चुकलं तरी हरकत नाही

Submitted by कविन on 18 June, 2024 - 03:14

होतं असं, चुकतं काही
फसतं गणित, सुटत नाही
पुन्हा पुसून गिरव पाटी
नव्याने मांड अंक लिपी
हातचे नीट मिळवून बघ
ऋण, धन निरखून बघ
सुटत जाईल हळूहळू
तुझे तुलाच लागेल कळू
चुकणं म्हणजे, विराम निव्वळ
तो ही स्वल्पच, पूर्ण नाही
चुकलं तरी हरकत नाही
फार काही बिघडत नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

छान.
कालच क्रॅश का होतंय हे शोधताना कंटाळून लॅपटॉप बंद केला. आणि आज उघडल्या बरोबर तुझी ही कविता दिसली! Lol दुकान उघडाची वेळ झाली. भिंतीचा गिलावा काढा आणि परत लावा!

>>>
चुकणं म्हणजे, विराम निव्वळ
तो ही स्वल्पच, पूर्ण नाही
<<<
आवडलं! Happy

आपण चुकीला माफी नाही वगैरे गर्जना ऐकत असतो, पण रोजच्या जगण्यात आपण (मी तरी) फक्त चुकत माकत एकेक पाऊल टाकत असतो. आदर्श, परिपूर्ण असं ध्येय असलं तरी तिकडे जातचा रस्ता सरळ रेषेत असणार नाही ही कल्पना सुरुवातीलाच हल्ली आलेली असते.

वाह, आवडलीच
>>चुकणं म्हणजे, विराम निव्वळ
तो ही स्वल्पच, पूर्ण नाही<< पटलच

छान.

मस्त मस्त…

चुकलो नाहीत म्हणजे बसुन आहोत, काहीच करत नाही… Happy