Submitted by कविन on 18 June, 2024 - 03:14
होतं असं, चुकतं काही
फसतं गणित, सुटत नाही
पुन्हा पुसून गिरव पाटी
नव्याने मांड अंक लिपी
हातचे नीट मिळवून बघ
ऋण, धन निरखून बघ
सुटत जाईल हळूहळू
तुझे तुलाच लागेल कळू
चुकणं म्हणजे, विराम निव्वळ
तो ही स्वल्पच, पूर्ण नाही
चुकलं तरी हरकत नाही
फार काही बिघडत नाही
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर!
सुंदर!
छानै.
छानै.
छान.
छान.
छान कविता. चुकीला माफी
छान कविता. चुकीला माफी नाहीच्या बरोबर विरुद्ध विचार आहे आणि तो आवडला.
छान.
छान.
कालच क्रॅश का होतंय हे शोधताना कंटाळून लॅपटॉप बंद केला. आणि आज उघडल्या बरोबर तुझी ही कविता दिसली! दुकान उघडाची वेळ झाली. भिंतीचा गिलावा काढा आणि परत लावा!
>>>
>>>
चुकणं म्हणजे, विराम निव्वळ
तो ही स्वल्पच, पूर्ण नाही
<<<
आवडलं!
आपण चुकीला माफी नाही वगैरे
आपण चुकीला माफी नाही वगैरे गर्जना ऐकत असतो, पण रोजच्या जगण्यात आपण (मी तरी) फक्त चुकत माकत एकेक पाऊल टाकत असतो. आदर्श, परिपूर्ण असं ध्येय असलं तरी तिकडे जातचा रस्ता सरळ रेषेत असणार नाही ही कल्पना सुरुवातीलाच हल्ली आलेली असते.
मस्तच.
मस्तच.
मस्त कविता!
मस्त कविता!
वाह, आवडलीच
वाह, आवडलीच
>>चुकणं म्हणजे, विराम निव्वळ
तो ही स्वल्पच, पूर्ण नाही<< पटलच
खूप छान, उत्तेजनार्थ कविता.
खूप छान, उत्तेजनार्थ कविता.
मस्तच गं कवे! आवडली कविता.
मस्तच गं कवे! आवडली कविता. छान फ्लो आहे.
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
ही पण छान
ही पण छान
छान.
छान.
मस्त मस्त…
मस्त मस्त…
चुकलो नाहीत म्हणजे बसुन आहोत, काहीच करत नाही…
सुरेख!
सुरेख!