दगडधोंडे, डोंगरकपारी - ३
‘हर्मानसचं सरप्राइज पॅकेज’ असं मागच्या लेखात म्हटलं, कारण आमच्या Hermanus experience चा काही भाग दगडधोंडे कॅटेगरीत मोडणारा आहे. तर काही भाग nature trails कॅटेगरीत मोडणारा आहे. शिवाय ओंजळभर हर्मानस उरणारच आहे, जमलं तर त्यावरही लिहिणार आहे.
गार्डन रूट – दगडधोंडे, डोंगर-कपारी : २
टूरचा नववा दिवस. हर्मानसचं सरप्राइज पॅकेज बॅगेत बांधून आम्ही Knysna ला पोहोचलो होतो. (उच्चार : नाय्ज्ना, ‘ज’ जहाजातला).
हर्मानस ते नाय्ज्ना अंतर बरंच आहे. इतका कार प्रवास करण्याऐवजी आम्ही एक पर्याय शोधला. हर्मानसहून कॅबने उलटं केप टाऊनला आलो. (तास दीड तास प्रवास). केप टाऊनहून विमानाने George ला गेलो. (एक तास). जॉर्जहून कारने नाय्ज्नाला गेलो. (अर्धा तास). motion sickness वाल्यांना असे उलटे घास घ्यावे लागतात. असो.
पूर्वतयारी
दक्षिण आफ्रिकेला जाण्याचं अनेक वर्षांपासून मनात होतं. २०१७ साली न्यूझीलंडला गेलो तेव्हाही आधी द.आ.च मनात होतं. पण त्याच्या आदल्या वर्षीच केपटाऊनमधल्या पाण्याच्या दुर्भिक्षाच्या बातम्या वाचल्या होत्या. त्यामुळे तेव्हा ते लांबणीवर टाकलं गेलं, ते यंदा प्रत्यक्षात आलं.
मंडळी, मध्यंतरी खंड पडलेली 'चित्रपट परिचय' ही लेखमालिका पुन्हा सुरु करतो आहे. ज्यांना ही मालिका नवीन आहे, त्यांच्यासाठी आधीच्या लेखांचे दुवे या लेखाच्या शेवटी दिले आहेत. पहिल्या लेखाच्या सुरवातीसच स्पष्ट केल्याप्रमाणे हे चित्रपट परिक्षण नाही. तर ही लेखमालिका म्हणजे फक्त आणि फक्त 'मला आवडले, तुम्हाला सांगितले'च्या धर्तीवर मला आवडलेल्या काही चित्रपटांची ओळख करुन देण्याच्या हेतूने लिहीत आहे.
चला तर मग आस्वाद घेऊया ह्यावेळच्या चित्रपटाचा.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -