Submitted by कविन on 18 February, 2025 - 05:47
काल रातीला लिहून चिठ्ठी
काळीज झालं फरार
पोलीस पाटील तुमीच सांगा
कुटं करु तकरार
झोप उडाली दिवसाची अन्
राती ताल जुळंना
चाळ बोलती, त्यांचं गाणं
जीवास या उमजना
मोहीत झाले, मन हे भुलले
झाले बघा पसार
पोलीस पाटील तुमीच सांगा
कुटं करु तकरार
कोरड पडली, मनास अन्
तापली बघा हो काया
औसद तुमच्या पाशी, यावे
तुमी लवकरी राया
फित्तूर काळीज, गेलं तोडून
देहामधील करार
पोलीस पाटील तुमीच सांगा
कुटं करु तकरार
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आहा. निस्ता जाळ लिवलय आक्षी.
आहा. निस्ता जाळ लिवलय आक्षी.
धन्यवाद सामो
धन्यवाद सामो
नेहमी लिहीते त्यापेक्षा वेगळा प्रकार लिहायच प्रयत्न करुन बघितलाय
जमलीय. जुन्या मराठी
जमलीय. जुन्या मराठी चित्रपटातलं गीत वाटेल अशी आहे, धृपद जोडले तर.
अगं बाज एकदम छान पकडला आहेस
अगं बाज एकदम छान पकडला आहेस.
जास्त काही कळत नाही कवितेतलं
जास्त काही कळत नाही कवितेतलं ..पण मस्त वाटलं हे वाचायला..
मस्त जमलीय!
मस्त जमलीय!
कवे, अगदी झकास जमलीये.. 'काल
कवे, अगदी झकास जमलीये.. 'काल रातीला ..' ची चाल थोडि फार इकडे - तिकडे करुन पाहिली. मनात परफेक्ट जमलं की!
मस्त जमलीये कविन!
मस्त जमलीये कविन!
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
भ्रमा, कर रेकॉर्ड आणि पाठव व्हॉट्स ॲपवर
ते तक्रार लिहावं की तकरार कळेना मला.
का कळेना ते कळले नाही पण
का कळेना ते कळले नाही पण तकरार पण वॅलिड शब्द आहे, त्याच्याशी यमक साधणाऱ्या ओळीत आणि या ओळीत ८ -८ अक्षरे बरोबर होतील.
मस्त!
मस्त!
पोलिस पाटील जर आरोपी
करू नका अविचार
वेळ आणखी दवडू नका
झणी टाका एन सी आर
उलटून गेली आता रात
उलटून गेली आता रात
नाही काही खबरबात
त्यानं धरला माझा हात
रुतून बसलाय काळजात....
खूप आवडली. मस्त अनुभव
खूप आवडली. मस्त अनुभव वाचताना, स्वरबद्ध झाली तर तो पण एक सुंदर आविश्कार ठरेल.
अरे वा, काय विशेष म्हणे?
अरे वा, काय विशेष म्हणे?

चिठ्ठी काय होती याचीही उत्सुकता आहे आता.
वा ! भारी जमलीय !
वा ! भारी जमलीय !
अनंत यात्री, ऋतुराज वाह!
अनंत यात्री, ऋतुराज वाह!
thank u तुषार, स्वाती, आबा
अरे वा, काय विशेष म्हणे? Happy>>
उगाचच चॅलेंज स्वत:ला बाकी काही नाही
चिठ्ठी काय होती याचीही उत्सुकता आहे आता. Proud>>
क्या बात है, कवे! मस्त गाणं
क्या बात है, कवे! मस्त गाणं होईल याचं.
काळजानं लिहिलं तरी काय फरार होण्याआधी?
भारी जमलीये.
भारी जमलीये.
काल रातीला ..' ची चाल थोडि फार इकडे - तिकडे करुन पाहिली. >> येस मला पण हेच आठवले
अया आणि ऋतुराज, भारी अ
अया आणि ऋतुराज, भारी अॅडिशन्स!
जमलीय जमलीय
जमलीय जमलीय
मस्त झालिये
मस्त झालिये
कवे, मस्त जमलीय!
कवे, मस्त जमलीय!
मी सवाल जवाब च्या चालीत वाचली . बऱ्यापैकी जमतंय
भारीच आहे.
भारीच आहे.
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
भारी जमलीये!
भारी जमलीये!
कविन भाय , क्या हुआ? फिरसे
कविन भाय , क्या हुआ? फिरसे प्यार में पड गया लगताय.
एकदम कडक सॉलिड कविता. बेस्टम ब्येष्ट.
मस्तच एकदम कविन. लावणीचा ढंग
भारी जमलीये कविन
भारी जमलीये कविन
कविन भाय , क्या हुआ? फिरसे
कविन भाय , क्या हुआ? फिरसे प्यार में पड गया लगताय.>>

एकदम कडक सॉलिड कविता. बेस्टम ब्येष्ट.>> थॅंक्स
धन्यवाद पुन्हा एकदा
मस्त!
मस्त!
Pages