असे भास होती
असे भास होती उन्हासावलीचे कळेना कुठे तो उभा ठाकलो
अकस्मात सारे उभे अंतरंगी खुळावे कसा मी नभी रंगलो
रमावे तरी येथ नाही असे की नसे राम येथे पुरा गुंतलो
निघावे तरी स्वैर जावे कुठे मी जगावेगळ्या या घरी थांबलो
नसे गीत ना सूर काही जरासे कसा यात का व्यर्थ नादावलो
असे भास निर्जिव होती कशाला सुरावेगळा फक्त भांबावलो
कळेना जिवाला खरे काय भासे मृगांबू न सारे किती शोष तो
कसा भास तो स्पर्शताचि जिभेला कसा शांत होता पुन्हा जागलो
नभाची निळी निळाई
रवी केशर खलवी त्यात
पानांची सळसळ गोड
झुलवीत फुटे पहाट!!
दिवसा लख्ख प्रकाशी
उरतो ना एकही रंग
फुटतात पाय वाटेला
जीवनात जीवन दंग!!
संध्येची धूसर छाया
बिलगते मनाला थोडी
करतात प्रश्न नव्याने
गतकाळातील कोडी!!
कोण अलगद रात्री
चांदण्या पेरूनी जाते
पांघरुन चमचम शेला
पात्र नदीचे निजते!!
स्वप्नात भास-आभास
सांगतात जीवन हे रे
तुज जगायचे नव्याने
उघडून मनाची दारे!!
मी मानसी
भोग भोगता आयुष्याचे
भोग भोगिता आयुष्याचे भोग कधि हे टळले का
उठून जाता क्षणात इथूनी उमजून काही आले का
माझे माझे म्हणता म्हणता दूर दूर ते गेले का
कोण नेमके दूर जवळचे कधीच नाही कळले का
अजून हाती यावे काही आस कधी ती थकली का
हातामधूनी निसटून जाता शिल्लक काही उरली का
मीच एकटा रसिक गुणी अन् दानशूरही मीच निका
वाजे डंका किती काळचा लोक बधीर हे झाले का
चढता पडता जरा ढकलता पुढेच ना मी गेलो का
चहूकडून अंधारुन येता कुठे जातसे कळेल का
भास पुराणे किती काळचे भ्रमणातूनि सरले का
सत्यत्वाचा भास जरासा दचकावून तो जातो का
भास होते तुझे स्पर्श सारे ।
व्यर्थ हेलावती का शहारे ।
फूलही मागते तू कशाला
पेरते वाट माझी निखारे ।
आज मी वेदनामुक्त झालो
मानले वेदनांचे पहारे ।
सांग तू ऐक तूही जरासे
वेदनेला मिळे ना किनारे ।
आज, तू ना तुझी आठवणही
हे कसे प्राक्तनाचे इशारे।
भास तुझा होई मनाला
आठवण येई तुझी या क्षणाला
हुरहूर लागे या जीवाला
बेधुंद होऊनी तुला पाहुनी
चिंब पावसात नाचावे
तुझ्या नि माझ्या प्रीतीची कळी नकळत उमलावी
हृदयी वसून स्वप्नात दिसून
ते प्रीतीची फुल फुलावे
नजरेस नजर मिळावी
मनातली भावना न बोलता कळावी
ओठी तुझ्या नाव माझे
माझ्या ओठी नाव तुझे
सदैव असावे
अविश्वास नाव त्यात नसावे
आपल्या प्रेमात प्रेमच दिसावे
आयुष्यभर एकमेकांना बघावे
आयुष्य आपलं एकमेकांच्या मिठीत जावावे
MDS
पान उलटता अवचित
शब्द होती कासावीस
मळलेल्या ओळींवर
होती ताजे जुने भास.....
आईशप्पथ...सव्वा दहा झाले...आज पण बॉसचा ओरडा खावा लागणार. श्या.... मनगटावर असलेल्या घड्याळात नजर घालून कळवळीनं कपाळावर हात मारला, त्यात पण केसांतून तसाच हात फिरवण्याचा मोह नाही आवरला. झपाझप पाउलं टाकत रस्ता क्रॉस केला. आज आकाश मोकळं होतं. बऱ्याच दिवसांनी पाउस उघडला होता. “ह्या गाडीला पण आजच बंद पडायचं होतं....” मनातल्या मनात दोष देत बिल्डींग खाली पोहोचलो. इतक्यात फोनची रिंग वाजली. एकदम धडकीच भरली, लिफ्टने न जाता तड्क पायऱ्यांनी धावत सुटलो. धापा टाकत ऑफिस च्या बाहेर आलो. केसं, इन सावरत दरवाजा उघडून आंत शिरलो. माहौल शांत होता तसा. बॉस आपल्या केबिन मध्ये पेपरात डोके घालून बसला होता.
कदाचित ही फक्त हवा असेल
जी चाल करून येतीये
विव्हळणाऱ्या जीर्ण फांद्यांना
खिडक्यांवर फटकारतीये
कदाचित हा फक्त पाऊस असेल
जो आज काळाकुट्ट वाटतोय
दाराछतातून मुजोरीने घुसून
सर्वाँगाला डसतोय
कदाचित ह्या फक्त सावल्या असतील
ज्या श्वापदांसारख्या दिसताहेत
सराईत मारेकऱ्यासारख्या
मला चारीबाजूंनी घेरताहेत
कदाचित हा फक्त कावळा असेल
जो आत्ताच खिडकीवर धडकलाय
रक्ताळलेली चोच आदळून
काचांना तडे देत सुटलाय
स्वप्नात तुला बघताना
मी एक कुशीवर निजतो
पाऊस जरीही नसला
तव आठवणींनी भिजतो...
वेचतो ओंजळीमध्ये
प्राजक्त फ़ुले पडलेली
ओठावर जाणवते मज
नाजूक कळी रुतलेली..
मोहरतो बावरतो मी
सावरतो कोसळतो मी
स्पर्शांच्या हिंदोळ्याने
बरसतो नि सळसळतो मी..
मकरंद तुझा ओघळतो
मी भ्रमर होऊनी टिपतो
तू कूस बदलते अलगद
मी मागे सरतो लपतो...
स्वप्नात तुझ्या खांद्यावर
डोके ठेवून मी बसतो
त्या निश्चल समयी मजला
माझा संसार गवसतो...
-- संतोष वाटपाडे (नाशिक)