पूर्वतयारी
दक्षिण आफ्रिकेला जाण्याचं अनेक वर्षांपासून मनात होतं. २०१७ साली न्यूझीलंडला गेलो तेव्हाही आधी द.आ.च मनात होतं. पण त्याच्या आदल्या वर्षीच केपटाऊनमधल्या पाण्याच्या दुर्भिक्षाच्या बातम्या वाचल्या होत्या. त्यामुळे तेव्हा ते लांबणीवर टाकलं गेलं, ते यंदा प्रत्यक्षात आलं.
भारतातुन परत परदेशात घरी जाताना तुम्ही काय काय घेऊन जाता? ह्यात खाद्यपदार्थ, कपडे, औषधे इत्यादी सर्वच गोष्टींबद्दल चर्चा करूयात. हा धागा पहिल्यांदा जाणाऱ्या लोकांना उपयोगी आहेच पण अधिक कालावधीसाठी बाहेर राहिलेल्या लोकांना सुद्धा उपयोगी असेल. शिवाय वर्षभरात आपल्या गावात काही नवीन पदार्थ देखील आले असतील. त्याची सुद्धा इथे माहिती मिळू शकते.
चला लोक्स मग चर्चा करूयात.
जुलै मध्ये आम्ही (मी आणि माझा नवरा) US ला long term साठी शिफ्ट होतोय ..माझा हा पहिला च प्रवास आहे ..इथून जाताना काय पॅकिंग करायचं ..काय काय वस्तू एथून घेऊन जायच्या या बाबत थोडी माहिती मिळाली तर उत्तम च ..! धन्यवाद in advance
भाग ३= http://www.maayboli.com/node/54122
ह्या ट्रीप ला जायचे ठरवले तेंव्हाच ऑश्विझ हा नाझींचा ज्यू कत्तल खाना पहायचा आहे, हे माहिती होतं. त्या बद्दल अनेक ठिकाणी वाचलं होत. शिंडलर्स लिस्ट, लाईफ इज ब्युटीफुल सारख्या सिनेमां मधून पाहिलं होत. तरीही एक अनामिक रुख रुख मनाला लागली होती. आपण तिकडे का जातोय? हा प्रष्ण पण मनात येत होता. खरच का गेले मी तिकडे?
भाग २ - http://www.maayboli.com/node/54109
एखादी भारदस्त मध्यमवयीन स्त्री जर तोकडे कपडे घालून आपल्या समोर उभी राहिली तर आपल्याला जसे विचित्र वाटेल तसे प्राग ला आल्यावर माझे झाले.
पूर्वी झेकोस्लोव्हाकियाचा भाग असणार्या प्राग ( मूळ उच्चार ‘प्राहा’) मध्ये आम्ही आलो तेंव्हा भूर भूर पाउस पडत होता. वातावरण सगळे झाकोळून गेले होते. थंडी पण होती. आता प्राग झेक मध्ये आहे. ह्याला गरीबांचे Paris म्हणतात. कारण Paris पेक्षा इकडे भयानक स्वस्ताई आहे. इमारती तशाच आहेत. आर्थात हे म्हणजे उगाचच लावलेली उपाधी वाटली.
भाग १- http://www.maayboli.com/node/54087
बर्लिन शहर हे इतर युरोपियन शहरांसारख अति modern नाही. थोडी जुन्या वळणाची आजीबाई असावी तस त्याचं रूप आहे. अनेक बॉम्ब झेलल्याच्या खुणा जागोजागी आहेत. बर्लिन ला गेल्या पासून कधी एकदा बर्लिन wall चे अवशेष पहातोय असे होवून जाते. गम्मत म्हणजे आम्ही सहज म्हणून फिरून आलो तेंव्हा सारखी दुपदरी विटा सारखी ओळ पूर्ण रस्त्याच्या मध्ये नागिणी सारखी उठून दिसत होती. गाईड म्हणाली हीच बर्लिन भिंतीची खूण. भिंत जेंव्हा तोडली तेंव्हा त्याची आठवण म्हणून ही ओळ शहरातले रस्ते अजूनही छाती वर वागवत आहेत.
एकदा जाण्याचे ठरवल्यावर मग मात्र ह्या विषयावर व देशांवर माहिती काढायला सुरुवात केली. सुरवात अर्थातच जर्मनी पासून केली. जर्मनी मध्ये सगळ्याच महत्वाच्या शहरांची दुसऱ्या महायुद्धात हानी झाली. पण त्यातही बर्लिन आणि ड्रेसडेन ची अपरिमित हानी झाली. बर्लिनचे तर नंतर लचके तोडले गेले. हिटलर स्वत: तिथे रहात असल्याने तसेच नाझीचे मुख्यालय इथेच असल्याने सहाजिकच इकडे सगळ्यात जास्त बॉंब वर्षाव झाला. त्यामुळे सुरुवात बर्लिन ने करायची ठरली. मग ड्रेस्डेन आणि मग इतर देश. साधारणत: माझा प्रवास असा झाला
बर्लिन- ड्रेस्डेन-प्राग-क्रेको-झाकोपाने-बुदापेष्ट-झाग्रेब-इस्त्रीया-लेक बोहींज –मुंबई
अनेक वर्ष एखाद्या भागाबद्दल आपल्याला उगाचच आकर्षण असतं. अनेकदा मित्रांमधे गप्पा मारताना त्याची खिल्ली उडवली जाते. त्यात काय पहायचय... हा प्रश्न विचारला जातो. तरीही तुमची इच्छा कायम रहाते. माझं असच काहीस झालं. दूसरे महायुद्ध आणि त्याचे परिणाम ह्या बद्दल मनात खूपच कुतूहल होतं. कोवळ्या वयात व नंतरही त्या संदर्भातली अनेक पूस्तके वाचली होती. ( नाझी भस्मासुराचा उदयास्त, दूसरे महायुद्ध, वॉर्सा ते हिरोशिमा, शिंडलर्स लीस्ट, डायरी ऑफ आन फ्रँक, पहिले महायुद्ध इ.इ.इ) त्या मुळे कुठेतरी हे होरपळलेले देश पहायची इच्छा होती. मुख्य यादीत जर्मनी--- ते ही बर्लीन, मुख्य फ्रँक्फुर्त किंवा हँबर्ग नव्हे.
माझे आई वडिल पुढल्या महिन्यात अमेरिकेला येत आहेत. ते साधारण ४-५ महिने इथे असतील. दोघेही ६०+ आहेत. तर कुठला इन्शुरन्स घ्यावा ह्याबद्दल कुणाला माहिती असल्यास कृपया कळवा. जर एखाद्या कंपनीचा चांगला वा वाईट अनुभव असेल तर नक्की लिहा.
ह्या सर्व माहितीमुळे मला योग्य तो इन्शुरन्स घेण्यास सोपे जाईल.
मंडळी, आता हा लेख पूर्ण झाला आहे. अर्धवट लिखाणाला सुध्दा तुम्ही प्रतिसाद दिलात. त्यामुळे हुरुप आला. खूप खूप धन्यवाद. आत्ता फोटो टाकतानाही नंदनने तातडीने मदत केली त्याबद्दल त्याचे आभार.
आपल्या प्रतिसादांची वाट पाहात आहे.
----------------------------------------------------------------------------------------