत्न केला पण तो आजारी पडल्यामुळे त्याने राईड सोडली, तसेच तो नाशिकला ४०० साठी गेला, पण तिथेही तोच प्रॉब्लेम आल्यामुळे दोन्हीकडे DNF ( डिड नॉट फिनिश) मुळे त्याचे मोराल थोडे डाऊन होते.
आम्ही तिघांनी एकत्रच राईड पूर्ण करू असे ठरवले. तिनशेची लोकं आधी निघाल्यावर आम्ही ४०० वाले निघालो अभिषेक, अर्जुन आणि मी असे सोबत निघालो. कात्रजच्या चढा आधीच मी पुढे गेलेल्या सर्वांना गाठले. ३०० मध्ये ह्या वेळी श्री ठिपसे जे आमच्या सोबत ६०० ला होते, ते ही होते. माझ्या २-३ मिनिटे मागे अर्जुन येत होता. पण सकाळी मागे दोन तीन लाईट पाहिल्यावर अभिषेक अन अर्जून सोबत असतील असे मला वाटले म्हणून मी पुढे जात होतो.
कात्रज चढून मी थांबलो असताना टनेल मधून अर्जुन येताना दिसला. अभिषेकासाठी आम्ही थांबलो, पण तो काही दिसला नाही त्यामुळे पुढे जायचे ठरवले. इथेच अभिषेक आणि आम्ही वेगळे झालो.
कात्रज उतार ते शिरवळ सहज ३० /३२ + स्पीडने जाता येते. पण शिरवळ रस्त्यावर लागलो आणि प्रचंड म्हणाव्या अश्या हेड विंडसला आम्हाला सामोरे जावे लागलो. तरीही अर्जुन आणि मी साधारण २७ ते २९ च्या स्पिड ने एरो पोझिशन मध्ये व लो गिअर्स - हाय केडन्सनी ते अंतर कापत निघालो.
आजच आमच्या सायकल ग्रूपमधील आशुचॅम्प आणि ओंकार हे दोघे पुणे ते कन्याकुमारी जायला निघणार होते. ती १० जनांची टीम ४:३० ला निघणार होती, आणि आम्ही ६ वाजता. पण खंबाटकीच्या आधी त्यांना कदाचित गाठता येईल असे मला वाटत होते. शिरवळ पासून ५ एक किमी आधी आशु दिसला. त्याला भेटून बेस्ट लक देऊन मी पुढे निघालो. ही सर्व टीम श्रीराम वडापावला थांबणार होती म्हणून मग तिथे ओंकारला भेटण्यासाठी थांबलो. त्या दोघांना असे सी ऑफ करायला मजा आली. आज त्यांना १५० किमी करायचे होते, पण मला ४०० करायचे होते म्हणून मी वेळ न दवडता पुढे निघालो.
खंबाटकीच्या पायथ्याला आम्ही नाश्ता केला. सोबत श्री ठिपसे आणि राम हे दोघे रायडरपण होते. जे आम्ही आशू व ओंकार गप्पा मारायला थांबल्यावर पास झाले होते. मस्त पैकी पोहे आणि वडापाव ( कार्ब) घेतल्यावर व तिथे ३० मिनिटे घातल्यावर आम्ही ९ च्या सुमारास निघणार इतक्यात अभिषेक देखील तिथे आला. पण आधीच नाश्ता केल्यामुळे आम्ही बाय म्हणून निघालो.
खंबाटकीत बाकी सर्व मागे राहिले. अर्जुन आणि मी पुढे गेलो. मागच्या वेळेसारखे ह्यावेळी काहीही झाले नाही अन हा हा म्हणता इतर लोकांत आणि आमच्यात खूप अंतर पडले. १०:३० च्या आसपास आम्ही सातारा पार केला आणि उंब्रजकडे निघालो. इथे पहिला चेक पाँइट होता. ३०० वाले इथून परत फिरणार होते. आता ऊन खूपच जाणवू लागले. आम्ही दोघेही त्या हेड विंडस आणि उन्हाचा सामना करत १२:१६ ला चेक पाँईटवर पोचलो. तेंव्हा तेथील नोंद घेणारे स्वयंसेवक नुकतेच आले होते. १२:१६ चा स्टॅम्प घेऊन आम्ही कराडच्या दिशेने पुढे निघालो. १ च्या आधी आम्ही ऑलरेडी कराडला पोचलो आणि तेथील महिंद्रा एक्झेक्युटिव्ह मध्ये मस्त पैकी जेवण केले. इथे आम्ही ४५ मिनिटे थांबलो. अजून ४० किमी गाठले की एकुण २०० किमी होणार होते. तिथे येलूर इंटरनॅशनल हॉटेलला दुसरा चेक पाँईट होता. भरपूर जेवल्यामुळे मांद्य आले होते आणि सगळी ताकद जेवण पचवण्याकडे जात होती. उन्हामुळे हैराण होऊन आईस क्युब्स आणि थंडगार पाणी सोबतीला घेऊन ते ४० किमी पार केले तेंव्हा ३:३० झाले होते.
२०० किमी यायला आम्हाला दोन मोठ्या व दोन तीन छोट्या ब्रेक्ससहीत ९ तास ३० मिनिटे लागली. पैकी सॅडल टाईम हा ८ तास आणि उरलेले पावणे दोन तास ब्रेक्स मध्ये गेले होते. म्हणजे इथपर्यंत अॅव्हरेज स्पीड २५+ होता आणि तो ही हेडविंडस आणि उन्हामध्ये. आम्ही येलूरला ४५ मिनिटे ब्रेक घेतला. फक्त चहा घेतला कारण इतक्या भरपेट जेवणानंतर अजून काही जाईल असे वाटत नव्हते.
त्यावेळात मोबाईल चार्ज करताना इतरांचे स्टेटस बघितले. तर शेवटची काही लोकं पहिल्या चेक पाँईटला २:१० ला आली होती. ४:३० वाजता परतीच्या प्रवासाला सुरूवात केली. १२ एक किमी गेल्यावर मला अभिषेक येलूरकडे जाताना दिसला. त्याला बेस्ट लक दिले. तिथून पुढे ५-६ किमी नंतर आणि तिघे दिसले. आता आमच्यात आणि त्यांच्यात निदान २ ते अडीच तासाचे अंतर बिल्ड झाले होते.
येलूर ते कराड हे ३९ किमी अंतर आम्ही सव्वा तासात पार केले. ह्या मार्गावर मी आता किंग ऑफ माऊंटेन (KOM) आहे. म्हणजे पहिला आहे. ६ वाजायचा आत कराड पार झाले आणि मग मी उरलेल्या वेळेचे गणित बांधू लागलो. गरम हवा काही पाठ सोडत नव्हती. होता होता शार्प ८:३० ला आम्ही दोघेही सातार्यात येऊन पोचलो. आता केवळ ११० किमी बाकी होते आणि केवळ ८:३० वाजले होते. जेवणचा ४५ मिनिटाचा ब्रेक घेतला तरी आम्ही रात्री दिड - पावनेदोन वाजता पोचू शकणार होतो असे वाटायला लागले.
आम्ही अजून २० किमी अंतर पार केले, ९:३० च्या आतबाहेर वाजले असावेत आणि घात झाला. अर्जुनाचा लाईट बंद पडला !! आम्ही मग सर्व कनेक्शन वगैरे चेक केले पण काही फायदा झाला नाही. त्यात १५ एक मिनिटे गेली.
त्याच्याकडे सुदैवाने दोन लाईट होते. एक हेल्मेट वर १०० ल्युमिन्सचा आणि हॅन्डल बारवर १२०० ल्युमिन्सचा. तो १२०० वाला बंद पडल्यामुळे त्याला फारसे दिसेनासे झाले. टेक्निकली त्याच्याकडे लाईट होता ही फारच पॉझिटिव्ह गोष्ट होती अन्यथा तो डिस्क्वालिफाय होणार होता.. मग मी त्याला म्हणालो की तू तो हेल्मेटचा दिवा लाव आणि माझ्या सोबतच राहा. आपण दोघेही माझ्या लाईटच्या प्रकाशात जाऊ शकतो. सेम स्पीड ठेवू नी हळू जाऊ. तसेही ९ वाजले होतेच तर आम्ही आधी जेवायचे ठरवले व अजून एक ४५ मिनिटे ब्रेक घेऊन स्टॅटजी ठरविली की तो माझे व्हिल फॉलो करेल. दोघांच्या व्हिल मध्ये फारतर १ फुटाचे अंतर राहायला, जास्त झाले तर तो आवाज देईन व मी स्पीड कमी करेल.
