युकेला भेट - सल्ले द्या

Submitted by मामी on 5 May, 2016 - 04:11

जुनच्या शेवटी १० दिवसांसाठी इंग्लंड-स्कॉटलंड करत आहोत. २ फॅमिलीज आहेत - ऐकूण ७ जणं.
तर खालील विषया संदर्भात सल्ले हवे आहेत.
१. इथलं ड्रायव्हिंग लायसन्स तिथे चालतं ना? लंडनमध्ये पब्लिक ट्रान्स्पोर्ट वापरणार आहोत. पण लंडनहून स्कॉटलंडला जाताना कार हायर करून घेऊन जाण्याचा विचार आहे.
२. लंडनहून हायर केलेली कार पुढे ग्लासगो अथवा एडिंबरो ला सोडून देता येईल ना? कारण परत येताना वेळ वाचवण्यास ट्रेननं येण्याचा विचार आहे.
३. स्कॉटलंड कारनं करावं ना? आम्हाला जी ठिकाणं बघायचीयेत त्याकरता कार असल्यानं फ्लेक्सिबिलिटी राहील ती बरी पडेल असं वाटतंय.
४. जूनच्या शेवटी बरोबरची फॅमिली परतल्यावर आम्ही तिघं कंट्रीसाईडला - वेल्स, आयर्लंडही चालेल - निदान २ ठिकाणी आणि मग लंडनला रहाण्याचा प्लॅन आहे. त्याकरता कृपया सुरेखशी ठिकाणं सुचवा.
५. लंडनमधे हाऊस रेन्ट करण्याचा विचार आहे. तर कोणता एरिया बरा पडेल?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages