नाद

असे भास होती

Submitted by पुरंदरे शशांक on 27 August, 2024 - 02:36

असे भास होती

असे भास होती उन्हासावलीचे कळेना कुठे तो उभा ठाकलो
अकस्मात सारे उभे अंतरंगी खुळावे कसा मी नभी रंगलो

रमावे तरी येथ नाही असे की नसे राम येथे पुरा गुंतलो
निघावे तरी स्वैर जावे कुठे मी जगावेगळ्या या घरी थांबलो

नसे गीत ना सूर काही जरासे कसा यात का व्यर्थ नादावलो
असे भास निर्जिव होती कशाला सुरावेगळा फक्त भांबावलो

कळेना जिवाला खरे काय भासे मृगांबू न सारे किती शोष तो
कसा भास तो स्पर्शताचि जिभेला कसा शांत होता पुन्हा जागलो

Subscribe to RSS - नाद