काळीज झालं फरार

Submitted by कविन on 18 February, 2025 - 05:47

काल रातीला लिहून चिठ्ठी
काळीज झालं फरार
पोलीस पाटील तुमीच सांगा
कुटं करु तकरार

झोप उडाली दिवसाची अन्
राती ताल जुळंना
चाळ बोलती, त्यांचं गाणं
जीवास या उमजना

मोहीत झाले, मन हे भुलले
झाले बघा पसार
पोलीस पाटील तुमीच सांगा
कुटं करु तकरार

कोरड पडली, मनास अन्
तापली बघा हो काया
औसद तुमच्या पाशी, यावे
तुमी लवकरी राया

फित्तूर काळीज, गेलं तोडून
देहामधील करार
पोलीस पाटील तुमीच सांगा
कुटं करु तकरार

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा ! एकदम झक्कास. ते ध्रूपद का काय म्हनत्यात ते जोडा आन एकदम लावनीचा कारेक्रम होऊन जाईल !
पण सिरियसली , नवीन प्रकार हाताळण्याचं धाडस केलं याबद्द्ल शाब्बास Happy

धन्यवाद

धृवपद लिहीण्याबद्दल विचार करतेय पण मला अजूनही पिक्चर क्लिअर दिसत नाहीये.
यातली एक रिपीट होणारी ओळ हेच धृवपद नाही होणार का? पहिल्या दोन ओळी ज्या मुखड्याच्या आहेत त्याहून वेगळे धृवपद असावे लागते का? माबुदा म्हणा हवेतर पण खरेच काही क्लिअर होत नाहीये. कुणी प्रकाश टाकल्यास कळेल कदाचित

नवीन प्रकार हाताळण्याचं धाडस केलं याबद्द्ल शाब्बास Happy>> Happy धन्यवाद. कधीतरी असे स्वत:ला धक्का देऊन काय होते बघायला मजा येते. फसले तर फसले not a big deal Proud व्हॉट्स ॲपवर एकदा - अवधूत गुप्ते जसे धेडगुजरी मिक्स गाणे लिहीतो त्यावेळी काय विचार करतो यावर मैत्रिणींशी चर्चा सुरु होती तेव्हा चॅलेन्ज म्हणून तसे खरडून पाहिले होते Proud हल्लीच AI App ची ओळख करुन दिली विशाल कुलकर्णीने तेव्हा AI ला कामाला लावून गायला लावून रेकॉर्ड करुन ठेवले ते बोल : just for fun offcourse

खूपच मस्त
ह्याचं गाणं झालंच पाहिजे

Pages