जुनच्या शेवटी १० दिवसांसाठी इंग्लंड-स्कॉटलंड करत आहोत. २ फॅमिलीज आहेत - ऐकूण ७ जणं.
तर खालील विषया संदर्भात सल्ले हवे आहेत.
१. इथलं ड्रायव्हिंग लायसन्स तिथे चालतं ना? लंडनमध्ये पब्लिक ट्रान्स्पोर्ट वापरणार आहोत. पण लंडनहून स्कॉटलंडला जाताना कार हायर करून घेऊन जाण्याचा विचार आहे.
२. लंडनहून हायर केलेली कार पुढे ग्लासगो अथवा एडिंबरो ला सोडून देता येईल ना? कारण परत येताना वेळ वाचवण्यास ट्रेननं येण्याचा विचार आहे.
३. स्कॉटलंड कारनं करावं ना? आम्हाला जी ठिकाणं बघायचीयेत त्याकरता कार असल्यानं फ्लेक्सिबिलिटी राहील ती बरी पडेल असं वाटतंय.
४. जूनच्या शेवटी बरोबरची फॅमिली परतल्यावर आम्ही तिघं कंट्रीसाईडला - वेल्स, आयर्लंडही चालेल - निदान २ ठिकाणी आणि मग लंडनला रहाण्याचा प्लॅन आहे. त्याकरता कृपया सुरेखशी ठिकाणं सुचवा.
५. लंडनमधे हाऊस रेन्ट करण्याचा विचार आहे. तर कोणता एरिया बरा पडेल?
युकेला भेट - सल्ले द्या
Submitted by मामी on 5 May, 2016 - 04:11
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://www.cntraveller.in/sto
http://www.cntraveller.in/story/9-countries-where-you-can-drive-against-...
मामी इथे बघा. बाकी लोक सल्ले देत्तीलच, पण माबोवरच्या मिलिंदा या आयडी ला विपु मध्ये किंवा सम्पर्क करुन विचारा. मिलींदा युके मध्ये काही वर्ष होता, आय होप त्याचे फिरणे झाले असेलच. तसेच सुमुक्ताला पण विचारुन बघा.
http://www.maayboli.com/node/53864
धन्यवाद रश्मी.
धन्यवाद रश्मी.
१. इथलं ड्रायव्हिंग लायसन्स
१. इथलं ड्रायव्हिंग लायसन्स तिथे चालतं ना? लंडनमध्ये पब्लिक ट्रान्स्पोर्ट वापरणार आहोत. पण लंडनहून स्कॉटलंडला जाताना कार हायर करून घेऊन जाण्याचा विचार आहे.
भारतातलं लायसन्स इकडे १ वर्ष चालतं. लंडन मध्ये फिरायला पब्लिक ट्रान्स्पोर्ट सगळ्यात उत्तम आहे. लंडन ला आलात कि ट्यूब स्टेशन ला oyster कार्ड विकत घ्या. तेच सगळ्यात स्वस्तं पडतं इकडे पब्लिक ट्रान्स्पोर्ट मधे फिरायला. ऑनलाइन कार हायर प्राईसेस कंपेयर करून बघ. opodo, rentalcars, skyscanner.net/carhire, travelsupermarket.com/en-gb/car-hire/, autoeurope.co.uk अश्या sites वर किमतीचा अंदाज घ्या.
२. लंडनहून हायर केलेली कार पुढे ग्लासगो अथवा एडिंबरो ला सोडून देता येईल ना? कारण परत येताना वेळ वाचवण्यास ट्रेननं येण्याचा विचार आहे.
pick आणि drop locations सेपरेट असं बुक करता येतं. जेंव्हा कार हायर प्राईसेस कंपेयर कराल तेंव्हा pick आणि drop locations वेगळी टाकून बघा किती फरक पडतो किमती मध्ये. ट्रेन travel खूप जास्त महाग आहे इकडे, त्यामुळे तिकिटे लवकर बुक करा. स्वस्तात मिळतील.
३. स्कॉटलंड कारनं करावं ना? आम्हाला जी ठिकाणं बघायचीयेत त्याकरता कार असल्यानं फ्लेक्सिबिलिटी राहील ती बरी पडेल असं वाटतंय. - स्कॉटलंड साठी कार सगळ्यात बेस्ट. दोन्ही कडून ट्रेन ने जाऊन direct स्कॉटलंड ला कार हायर केलीत तर पैसे आणि वेळ दोन्ही वाचतील
४. जूनच्या शेवटी बरोबरची फॅमिली परतल्यावर आम्ही तिघं कंट्रीसाईडला - वेल्स, आयर्लंडही चालेल - निदान २ ठिकाणी आणि मग लंडनला रहाण्याचा प्लॅन आहे. त्याकरता कृपया सुरेखशी ठिकाणं सुचवा. - northern आणि southern wales दोन्ही सुंदर आहेत. तुम्हांला नक्की काय बघण्यात रस आहे त्यानुसार ठिकाणं निवडा. - castles, national parks, etc. snowdonia खूप सुंदर आहे.
५. लंडनमधे हाऊस रेन्ट करण्याचा विचार आहे. तर कोणता एरिया बरा पडेल? - Harrow , hounslow , wembley , eastham , ilford हि भारतीय bahul ठिकाणं आहेत . लंडन मध्ये खाण्या पिण्या त्रास कुठेच होणार नाही . Airbnb वर prices compare करून बघा काय स्वस्तं पडतंय. जर ३-४ दिवस लंडन मधे राहणार असाल आणि बजेट चा issue नसेल तर सेन्ट्रल लंडन ला राहणे सगळ्यात सोयीस्कर. नाहीतर लंडन झोन ३-४ मध्ये घरं बघा. Acton , harrow, wimbledon , stratford बजेट आणि convenience च्या दृष्टीने चांगलं आहे. लंडन मध्ये बऱ्याच attarctions ला २ for १ तिकिट ऑफर असतात. त्या विषयी गुगल काकांकडून माहिती कडून जा, बरेच पैसे वाचतील.
ओ वेडा ( सॉरी तुम्हाला वै
ओ वेडा ( सॉरी तुम्हाला वै उद्देशुन नाही) तुमचा आयडी बदला हो. एवढी भरभरुन सुंदर माहिती देताय आणी आय डी असा का?:अओ: पाहीजे तर गानवेडा, निसर्गवेडा असा आय डी घ्या.
मामी वेलकम!
किंवा माबोवेडा हॉटेल्स ऐवजी
किंवा माबोवेडा
हॉटेल्स ऐवजी होमस्टे / सर्व्हिस अपा. चालणार असेल तर https://www.airbnb.com/ वर चांगले आणि स्वस्त ऑप्शन्स मिळू शकतील. भारतातला अनुभव चांगला आहे. बाहेर तर नक्कीच चांगला असेल.
धन्यवाद धन्यवाद. वेडा (प्लीज
धन्यवाद धन्यवाद. वेडा (प्लीज आयडी बदलाच बुवा! ) फारच उत्तम सजेशन्स.
महेश, हाऊसच हवंय. निदान ३ बेडरूम्सचं.
आम्ही VRBO च्या थृ लॅकेस्टर
आम्ही VRBO च्या थृ लॅकेस्टर गेट भागात मोठे अपार्टमेंट रेंट ( ३.५ बेड रुंम्स, वॉशर ड्रायर, डिश वॉशर वगैरे असलेले ) केले होते १ आठवड्यासाठी. ट्युब पासून एकदम जवळ. जेवण खाण, ग्रोसरी वगैरे सोयीचे होते.
ऑलिम्पिक्सच्या वेळी कॅनरी व्हार्फ भागात पण राहिलो होतो. ते पण येण्या जाण्याला सोयीस्कर होते .
क्यू गार्डन्स ( Q नव्हे, Kew रॉयल बॉटॅनिकल गार्डन्स ) ट्रेनने जाता येते. तिथे अवश्य जावे. चार सहा तासात मुख्य भाग पाहता येतील - रोझ गार्डन + डाली चे मेमरी ऑफ टाइम शिल्प, जपानी गार्डन, ग्रीन हाउस ( हे २०१४ मधे बांधकामासाठी बंद होते ) वॉटरलिली हाउस, हेन्री मूरची शिल्पे .
ओके. धन्यवाद मेधा. असंच
ओके. धन्यवाद मेधा. असंच हवंय. आखुड शिंगी आणि बहुदुधी टाईप.
धन्यवाद. नावात बदल केलेला
धन्यवाद. नावात बदल केलेला आहे
अजून काही स्पेसिफिक माहिती हवी असल्यास अवश्य संपर्क करा
लंडन मधे फिरायला जुन ते ऑगस्ट हा सर्वोत्तम काळ आहे. तुमची ट्रीप अविस्मरणीय होवो ही सदिच्छा
>>महेश, हाऊसच हवंय. निदान ३
>>महेश, हाऊसच हवंय. निदान ३ बेडरूम्सचं.
तसे असेल तर airbnb वर नक्की शोधा. जगभरातले खुप व्हरायटी ऑप्शन्स आहेत.
एवढ्यातच आम्ही महाबळेश्वर मधे ४ बीएचके बंगला बुक केला होता मोठ्या फॅमिली गटगसाठी.
नावात बदल केलेला आहे >>> है
नावात बदल केलेला आहे >>> है शाब्बास! आता कसं!
तसे असेल तर airbnb वर नक्की शोधा. जगभरातले खुप व्हरायटी ऑप्शन्स आहेत. >>> हो हो. छान आहे ती साईट. आम्ही मागच्या वर्षीच्या कॅलिफोर्निया ट्रीपकरता याच साईटवरून बुकिंग्ज केली होती.
अजून काही स्पेसिफिक माहिती हवी असल्यास अवश्य संपर्क करा
लंडन मधे फिरायला जुन ते ऑगस्ट हा सर्वोत्तम काळ आहे. तुमची ट्रीप अविस्मरणीय होवो ही सदिच्छा
>> जरूर. धन्यवाद.
जबरी प्लॅन, मामी. लंडन च्या
जबरी प्लॅन, मामी. लंडन च्या बाबतीत एक महत्त्वाचे आहे. शहर फिरण्यासाठी तुम्ही सेण्ट्रल लंडन च्या जितके जवळ राहाल तितके चांगले. ती म्युझियम्स, टूर्स व इतर पाहण्यासारख्या अनेक गोष्टी संध्याकाळी लौकर बंद होतात. लांब राहिलात आणि अनेक लोकांना सकाळी एकदम आवरून एकत्र फिरायचे असेल तर खूप वेळ जातो. त्यात आणखी अर्धा पाऊण तास सेण्ट्रल लंडन च्या भागात यायला. त्यापेक्षा थोडे महाग पडले तरी अप्रत्यक्ष फायदा खूप आहे तेथे जवळ राहण्याचा.
त्यापेक्षा थोडे महाग पडले तरी
त्यापेक्षा थोडे महाग पडले तरी अप्रत्यक्ष फायदा खूप आहे तेथे जवळ राहण्याचा. >>> हो बरोबर. खिश्याला परवडलं पाहिजे मात्र. धन्यवाद फा.
लंडन बद्दल १> जर तुम्हाला
लंडन बद्दल
१> जर तुम्हाला खुप ठिकाणी भेट द्यायची असल्यास लंडन पास घेउ शकता. https://www.londonpass.com/london-pass-prices.php
लंडन पास हे बुफे जेवणा सारखे आहे. जर ५०० रुपयाचा बुफे मध्ये जाउन फक्त डोसा खाउन आल्यावर फायदा होत नाही. तसेच लंडन पास घेउन १-२ ठिकाणी गेलो तर फायदा होत नाही. पण जरी ब्रेक ईव्हन होत असेल तरी लंडन पास Fast Track Entry मुळे फायद्यात पडतो. जर ट्रीप ला वेळ असेल तर १०% सवलत मिळाल्या शिवाय घेउ नका. दर १५ दिवसात काही ना काही सवलत येत असते. त्यात तुम्हाला काय बघायचे आहे ते आहे की नाही ते अवश्य पहा.
२> लंडन ट्रेव्हल साठी off peak day pass स्वस्त पडेल. हा पास सोम ते शुक्र सकाळी ७ ते ९-३० मध्ये चालत नाही. लंडन पास with travel ची सोय आहे त्याम्ध्ये ११ वर्षापर्यन्त ची मुले फुकट प्रवास करु शकतात. (with adults)
३> मॅडाम तुसाने (नाव निट लिहता येत नाही ) ला अगाउ बूक केल्यास आणि ३-५.३० च्या वेळेसाठी ५०% सवलत मिळते However these tickets are not refundable.
४> वेंबली जवळ जेवण स्वस्त मिळते आणि सिटी मध्ये राहिल्यास वेळ वाचतो. Travel pass असेल तर सिटी मध्ये राहुन संध्याकाळी वेंबली मध्ये जेवायला जाउ शकता.
५> http://www.premierinn.com/ जर सिटी मध्ये स्वस्तात राहायचे असेल तर. हे बजेट हॉटेल आहे. १८ वर्षापेक्षा कमीची मुले फुकट राहु & खाउ शकतात ( adult must pay for room & breakfast. breakfast is optional). सिटी बाहेर राहाणार असेल तर काही हॉटेल १ बेडरुम -किचन पण रेंट करतात. you can explore it.
6> Long Distance Train tickets can be 50%- 75% cheaper if booked in advance.
आजुन जसे आठवेल तसे लिहिन. Enjoy!
मामी, सल्ला/माहिती तर देता
मामी, सल्ला/माहिती तर देता येणार नाही, पण तुम्ही लोक दरवर्षी मस्त फिरता ते खुप आवडले हे सांगायला आले.
साहिल शहाधनधन्यवाद. फार
साहिल शहाधनधन्यवाद. फार उपयोगी आणि प्रॅक्टिकल टिप्स आहेत.
सुनिधी धन्यवाद.
युके व्हिसाच्या अर्जात एक अशी
युके व्हिसाच्या अर्जात एक अशी रिक्वायरमेंट आहे :
Evidence of family members remaining in your home country whilst you travel.
तर नक्की काय काय कागदपत्रं अपेक्षित आहेत या करता?
North Wales tar Sundar ahech.
North Wales tar Sundar ahech. Pun jamla tar lake district ani Bath la pun bhet dya.
नीलमपरी, धन्यवाद. लेक
नीलमपरी, धन्यवाद. लेक डिस्ट्रिक्ट आणि बाथ दोन्ही अजेंडावर आहेत.
मामी, City of Bath तुमच्या
मामी, City of Bath तुमच्या agenda वर आहेच. खूप छान city आहे. आणि बेस्ट पार्ट म्हणजे ३-४ ठिकाणं बाथ स्टेशनपासून जवळपासच आहेत.
Roman Baths (tickets - adults £13.50 (July and August £14); 65 and over £11.75, children 6-16 £8.80. But, worth it definitely.)
Fashion museum
The Royal Crescent (फक्त बाहेरून बघण्यासाठी. एक वेगळी आणि छान वास्तुरचना म्हणून.)
The Circus and Assembly Rooms
Bath Guildhall Market (नक्की जा. खूप खूष होऊन आणि खिसा हलका करून याल )
Prior Park Landscape Garden
लंडन आय आणि मॅडम तुसाँ
लंडन आय आणि मॅडम तुसाँ म्युझियम बघण्यासाठी ट्रेनच्या तिकीटाबरोबर २ फॉर १ अशा ऑफर्स दिसत आहेत. त्याबाबत काही शंका :
ही ऑफर मिळवण्यासाठी त्या अॅट्रॅक्शनला जाताना ट्रेननं जावं लागतं की कोणत्याही दिवशी ट्रेनचं टिकिट असेल तरी ते चालतं?
आमच्याकडे एडिंबरा ते लंडन अशी २९ जुनची ४ अॅडल्टसची तिकिटं ऑलरेडी काढलेली आहेत. तर त्या तिकिटांवर आम्हाला २२ जुनला लंडन आय ची २ फॉर १ ऑफर मिळू शकते का? तसंच लंडन ते लेक डिस्ट्रिक्ट हा प्रवास २६ जुनला ट्रेननंच करायचा विचार आहे. तर त्या (आधीच काढणार आहोत) तिकिटांवर मॅडम तुसाँ म्युझियम ची २ फॉर १ ची ऑफर २२ जुनला मिळू शकेल का?
ही 'फाइन प्रिन्ट' तेथे नसेल
ही 'फाइन प्रिन्ट' तेथे नसेल तर आश्चर्य आहे. सहसा ४८ तासात सगळे करा वगैरे असते.
बाकी याव्यतिरिक्त फक्त लंडन आय, मादाम तुसाँ आणि इतर एक दोन गोष्टी यांचीही पॅकेज डील्स असतात, ती दिसत आहेत का? लंडन आय हे एकच संध्याकाळी उशीरापर्यंत उघडे असते बहुधा.
मामी ,माझे यात दोन पैसे. बाथ
मामी ,माझे यात दोन पैसे. बाथ ला प्राईड अँड प्रिजुडाईस च्या जेन ऑस्टिन चे ही घर आहे . इंटरेस्ट असेल तर बघ.
सगळी कडची म्हणजे रस्त्यावर, स्टेशनवर, पबच्या बाहेर आणि जागा मिळेल तिथे सगळीकडे फुललेली फुलं बघून वेडी होशील. ( स्मित)
नुसता केवळ भारताशी संबंधित
नुसता केवळ भारताशी संबंधित इतिहास म्हंटले तरी २-३ दिवस पुरतील इतक्या गोष्टी असतील - टॉवर ऑफ लंडन मधले क्राउन ज्युवेल्स व कोहिनूर, ब्रिटिश म्युझियम मधला भारताशी संबंधित भाग, इम्पिरियल वॉर म्युझियम्/चर्चिल वॉर रूम, जुने नेते राहात होते त्या इमारती, ब्रायटन चा किनारा, ट्राफलगार वरचा विक्टोरिया राणीचा पुतळा व तेथून वेस्ट्मिन्स्टर कडे जाणारा व्हाइटहॉल रस्ता, तेथील नं १०., पार्लमेण्ट, बाजूला बागेत असलेला गांधींचा पुतळा ई.
आणि क्रिकेट वाल्यांकरता लॉर्ड्स, तेथे अजूनही ठेवलेला १९८३ चा प्रुडेन्शियल कप, गांगुलीने शर्ट फिरवला ती गॅलरी, ओव्हल चे मैदान (याची टूर बहुधा फक्त शनिवारी असते. लॉर्ड्स ची तेथील मॅचेस चे दिवस वगळता कदाचित रोज) हे केवळ लंडन मधे, तसेच इतरत्र असलेली ती मैदाने - ओल्ड ट्रॅफोर्ड, ट्रेन्ट ब्रिज, लीड्स, एजबस्टन ई.
रेल्वे फॅन्स करता सुद्धा एक वेगळी लिस्ट करता येइल
ही 'फाइन प्रिन्ट' तेथे नसेल
ही 'फाइन प्रिन्ट' तेथे नसेल तर आश्चर्य आहे. सहसा ४८ तासात सगळे करा वगैरे असते. >>> अच्छा? म्हणजे आम्हाला नाही करता येणार? बघते फाईन प्रिंट आहे का ते.
खरंच इतकं आहे बघण्यासारखं की
खरंच इतकं आहे बघण्यासारखं की मुक्काम थोSSSSडा वाढवून १० दिवसांच्या ऐवजी ६ महिने करावा की काय अशा विचारात .....
नाही ४८ तास काही डील्स मधे
नाही ४८ तास काही डील्स मधे असते. याला असेलच असे नाही.
खरच, इतके सगळे बघायचे असेल तर
खरच, इतके सगळे बघायचे असेल तर महिन्यापेक्शा जास्त मुक्काम करायला लागेल.
फक्त पूर्ण लंडन बघायचे असेल तर ६-७ दिवस तरी लागतिल, नाहीतर पटेल पॉईंट्स करायचे फक्त.
लंडन
- म्युझिअम्स (सायन्स, नॅचरल हिस्ट्री) - १ दिवस
- वॅक्स म्युझिअम, लंडन आय, टॉवर ऑफ लंडन, बिग बेन, ग्रिनिच, - १ दिवस
- ट्रॅफॅल्गार स्क्वेअर, बकिंगहॅम पॅलेस, हाईड पार्क, ऑक्सफर्ड स्ट्रीट (शॉपिंग, हॅरड्स, सेल्फ्रिजेस, बीबीसी इत्यादी) - १ दिवस
- लॉर्ड्स आणि वेगवेगळी मैदाने - १ दिवस
- क्यु गार्डन - १/२ दिवस
बाथ - रोमन बाथ्स - १ दिवस किमान - मृदुला रहाते, तिला जास्त माहिती आहे.
स्ट्रॅटफर्ड अपॉन अॅवन - शेक्सपिअर - १ दिवस
ऑक्सफर्ड / केम्ब्रिज युनी - १ दिवस - भावना रहाते, तिला जास्त माहिती आहे.
लेक डिस्ट्रिक्ट - २ दिवस किमान
वेल्स - २ दिवस किमान
स्कॉटलंड - ३ दिवस किमान, ड्राईव्ह केले तर जास्तिचा १ दिवस
कॉर्नवॉल - २ दिवस किमान
त्या काळात विंबल्डन सुरु असेल. जमल्यास जाऊन मेन कोर्टवर नाही तरी इतर कोर्टवर मॅच बघू शकता. गेला बाजार तिकडे जाऊन मोठ्या स्क्रिनवर सगळ्यांबरोबर मॅच बघण्याचा, त्या वातावरणाअचा अनुभव घेता येईल.
या सगळ्यात एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणि जाण्याचा वेळ धरलेला नाही.
व्हिसासाठी -
आम्ही इकडे (भारतात) आमची प्रॉपर्टी आहे, आई वडिल रहातात याचे पुरावे जोडायचो. ते मेनली तुम्ही तिकडे जाऊन कायमचा मुकाम करणार नाही याच पुरावा म्हणुन द्याय्चे असते,
रहाण्यासाठी -
त्या काळात सगळेच थोडे महाग पडेल. वेंब्ली, हाऊन्स्लो, हॅरो, क्रॉयडन इकडे भारतिय पर्याय मिळातिल. घरेही मिळतिल.
ब्रेड अँड ब्रेकफास्ट पर्यायही चांगला असतो.
प्रिमिअर इन, आयबिस ही हॉटेल्स त्यातल्या त्यात बर्या किमतीत मिळतिल.
मी लंडनला गेले होते तेव्हा
मी लंडनला गेले होते तेव्हा एक पुस्तक वाचल होत . ३६५ डेज इन लन्डन असं. त्याची पहिली ओळच " जो लन्डन ला कंटाळला तो जीवनाला कंटाळला " ही होती.
त्यात तुम्ही रोज ( ३६५ दिवस ) लंडन मध्ये काय कराल, काय पहाल हे लिहील होत. नेहमीची ठिकाण आणि मुझियम्स वैगेरे तर होतीच पण आज काय जगातल्या पहिल्या कॉफीशॉप मध्ये कॉफीपान, उद्या काय तर कंडक्टर असलेल्या हेरिटेज बस मधुन प्रवास, परवा काय १४ व्या शतकातल्या पब मध्ये सन्ध्याकाळ अस ही लिहील होत. वाचायला छानच वाटत होत.
मामी , ते फॉलो केलस तर मुक्काम वर्र्षभर करावा लगेल तुला ( स्मित)
बाकी लंडन खूप छानच आहे. एकाच वेळी ते मॉडर्न ही आहे आणि ऐतिहासिक ही आहे. बिझनेस सेंटर ही आहे आणि टुरिस्ट फेवरेट ही आहे. तिथे लोकशाही आहे पण राणीवर ही त्यांच प्रचंड प्रेम आहे. साधं ही आहे आणि खानदानी ही आहे .
मामी प्रवास वर्णन, परत
मामी प्रवास वर्णन, परत आल्यावर फटुसगट मष्ट हां, सांगून ठिवतंय.... ::राग:
Pages