१० वाजता जेंव्हा मी आमच्या ग्रूपला कळवले की आता फक्त ९० किमी बाकी आहेत. तेंव्हा ३०० करणारे दोन लोकं सुरूर फाट्यावर होते. म्हणजे केवळ ३० किमी समोर. माझे सायकलिंग बडीज मला रात्री रिसिव्ह करायला येतो असं म्हणाले, पण खूप रात्र असल्यामुळे त्यांना मी नको म्हणालो.
वर ठरवलेली स्ट्रॅटजी राबवत आम्ही पुढे येत राहिलो. सातारा ते खंबाटकी हे पूर्ण अंतर तसा चढच आहे. आता स्पीड अगदीच कमी झाला होता. शिरवळ क्रॉस केले तेंव्हा १ वाजला होता. तिथे थांबून परत थंड पाणी वगैरे घेतले. थकायला होत होते. मी माझ्याकडे जर्सीमध्ये नेहमी खजूर आणि काजू ठेवतो. त्याचा एक डोस आम्ही दोघांनी घेतला. आणि निघालो. रात्री २:४५ वाजता आम्ही दोघे वारजेला पोचलो. तिथून पुढे अजिबात जावे वाटत नव्हते. मग रस्त्यावर २० एक मिनिटे विश्राम केला आणि बाणेरकडे निघालो. ते १३ किमी अंतर कापायला मात्र वेळ लागला नाही. आम्ही दोघेही ३:२५ च्या आसपास कॅफे नुकला पोचलो. मी ठरवलेल्या वेळेच्या दिड तासानंतर पोचलो. पण जर अर्जून कडे मोठा लाईट असला असता तर कदाचित आम्ही २ ला पोचलो असतो. पण ते महत्त्वाचे नव्हते. आम्ही पोचलो हे महत्त्वाचे होते.
माझ्या २००,३००,४०० आणि ६०० अश्या चारही राईड झाल्यामुळे मी आता " Super Randonneur " झालो. सुपर झाल्यामुळे ऑगस्ट २०१५ मध्ये होणार्या पॅरिस - ब्रेस्ट - पॅरिस ( PBP) १२०० किमी अल्ट्रा ब्रेव्हेला क्वालिफाय झालो. ह्या मदर ऑफ ब्रेव्हे मध्ये जगभरातून ५-६००० लोकं क्वालिफाय होतात. त्या सिलेक्ट ग्रूप मध्ये आता मी पण आहे ह्याचा एक वेगळा आनंद ४०० पूर्ण करताना मिळाला.
माझे स्टॅट :
सुरूवात : सकाळी ६, २१ फेब.
समाप्त : सकाळी ३:३० २२ फेब.
पूर्ण वेळ : २१ तास ३० मिनिटे
सॅडल टाईम १७:२५ मिनिटे
आणि ब्रेक्स ४ तास. वेळेआधी ५:३० तास माझी राईड संपली.
ह्यावेळी मॅक्स स्पीड ६२ किमी प्रतितास, अॅव्हरेज २३.४ आणि एलेवेशन गेन ९०२० फुट !
सकाळी ४:१० ला घरी पोचलो. अजिबातच झोप येत नव्हती. "सुपर सिरीज" झाल्यामुळे आता सायकलींग मध्ये पुढे काय हा प्रश्न मला अॅन्टी क्लायमॅक्स सारखा कॅफे नुक ते घर ह्या प्रवासात पडला.
द जर्नी इज इम्पॉर्टंट. द डेस्टिनेशन वॉज नॉट. असेच काहीसे मला कैलास परिक्रमा केल्यावर झाले होते.
रविवार सकाळ होती. तसेही सकाळी ८:५० ला भारत - साउथ अफ्रिका मॅच होती त्यामुळे झोप अशी आलीच नाही. ८:३० ची वाट बघत आणि इतरांना माझे अपडेट देत पडून राहिलो. अभिषेक सकाळी ८ वाजता पोचला आणखी दोघे लोकं सकाळी ९ वाजता पोचले.
खरे तर ही अचिव्हमेंट वगैरे फार मोठी नाही. पण भारतातील प्रतिकूल परिस्थितीमुळे ( रोड, ट्रॅफिक) ही नक्कीच एक अभिमानास्पद बाब होते. माझी राईड म्हणजे माझी सायकल ह्या चारही वेळात एकदाही पंक्चर झाली नाही वा दुसरा कुठला त्रास दिला नाही. (शी इज अ गुड बेबी.)
सलग २०० किमी पर्यंत सायकल चालवणे हे खूप वेगळे आहे. पण एकदा का तुम्ही ३०० + किमी चालवले की तुम्ही खरे एन्ड्युरंस रायडर. कारण सलग ३००, ४००, ६०० इ इ किमी चालवण्यासाठी लागणारे इंधन म्हणजे तुमचे शरीर आणि मन तुम्हाला माहिती पाहिजे. कधी तुम्ही बाँक होणार, किती दुखापत सहन करणार? तुमची मनस्थिती कशी असणार? रत्यावर एकट्याने, त्यात हेडविंडस अन उन्हात तुम्ही तग धरणार का? हे सगळे त्यात येते. ३०० मध्ये तुम्हाला स्पीड नसेल तर मध्यरात्री पर्यंत चालवावी लागते. आणि ४०० मध्ये एक पूर्ण दिवस, ( २४ तास + अजून काही तास ३ ) चालवावी लागते. तर ६०० मध्ये दोन दिवस. ह्यात तुमचा खरा कस लागतो.
सुपर सिरीज वेळेत पूर्ण झाल्यामुळे मी आता पूर्ण जगभरातून जिथे सायकलीस्ट येतात त्या फ्रांसच्या पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस (PBP) ह्या १२०० किमी ब्रेव्हे साठी पात्र ठरलो आहे. तिथे ऑगस्ट २०१५ मध्ये ही ब्रेव्हे आहे.
आता वेध आहेत मदर ऑफ ऑल ब्रेव्हेचे म्हणजे १२०० किमी अल्ट्रा राईडचे. तत्पूर्वी कदाचित एखादी १००० किमीची राईड प्रॅक्टीस म्हणून ७० तासाच्या आत करायचा मानस आहे.
बाब्बो.....अभिनंदन केदार!
बाब्बो.....अभिनंदन केदार!
हार्दीक अभिनंदन आणि त्रिवार
हार्दीक अभिनंदन आणि त्रिवार मुजरा
आधी माहीत नसलेले तपशील कळले.
आता फ्रान्स मधे..... होऊ दे खर्च
हार्दीक अभिनंदन आणि त्रिवार
हार्दीक अभिनंदन आणि त्रिवार मुजरा.!!!!!
अभिनंदन केदार
अभिनंदन केदार
अभिनंदन!
अभिनंदन!
भारीच.. वाचताना एक उत्साह
भारीच.. वाचताना एक उत्साह संचारतो.. खरं आहे, इथल्या प्रतिकूल परिस्थितीत हे साध्य करणे म्हणजे खरा कस लागत असेल... १००० किमी प्रॅक्टीस राइडसाठी आणि १२०० किमी ब्रेव्हे साठी खूप शुभेच्छा!! प्रॅक्टीस राइडचा वृत्तांत पण आवडेल वाचायला..
धन्यवाद अवि, हर्पेन, मनोज
धन्यवाद अवि, हर्पेन, मनोज आणि केदार, बी, डीडी,
हो आता फ्रान्सला गेलो किंवा न गेलो तरी खर्च करायला कमी नाही करायचा. होऊ दे खर्च
मस्त वृत्तान्त.... छानच
मस्त वृत्तान्त.... छानच तपशीलात लिहीलाय, उपयोगी पडेल.
अन हो, अभिनंदन.
>>>> आता वेध आहेत मदर ऑफ ऑल ब्रेव्हेचे म्हणजे १२०० किमी अल्ट्रा राईडचे. <<<< याकरता आत्ताच शुभेच्छा देतो. तिकडे जायची व्हिसा/चलन/पैय्या वगैरेची तयारी लग्गेच करायला लाग. तू तिकडे गेलास जरि तरी आमची कॉलर ताठ होणार आहे इथे.
[मी सायकलने घरून ऑफिसला जातो नुस्ता, तरी मी छाती फुगवून सगळ्यान्ना सांगत अस्तो की माझे काही नेटमित्र ना, पाचसहाशे किमीच्या बीआरएम करतात.... अन सांगताना आव असा असतो की जसा काही तुझ्या मागोमाग मीच सायकल चालवीत असतो! ]
अभिनंदन आणि दंडवत केदार ,
अभिनंदन आणि दंडवत केदार , इतक्या कमी कालावधीत चारही बीआरएम यशस्वी केल्यास - ग्रेट
१२०० साठी शुभेच्छा .
अभिनंदन. आणि पुढील
अभिनंदन. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आपण कसं प्रीपेयर होता हेही सांगितल तर बर होईल. म्हणजे पायांसाठी मसाज, वा काही खास डायेट. स्पर्धेवेळी आपल्यासोबत काय काय समान/तयारी करून नेता.. खूप इन्स्पायर व्हायला होतं म्हणून विचारतोय
अभिनंदन! सहीच एकेक विक्रम
अभिनंदन!
सहीच एकेक विक्रम करताय.
लिंबु, किकु, अरविंद, साती
लिंबु, किकु, अरविंद, साती धन्यवाद.
साती तुझी सायकलींग किती किमी पर्यंत आली आता. (मोदी बाफ मध्ये राम नाही, सायकलीत आहे. )
अरविंद,
माझे रुटीन :
लाँग डिस्टन्ससाठीची मुख्य तयारी ही कित्येक महिने आधी रोजच्या राईड मध्ये होत असते.
सहसा मी आठवड्यातून तीन ते पाच राईड करतो. २५ ते ४० च्या दोन आणि ८० ते १५० + ची एक किंवा दोन. पैकी पहिल्या दोन टेम्पो राईड म्हणजे स्पीड मध्ये असतात. High intensity rides साधारण २८ ते ३० किमी प्रति घंटे ह्यात विविध इंटरव्हल ट्रेनिंग असते. म्हणजे हाय केडन्स, हाय स्पीड, फिक्स गिअर ( नो चेंज ), झोन ४ राईड, शॉर्ट बर्स्टस इत्यादी.
आणि ८० ते १५० मध्ये मात्र स्पीड साधारण २५ +/- किमी प्रति घंटे. आणि एन्डुरंस बिल्ड करण्याला महत्त्व देतो.
सोबत मित्र असतात मग गप्पा मारत मारत ह्या राईड होतात.
सायकलवर दिर्घकाळ बसायला कोअर खूप चांगले लागते, त्यामुळे आठवड्यातून एकदा कोअर बॉडी व्यायाम.
मोठ्या राईडच्या आधी आठवडाभर पूर्ण विश्रांतीच, एक किंवा दोन २० किमीच्या सहज राईड करतो. झोन २ वाल्या. मात्र ह्या आठवड्यात कार्ब इनटेक खूप वाढवतो. रस्त्यावरचे खात नाही.
मसाज वगैरे प्रिपेअर होण्यासाठी घेत नाही. एकदोनदा पोस्ट राईड घेतला आहे. स्पेशली खूप चढण असल्यावर.
स्पर्धेच्या दिवशी माझ्या सोबत खालील गोष्टी असतात.
१. सायकल टुल किट सॅडल बॅग . (ती रोजच असते) ज्यात, २ ट्युब, पंक्चर कीट, मल्टी ड्रायव्हर टुल असतं.
२. ४०० आणि ६०० ला हॅन्डलबार बॅग पण. ज्यात पेन किलर्स, एकदोन फळ, व्हॉलिनी असे असते.
३. सायकल जर्सी मध्ये दोन केळी, हवेचा पंप, रुमाल, पैसे, मोबाईल, एनर्झाल एनर्जी ड्रींक्सची पावडर, प्रोटीन पावडर इत्यादी असतं
४. सायकल फ्रेमला दोन बॉटल केजेस आहे, तिथे ७५० मिलीच्या दोन पाण्याने भरलेल्या बाटल्या नेहमी असतात.
५. आणि मी गाणी खूप ऐकतो त्यामुळे हेडसेटस आवश्यक.
तुम्ही जरूर सुरूवात करा. बेस्ट लक !
सुप्पर केदार. खूप खूप
सुप्पर केदार. खूप खूप अभिनंदन.
जबरी रे केदार... परत एकदा
जबरी रे केदार...
परत एकदा माबो सायकल गटग करायला पाहिजे आता...
व्वा, पूर्वतयारीची माहिती छान
व्वा, पूर्वतयारीची माहिती छान सांगितली.
बाकी व्होलिनी वगैरे तर माझ्याबरोबर नेहेमीच कमरेच्या पाऊच मधेच असते. केव्हाही क्रॅम्प येतो ना! अगदी ऑफिसात बसल्याबसल्याही... कधी झोपेतही (घरी - ऑफिसात नै ).
शिवाय दम्याचा इनहेलरही सतत बाळगतो. आता फक्त इतकेच शिल्लक आहे की जर थोड्या पन्नास साठ किमीच्या राईडला बाहेर पडलो तर कॅरी करता येण्यासारखा ऑक्सिजन सिलेण्डर अन मास्कही सोबत ठेवावा लागेल.... जोक नै करते, इट्स अ फॅक्ट !
पण तुझ्या वर्णनामुळे प्रोत्साहित होऊन आपण तर ठरवलय की किमान २०० किमी इतकी तयारी करायचीच.
या आठवड्यात गिअर बसवून घेतोय.
अभिनंदन केदार, धन्य आहेस!
अभिनंदन केदार, धन्य आहेस!
जबरदस्त !!! मनःपूर्वक अभिनंदन
जबरदस्त !!!
मनःपूर्वक अभिनंदन
बापरे! काय सही आहे हे.
बापरे! काय सही आहे हे. अभिनंदन. पुढील आव्हानांसाठी शुभेच्छा.
सही केदार! अभिनंदन. जबरदस्त
सही केदार! अभिनंदन. जबरदस्त निर्धार आहे तुझ्याकडे.
मस्त! केवळ जबरी! पॅरिसच्या
मस्त! केवळ जबरी!
पॅरिसच्या १२०० साठी गुड लक!!
जबरी केदार ! अभिनंदन.. !
जबरी केदार ! अभिनंदन.. !
पॅरिसचं बुकिंग करून टाक लगेच.
धन्यवाद आडो, हिम्या, लिंबू,
धन्यवाद आडो, हिम्या, लिंबू, चिमण, अगो, संपदा, आशूडी, शुगोल, पराग.
परत एकदा माबो सायकल गटग करायला पाहिजे आता.. >> करेक्ट सायकल राईड ६ - हिअर वी कम. तयार असणार्यांनी हात वर करून सांगावे.
तुझ्या वर्णनामुळे प्रोत्साहित होऊन आपण तर ठरवलय की किमान २०० किमी इतकी तयारी करायचीच >>
देअर यु गो! असं दिसतं की तू हायड्रेट राहत नाहीस म्हणून क्रॅम्प येतात. भरपूर पाणी, भरपूर इच्छाशक्ती आणि थोडेसे परिश्रम = १०० जस्ट राईड इट !
पॅरिसचं बुकिंग करून टाक लगेच >> हो करायला हवे.
अरे वा !! अभिनंदन केदार !!
अरे वा !! अभिनंदन केदार !!
भारी वाटले वाचून! आम्ही काही सायकलींग मध्ये नाही पण आता हाफची ट्रेनिंग सुरू आहे. तू लिहिल्या प्रमाणे मला सुद्धा खजुर आणि काजू हे खूप चांगले वाटतात न्युट्रिशन म्हणून. तू जे के ओ एम सांगितले ते वाचून पूर्वी मुंबई - पुणे सायकल स्पर्धेत "घाटांचा राजा" असायचा त्याची आठवण झाली
जबरी.. मनःपूर्वक अभिनंदन.
जबरी.. मनःपूर्वक अभिनंदन. तसाही माझ्यासाठी तू म्हणजे सायकलिंगचा हिरोच आहेस. आणि हिरोला नवनवीन शिखरे पादाक्रांत करताना फॅन्सना खूप आवडते..
जबरी.. लिहिलंय पण
जबरी.. लिहिलंय पण मस्त.
पॅरिसला शुभेच्छा
लै म्हणजे लैच भारी केदार!!
लै म्हणजे लैच भारी केदार!! पॅरिस ग्रां ब्रेवेसाठी मनापासून शुभेच्छा!
मी अप्रिलम्ध्ये फुल मॅराथॉन टार्गेट करतोय. त्यानंतर २०० किमीची ब्रेवे करायचे फार मनात आहे. जिथे राहतो सध्या तिथूनच आयोवातल्या बहुतांश ब्रेवे सुरू होतात. सायकलवर भांडवली खर्च करायचा मात्र फार जीवावर येते पळायला कसे काही लागत नाही शूज, हाफ चड्डी अणि शर्ट सोडल्यास!
जबरदस्त !! अभिनंदन !!
जबरदस्त !! अभिनंदन !!
मस्त रे.. युरोपात कधी येतोयस?
मस्त रे.. युरोपात कधी येतोयस?
अभिनंदन केदार! वर्णनही एकदम
अभिनंदन केदार! वर्णनही एकदम थरारक वाटले वाचताना.
टण्या, तुलाही बेस्टलक
टण्या, तुलाही बेस्टलक मॅरॅथॉनकरता !
सायकल गटगच्या काही हिन्टस द्या बरे.... कुठून कुठे, किति अंतर, कोणत्या दिवशी वगैरे
Pages