विषण्ण संध्या
Submitted by प्रतिक सोमवंशी on 12 June, 2019 - 13:45
होते रात्र अधाशी, सांजही हुलकावण्या देते
औदुंबराला पाठ लावून, पणतीही जीव तोडते
एक आर्त साद येते, दुर क्षितीजापल्याडून मिनमिनतो राऊळातला दिवा, जीव मुठीत धरून
एक घास रात्रीचा घेताना, घश्यात काटा रुततो
या किर्रर्र काळोखात, एक उपाशी पिंगळा दिसतो
आकळेच न मजला, किती आहेत शून्य सोबती
का बोथट जाणिवांचे, शल्य खुपते हृदयामंधी
या विषण्ण संध्यासमयी, कुठे आसरा मिळतो
अन जीर्ण घरट्यापाई, एकटाच पारवा रडतो
©प्रतिक सोमवंशी
विषय: