"प्रेम म्हणजे काय?" यावर धागा काढला तर हजारो पोस्ट पडूनही प्रश्न अनुत्तरीतच राहणार यात कोणालाही शंका नसावी.
प्रत्येकाची व्याख्या वेगळी आणि तरीही बरोबर असू शकते.
पण हे जे काही प्रेम आहे ते "एकाच वेळी" दोघींशी होऊ शकते का हो?
(मी मुलगा आहे म्हणून दोघींशी लिहिले, आपण यापुढच्या लेखात आपल्या सोयीनुसार "दोघींशी" किंवा "दोघांशी" असे काहीही वाचू शकता.)
इथे प्रेम म्हणजे मैत्री, ममता, वात्सल्य असे काही अपेक्षित नाही, तर स्त्री-पुरुष वयात आल्यानंतरचे होणारे प्रेम ज्याला प्रमाण मानून आपण आयुष्याचा जोडीदार निवडतो त्याला डोळ्यासमोर आणा.
काही जण म्हणतात, एकीवरच प्रेम कसे करणार...
कोणाचे डोळे सुंदर असतात, कोणाचे केस, तर कोणाचे गाल...
एखादीचे बोलणे आवडते, एखादीचे दिसणे, तर एखादीचे हसणे...
फिल्मी डायलॉग निव्वळ...
कारण माझ्यामते एखादीचे नुसते आपल्या आयुष्यात असणे जेव्हा आपल्याला आवडायला लागते तेच खरे प्रेम..
इतर गोष्टींना वासना म्हणा, आकर्षण म्हणा, आवड म्हणा...... पण प्रेम .... नाह...!
आजच्या पिढीच्या भाषेत सांगायचे तर ते "इश्कवाला लव" नक्कीच नाही..
असो, तर हे असे प्रेम एकाचवेळी दोघींशी कसे होऊ शकते??
एखादीत मन खरेच गुंतले तर ती आपले सारे आयुष्य व्यापून टाकते तर तिथे दुसरीसाठी जागा कुठून करणार.? त्यासाठी फोर्थ डायमेन्शनमध्येच जावे लागेल ना..
हृदय म्हणजे कप्प्याकप्प्यांचे कपाट आहे का? .. स्वताला हवे तेव्हा एक कप्पा उघडला अन दुसरा बंद केला..
हृदय म्हणजे ड्युअल सिम मोबाईल आहे का? .. कार्ड बदलले की नवीन नेटवर्क पकडले..
हृदय म्हणजे चॅनेल बदलणारा एफ एम रेडिओ आहे का? .. एक खटका दाबला आणि आपोआप ट्यूनिंग होऊन नवीन फ्रीक्वेन्सी सेट झाली..
एखादीवर तुम्ही प्रेम करत आहात आणि त्याचवेळी आणखी एखादी तुम्हाला आवडते याचा अर्थ एकतर त्या दुसरीबद्दलच्या भावना प्रेम नसून वर सांगितल्याप्रमाणे वासना, आकर्षण, आवड या सदरात मोडणार्या असाव्यात,
किंवा
तुमचे पहिलीवर आता प्रेम राहिले नाही वा कधी नव्हतेच मुळी..
पण तरीही तुम्हाला असे वाटत असेल तर आता हे तुम्ही स्वताच्या मनाचे समाधान म्हणा किंवा जोडीदाराची समजूत काढणे म्हणा...
वा आपल्या व्यभिचाराचे समर्थन..
पण मी याला व्यभिचारही म्हणू इच्छित नाही जर प्रामाणिकपणे दोघींपैकी कोणावर खरे प्रेम आहे हे स्वताच्या मनाशीच मान्य करून दुसरीजवळ त्याची कबूली दिली तर...
कुछ कुछ होता है या शाहरुखपटात एक संवाद होता - आपण एकदाच जगतो, एकदाच मरतो, वगैरे वगैरे एकदाच करतो, तर तसेच हे प्रेम पण एकदाच करायला हवे.
पण पुढे काय होते तो इतिहास आहे. (चित्रपटप्रेमींना माहीत असेलच.)
हे असे पुन्हा प्रेम होणे यात काही वावगे नाही किंवा हे घडतेच घडते. कारण प्रेम आपण करत नाही तर प्रेम हे होते.
माणूस गेला की संपले सारे. भले त्याने एकेकाळी आपले सारे आयुष्य का व्यापून टाकले असेना.. उलट तेवढीच मोठी पोकळी तो आपल्या आयुष्यात निर्माण करून जातो, जी भरल्याशिवाय आयुष्य पुढे सरकू शकत नाही. अश्यावेळी खरे तर जास्तच गरज असते एखाद्याची.. त्यामुळे प्रेमभंगानंतर पुन्हा प्रेम होणे, आणि या दुसरीशीही प्रेमभंग होऊन परत पहिलीच्याच प्रेमात पडणे असे काहीही होऊ शकते.....
पण एकाच वेळी..? दोघींच्या प्रेमात..? कोण कसे पडू शकते राव..?? हे या अंड्याला कोणीतरी समजवा इथे.
तळटीप - बेफिकीर यांच्या एका ललित-कथेवरून हा विषय निघाला. प्रतिक्रियेत माझे मत एका वाक्यात मांडले तर तिथे पुढच्या सार्या प्रतिक्रिया या विरोधातच आल्या. अगदीच राहवले नाही आणि मूळ कथेचा धागा भरकटू नये म्हणून त्यावर सविस्तर मत वेगळा धागा काढून मांडणे योग्य समजले.
अवांतर - मायबोलीकरांचा सरासरी वयोगट अंदाजे माझ्या वयाच्या दीडपट असावा .. त्यातही महिलांचे प्रमाण लक्षणीय .. पण .. पण .. प्रेम हे प्रेम असते, तुमचे आणि आमचे सेम असते .. त्यामुळे दरदिवशी दरडोई किमान एक प्रतिक्रिया तरी अपेक्षित आहे.
- आनंद
विस्ट्रूत उट्टरः "प्रेम
विस्ट्रूत उट्टरः
"प्रेम म्हणजे काय?" यावर धागा काढला तर हजारो पोस्ट पडूनही प्रश्न अनुत्तरीतच राहणार यात कोणालाही शंका नसावी.
तुमच्या धाग्याला हजार उत्तरे येतील अशी तुमची अपेक्षा आहे काय?
प्रत्येकाची व्याख्या वेगळी आणि तरीही बरोबर असू शकते.
शक्य आहे
पण हे जे काही प्रेम आहे ते "एकाच वेळी" दोघींशी होऊ शकते का हो?
हो. त्यांचा जाहीर आकडा २४ आहे. माझा अनॉफिशियल २५ आहे (डींग्या)
(मी मुलगा आहे म्हणून दोघींशी लिहिले, आपण यापुढच्या लेखात आपल्या सोयीनुसार "दोघींशी" किंवा "दोघांशी" असे काहीही वाचू शकता.)
मुलग्यांनी इतर मुलग्यांवर प्रेम करू नये असे कुठे आहे? आठवा प्रसिद्ध गाणे : 'आदमी हूँ आदमीसे प्यार करता हूँ' त्या काळापासून तसे करीत आहेत.
इथे प्रेम म्हणजे मैत्री, ममता, वात्सल्य असे काही अपेक्षित नाही, तर स्त्री-पुरुष वयात आल्यानंतरचे होणारे प्रेम ज्याला प्रमाण मानून आपण आयुष्याचा जोडीदार निवडतो त्याला डोळ्यासमोर आणा.
अच्छा. तुम्हाला वासना असे म्हणायचे आहे तर?
काही जण म्हणतात, एकीवरच प्रेम कसे करणार...
बरोबर आहे त्यांचे.
असो. टंकाळा आला. बाकी वाक्यांवर नंतर प्रतिसाद देईन. मग नंतर प्रत्येक शब्दावर वेगळा. टेन्शन घेऊ नका. लै रिक्कामा वेळ आहे आपल्याकडे.
ता.क.-->
त्यामुळे दरदिवशी दरडोई किमान एक प्रतिक्रिया तरी अपेक्षित आहे. स्मित
दरडोई दर दिवशी किमान एक तरी अंडे घालणे अपेक्षित आहे असे वाचले..
इब्लिस रागवु नका, पण काही
आठवा प्रसिद्ध गाणे : 'आदमी
आठवा प्रसिद्ध गाणे : 'आदमी हूँ आदमीसे प्यार करता हूँ' त्या काळापासून तसे करीत आहेत. >>
हा संदर्भ लक्षात आला नव्हता.
कुछ कुछ होता है या शाहरुखपटात
कुछ कुछ होता है या शाहरुखपटात एक संवाद होता - आपण एकदाच जगतो, एकदाच मरतो, वगैरे वगैरे एकदाच करतो, तर तसेच हे प्रेम पण एकदाच करायला हवे. >>>>>> अच्छा म्हणजे शाहरुख ने सांगितलेले म्हणुन एकदाच होते...असे तुमचे म्हणणे आहे काय ????
आधी तुम्ही तुमची प्रेमाची व्याख्या काय हे स्पष्ट करा..;)

.
मी मुलगा आहे म्हणून दोघींशी लिहिले, >>>>>>>> माहीती आहे की आम्हाला हे..का परत परत सांगुन राहीलात
.
पण हे जे काही प्रेम आहे ते "एकाच वेळी" दोघींशी होऊ शकते का हो? >>>>>>> फक्त २च का आकडा गृहीत धरलात ??
.
पण एकाच वेळी..? दोघींच्या प्रेमात..? कोण कसे पडू शकते राव..?? हे या अंड्याला कोणीतरी समजवा इथे. >>>>>>>>> नक्की मी तुझी शिकवणी घेईन.......फक्त तु आधी अंड्याबाहेर पड...:)
इब्लिस, प्रतिसाद भारी
इब्लिस, प्रतिसाद भारी
>> टुनटुन | 2 December, 2012
>> टुनटुन | 2 December, 2012 - 19:18 नवीन
हाहा इब्लिस रागवु नका, पण काही वेळेस तुम्ही छान मार्मिक पद्धतीने लिहीत असता.
<<
(बिच्चारा) इब्लिस
***
हलके घ्या.
धन्यू @ नीधप
इब्लिस तरी या लेखाच्या
इब्लिस
तरी या लेखाच्या आशयाविषयी अंडेरावांशी सहमत. कदाचित त्यांना निट मांडता आले नसेल पण भा. पो.
@ साती हो रे बाबा! च्याय्ला
@ साती
हो रे बाबा! च्याय्ला उक्कूसा इब्लिसपणापण नको करू का?
एकाचवेळी दोघींच्या
एकाचवेळी दोघींच्या प्रेमात......

>>>>>>>
अंड्या, वेळ कोणावर सांगून येते काय
वक्त वक्त कि बात है !
वक्त वक्त कि बात है !
इब्लीस डब्लर बसलीये जबरदस्त !
इब्लीस डब्लर बसलीये जबरदस्त !
@ इब्लिसराव, विस्ट्रूत
@ इब्लिसराव,
विस्ट्रूत प्रट्यूट्टरः
तुमच्या धाग्याला हजार उत्तरे येतील अशी तुमची अपेक्षा आहे काय?
----------------------------------------------------
लीटलबिट करेक्शन - पुन्हा वाचावे, "प्रेम म्हणजे काय?" असा ढोबळमानाने धागा काढला असता तर हजारो पोस्ट पडतील असे लिहिले आहे. म्हणून मी धाग्याचा विषय जरा मर्यादीत केला. असो, अपेक्षा नाही पण किमान वीस पोस्ट तरी पडतील अशी आशा आहे. एकवीस झाल्या तर पेढेवाटप.
प्रत्येकाची व्याख्या वेगळी आणि तरीही बरोबर असू शकते.
शक्य आहे
----------------------------------------------------
शक्य आहे नाही, तर तसेच असते.
ज्या संकल्पनेला ठाम अशी व्याख्या नसते तिथे प्रत्येकाला आपली व्याख्या बरोबर वाटत असते म्हणून तर तो धाडसाने अशी चारचौघात पोस्ट करतो कारण समोरच्याला पटो न पटो तो ती खोडून काढू शकत नाही.
मुलग्यांनी इतर मुलग्यांवर प्रेम करू नये असे कुठे आहे? आठवा प्रसिद्ध गाणे : 'आदमी हूँ आदमीसे प्यार करता हूँ' त्या काळापासून तसे करीत आहेत.
----------------------------------------------------
यामध्ये "त्या काळापासून" यात हा काळ म्हणजे त्या गाण्याचा काळ, काही वर्षांपूर्वीचाच ना... पण स्त्री-पुरुष प्रेम हे अनादी कालापासून चालत आले आहे.. म्हणून हे आताशा निर्माण झालेले अपवाद सोडलेत.
इथे प्रेम म्हणजे मैत्री, ममता, वात्सल्य असे काही अपेक्षित नाही, तर स्त्री-पुरुष वयात आल्यानंतरचे होणारे प्रेम ज्याला प्रमाण मानून आपण आयुष्याचा जोडीदार निवडतो त्याला डोळ्यासमोर आणा.
अच्छा. तुम्हाला वासना असे म्हणायचे आहे तर?
----------------------------------------------------
वासनाही म्हणायचे नाही हे लेखात पुढे उल्लेख केलेला आहे, कदाचित आपण पुर्ण लेख न वाचता एकेक ओळ वाचत कॉपी-पेस्ट करत उत्तरे देत गेलात.
अवांतर - आजकाल बरेच जण असे करतात, वाचतानाच त्यांच्या डोक्यात असे असते की अमुकतमुक वाक्याला प्रत्युत्तर काय द्यायचे. वाक्य चुकीचे आहे की बरोबर, आपल्याला पटलेय की मनापासून विरोध करतोय हे दुय्यम.
असो. टंकाळा आला. बाकी वाक्यांवर नंतर प्रतिसाद देईन. मग नंतर प्रत्येक शब्दावर वेगळा. टेन्शन घेऊ नका. लै रिक्कामा वेळ आहे आपल्याकडे.
----------------------------------------------------
आपल्या प्रतिसादावर मी देखील नक्कीच प्रामाणिक प्रतिसाद देईन. जर आपल्यासारखे रिकामा वेळ काढत असतील तर हा अंड्या तसाही अंडीच उबवत बसलेला असतो.
ता.क.-->
त्यामुळे दरदिवशी दरडोई किमान एक प्रतिक्रिया तरी अपेक्षित आहे. स्मित
दरडोई दर दिवशी किमान एक तरी अंडे घालणे अपेक्षित आहे असे वाचले..
----------------------------------------------------
मी आधी सवयीने तेच टाईप केले होते चुकून, पण मग लक्षात आले तसे पोस्ट करायच्या आधी दुरुस्त केले.
पण तरीही आपल्याला ते कसे दिसले... दिव्य दृष्टी आं..
@ उदयनभाऊ, कुछ कुछ होता है या
@ उदयनभाऊ,
कुछ कुछ होता है या शाहरुखपटात एक संवाद होता - आपण एकदाच जगतो, एकदाच मरतो, वगैरे वगैरे एकदाच करतो, तर तसेच हे प्रेम पण एकदाच करायला हवे. >>>>>> अच्छा म्हणजे शाहरुख ने सांगितलेले म्हणुन एकदाच होते...असे तुमचे म्हणणे आहे काय ????
----------------------------------------------------
किती घाईत वाचता राव.... तसेच, कदाचित आपण कुछ कुछ होता है बघितलाही नसावा.
त्यात शाहरुखने तसे सांगितले तरी त्याच्याबाबत तसे सिनेमात होत नाही. तो स्वता दोनदा प्रेमात पडतो.. आधी राणी मुखर्जीच्या नंतर तो काजोलच्या.. पण वन बाय वन.. एकाच वेळी नाही.. आणि हाच या धाग्याचा विषय आहे.
आधी तुम्ही तुमची प्रेमाची व्याख्या काय हे स्पष्ट करा..
----------------------------------------------------
धाग्याच्या सुरुवातीलाच लिहिलेय ना राव, प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या काय याची चिरफाड करत बसलो तर विदाऊट अॅनी कन्ल्क्यूजन हजार पोस्ट.
मी मुलगा आहे म्हणून दोघींशी लिहिले, >>>>>>>> माहीती आहे की आम्हाला हे..का परत परत सांगुन राहीलात

----------------------------------------------------
परत परत???
या आधी कधी सांगितले होते?
पण हे जे काही प्रेम आहे ते "एकाच वेळी" दोघींशी होऊ शकते का हो? >>>>>>> फक्त २च का आकडा गृहीत धरलात ??
----------------------------------------------------
एका खूनाची शिक्षा पण फाशी आणि सात खूनांची शिक्षा पण फाशी असा काही डायलॉग असतो बघा..
तसेच एकदा दुसरी आली की मग तिसरी, चौथी, पाचवी... काहीही आकडा घ्या... मुद्दा बदलत नाही.. आकडेमोड सोयीचे पडावी म्हणून मी दोनच आकडा गृहीत धरला..
पण एकाच वेळी..? दोघींच्या प्रेमात..? कोण कसे पडू शकते राव..?? हे या अंड्याला कोणीतरी समजवा इथे. >>>>>>>>> नक्की मी तुझी शिकवणी घेईन.......फक्त तु आधी अंड्याबाहेर पड...

----------------------------------------------------
आधी शिकवून तयार तर करा राव, मगच अंड्यातून बाहेर पडेन. अन्यथा हे निर्दयी जग या पिलाचा जीव नाही का घेणार..
हवे तर मग गुरुदक्षिणा म्हणून या अंड्याची कवचकुंडले मागितली तरी हरकत नाही..
@ साती, या लेखाच्या आशयाविषयी
@ साती,
या लेखाच्या आशयाविषयी अंडेरावांशी सहमत. कदाचित त्यांना निट मांडता आले नसेल पण भा. पो.
----------------------------------------------------
साती, ते मुद्दामच...., पहिलीच पोस्ट कडक आणि मुद्देसूद लिहिली तर पुढे चर्चेला काही उरत नाही हा माझा आजवरचा अनुभव.
अवांतर - या आंतरजालावर अंड्यासारख्या पोरांना पण बरीच इज्जत मिळते राव.. कोणी अंड्याजी म्हणते तर कोणी अंडूशेठ... आणि आता आपले अंडेराव..
.
@ भुंगा

अंडेपंत, मागे मी एका
अंडेपंत, मागे मी एका संस्थळावर असाच एक लेख लिहिला होता.

त्यात आंतर्जालावर ओळख नसलेल्या पुरूष आयडींनाही राव, पंत , शेठ असे काय काय म्हटले जाते पण स्त्री आयड्याना ताई, किंवा जास्तीत जास्त जी असे का यावर चर्चा होती. ती तुमच्या वरिल प्रतिसादानिमित्त आठवली
तुम्ही मागे 'आत्या' वापरलं होतंत एका स्त्री आयडीकरिता ते ही आठवलं.
आनंदाभौ, बाउन्सर तोंडावर
आनंदाभौ,
बाउन्सर तोंडावर याय्ला लाग्ला का हेल्मेटवालं सचीन बी 'ड्क' करतंय
झोपा आता!
आनंदाभौ, बाउन्सर तोंडावर
आनंदाभौ,
बाउन्सर तोंडावर याय्ला लाग्ला का हेल्मेटवालं सचीन बी 'ड्क' करतंय
झोपा आता!
अंडं , अंडु , अंड्या , अंडोबा
अंडं , अंडु , अंड्या , अंडोबा , अंडेश , अंडुका , अंडोपंत , अंडाजी ,
कसली भारी नावं ठेवता येतील नाही.
श्री अजुन अंडेशा, अँडी, आणि
श्री

अजुन अंडेशा, अँडी, आणि सगळ्यात फेमस अंडुटल्या
साती ती दाद आत्या... अंड्या
साती ती दाद आत्या...:)
अंड्या बेसिकली दोघींवर एकाच वेळी प्रेम व शारिरीक लगटीला व्यभिचार म्हणतात नं? एक भा.प्र.
इब्लिस
साती, अंड्याला उद्देशुन
साती,
अंड्याला उद्देशुन लिहीलेल्या पोस्टीत त्याचा उल्लेख मी 'मुला' असा केला होता म्हणुन एका बाफवर माझा उल्लेख अंड्याने (बहुदा उपरोधाने) 'मातोश्री' असा केला आहे!
वेका, व्यभिचार हे आज
वेका, व्यभिचार हे आज कायद्याने काही विशिष्ट लोकांसाठी ठरवले आहे म्हणून. नाहीतर एकापेक्षा अधिक कितीही जणी/ जणांबरोबर त्या अर्थाने जवळीक केल्याची पुराणकालापासून ते आत्तपर्यंत उदाहरणे आहेतच की नै?
आमच्या गावात तर बहुपत्नीत्व सर्वजातीधर्मांत मुबलक आहे.
अंडेराव बहुदा फक्त मानातल्या प्रेमाच्या भावनेविषयी बोलतायत , लग्न किंवा शासं बद्दल नाही.
मला अंड्या झबलं टोपरं घालून
मला अंड्या झबलं टोपरं घालून पाळण्यात ठेवल्यासारखा वाटतोय....
गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या
चला रे पटकन त्याच्या आत्याला बोलवा... कानात नाव सांगायला
इब्लिसराव खतर्नाक.
इब्लिसराव खतर्नाक.
साती ते तर आहेच...पण यांचे
साती ते तर आहेच...पण यांचे राजरोस वाले नव्हेत नं?
फक्त खयाली पुलाव
भुंग्या
कुठेतरी धागा
कुठेतरी धागा होता.............अंडा - पुलाव म्हणुन ...........:खोखो:
इब्लिसदादा, जमाना ट्वेंटी-२०
इब्लिसदादा,
जमाना ट्वेंटी-२० चा आहे, बाऊंन्सर असो वा यॉर्कर, रन बनत राहिले पाहिजे..
तरीही आपला सल्ला लक्षात राहील..
साती,
ओह ते दादाआत्याला आत्या म्हणालो होतो. सहजच, तिचे आधीचे आलेले दोन रिप्लाय पाहून ज्यात थोडीफार कळकळ दिसली होती आणि तिने त्यातील एका पोस्टमध्ये स्वताचा चाळीशीची बाई असा उल्लेख केल्याने वयोगट समजले म्हणून ताईच्या जागी आत्या...
अन्यथा इतर महिलावर्गाला मी शक्यतो अहो जाहो नाही करत कारण त्यांना उगाच वय प्रमाण मानून दिलेला आदर आवडला नाही तर पंचाईत.
वत्सलामाई,
उपरोध, कुजकटपणा, कुत्सितपणा ही अंड्याची स्टाईल नाही हो,
आणि आपण माझ्या त्या लेखाला "छान लिहिल आहे, लिहित राहा मुला" अशी प्रतिक्रिया दिल्यावर मी उपरोधाने कसे मातोश्री म्हणेन? बहुधा मी तेव्हा मातोश्री नाही तर माँसाहेब म्हणालो होतो.
श्री, आणि रिया,
नवीन नावांबद्दल धन्यवाद, नुसती ठेवण्यापेक्षा अधूनमधून हाक मारून आठवण काढलीत तर जास्त आवडेल.... अगदीच अंड्यानामाचा जप रोज न चुकता करा अशी अपेक्षा नाही... पण अधूनमधून..
वेका आणि साती,
हुस्श, विषयावर लिहिलेत बरे वाटले..
इथे साती बरोबर बोलतेय वेका, "अंडेराव बहुदा फक्त मानातल्या प्रेमाच्या भावनेविषयी बोलतायत , लग्न किंवा शासं बद्दल नाही""
बाकी व्यभिचाराबद्दल मी किनार्यावर उभा राहून काय बोलणार, माझे ना लग्न झालेय ना शा.सं. चा काही अनुभव..
तुमचा लेख लिहिण्याचा उद्येश्य
तुमचा लेख लिहिण्याचा उद्येश्य समजला ...
नाही करता येत दोघान्वर प्रेम ...
अंडेशा, अँडी, आणि सगळ्यात
अंडेशा, अँडी, आणि सगळ्यात फेमस अंडुटल्या>> अंडामाउली राहिलच की.
इब्लिस प्रतिसाद

आयडी सार्थ होतोय.
होउ शकतं प्रेम एकाच वेळी किंवा वन बाय वन दोनच काय अजुन बर्याच जणींसोबत पण समाजनियम, कायदा वै वै विचार केला तर.......... बरं होइल.
आधी शिकवून तयार तर करा राव,
आधी शिकवून तयार तर करा राव, मगच अंड्यातून बाहेर पडेन. अन्यथा हे निर्दयी जग या पिलाचा जीव नाही का घेणार.>>>>>>>>>>
.
.
अरे अजुन किती जीव देशील.......
Pages