रात्र चांगलीच पडलेली होती. बंगल्याच्या आसपास नेहमी असते तशीच भयाण शांतात होती, बंगल्यातील आरडाओरडा आणि भयानक किंकाळ्याचे आवाज आता बंद पडलेले असले तरी एक प्रकारची विचित्र शांतता अजूनही तिथे होती. बंगल्याच्या आतल्या भागात एका मोठ्या हॉलवजा खोलीमध्ये एका खुर्चीच्या मागे रॉबिन लपून बसलेला होता. शेजारच्याच खोलीत इ. इनामदार देखील लपलेले होते. अंधाऱ्या रात्री कोणी गुपचूप बंगल्यात प्रवेश केलाच तर त्याला बेसावध गाठून पकडण्याचा इरादा केला गेला होता.
सकाळ झाल्या झाल्या हरिभाऊंनी पोलिसांना कळवलं कि दोन चोर रात्री बंगल्यात गुपचूप शिरून आरडाओरडा करून लोकांना घाबरवण्याचे चाळे करताना पकडले गेलेत. त्यानुसार सकाळीच पोलिसांनी आपल्या गाडीतून रंगा आणि बाळू या दोन्ही चोरांना पकडून नेले. तरीही ते दोघे पकडले गेले आहेत याची गुप्तता बाळगण्याबद्दल रॉबिनने पोलिसांना सूचित केले होते.
गावातीलच एका छोट्याश्या हॉटेलमध्ये मिसळ खात रॉबिन बसला होता. हॉटेलमध्ये इतर कोणीही गिऱ्हाईक न्हवते. शेंडेंच्या बंगल्यातील होणाऱ्या भुताटकीच्या घटनांमागे नक्की कोण असावे असा विचार करत तो बसला होता. गावात नीट व्यवस्थित चौकशी करावी असा त्याचा विचार होता. भूतबंगल्यावर जाऊन पाळत ठेवणे देखील गरजेचे होते. हरिभाऊ आपली घरातली कामे उरकून नंतर इथेच येणार होते.
सकाळी रॉबिन झोपेतून उठला आणि लाडकी बाजेवर तसच आळसावलेल अंग टाकून तो उगाच पडून राहिला. हरिभाऊंच्या घराजवळच एक छोटी चूल होती त्यावर हंडा ठेवून हरिभाऊ पाणी गरम करत होते आणि खांद्यावरील पंचाने गरम हंड्याला लावून तो गरम झालेला पंचा डोक्याला लावत होते. थोडक्यातच डोक्यावरील टेंगळाला शेक देत होते. त्यांना तसं करताना पाहून रॉबिनला कालचा प्रसंग आठवला आणि हसू आवरलं नाही. हात तोंडावर धरून हरिभाऊंना ऐकू येऊ नये म्हणून खुसपुसत हसू लागला. पण त्याच्या खुसपूस करत हसण्याचा आवाज हरिभाऊंना आलाच.
सूर्य आता चांगलाच वर आला होता आणि तापू लागलेला होता. शेंडेंच्या घरातून बाहेर पडल्यावर रॉबिन आणि हरिभाऊ रस्त्यावरून चालू लागले. शेंडेंच्या घरापासून ते पुढे चालत आले असता त्यांना शेजारच्या घरातून हरिभाऊंना कोणीतरी आवाज दिला.
“ काय हरिभाऊ, दुपारच्या वेळी उन्हातान्हात कुठे हिंडताय, आणी सोबत हे महाभाग कोण ?”
या प्रश्नाकर्त्याकडे माना वळवून दोघेही बघू लागले. एक स्थूल शरीरयष्टीचा माणूस अंगात बनियन आणि लुंगी घालून शेजारच्या घराच्या कुंपणामागे उभा राहून मिश्किलपणे त्यांच्याकडे पाहत होता.
सकाळी सकाळी न्याहारी उरकून रॉबिन आणि हरिभाऊ आपल्या घरातून शेंडे साहेबांना भेटायला त्यांच्या घराकडे निघाले. कच्च्या रस्त्यावरून रॉबिन मस्तपैकी खिशात हात घालून चालत होता आणि हरिभाऊ त्याला आजूबाजूच्या परिसरात काय काय विशेष आहे हे सांगत होते. रस्त्यावरून गावातील माणसे आपापल्या शेतात काम करायला चाललेली दिसत होती. रस्त्याच्या आजूबाजूला मस्तपैकी मोठमोठी झाडे असल्याने मस्त थंडावा जाणवत होता. पुढे जाताना त्यांना गावातील लोकांची छोटी छोटी घरे दिसू लागली, ज्यामध्ये छोटस कुटुंब मावू शकेल. गाव जास्त मोठं न्हवत. हवा मस्त खेळती होती आणी वातावरण अल्हाददायक.
रेल्वे इंजिनाच्या कर्कश्य भोंग्याने रॉबिन जरासा दचकूनच जागा झाला. डोळे किलेकिले करून रॉबिनने डब्यातील खिडकीबाहेर नजर टाकली, रेल्वे कोणत्यातरी स्टेशनवर थांबली होती. रॉबिनने फलाटावर पाहिलं तर फलाटावर जास्त गर्दीपण न्हवती, तरीसुद्धा रेल्वेने हा थांबा का घेतला असं वाटून रॉबिन चरफडतच व्यवस्थित उठून बसला. अंगावर घेतलेली शाल त्याने बाजूला ठेवली आणी शरीराला आळोखे पिळोखे देत बाजूला नजर टाकली. रॉबिन रेल्वेच्या ज्या डब्यात बसला होता त्या डब्यामध्ये खूपच कमी प्रवासी बसले होते. रॉबिनच्या समोरच्या लांबलचक असलेल्या सीटवर किंवा शेजारी कोणीही बसलेले न्हवते.
संध्याकाळचे ६ वाजत आले होते. पावसाचा जोर ओसरलेला होता. दिवसभर माळरानावर चारा चरून गुरे ढोरे आपल्या गोठ्यांकडे शांतपणे जात होती, त्यांचा मागे गुराखी सुद्धा त्यांचावर न ओरडता शांतपणे हातात काठी घेऊन चालत होता. वडाच्या पारावर काही रिकामटेकडी म्हातारी उगाचच सुतकी चेहरा करत समोरच्या कच्च्या रस्त्याकडे पाहत बसलेली होती. त्या वडाच्या पाराजवळच पारगावचं छोटस सरकारी कार्यालय होतं. त्या कार्यालयाच्या दरवाजावर तशी पाटी सुद्धा लटकत होती, जवळपास मोडकळीला आलेल्या त्या कार्यालयात गणपत चोरगे हा सरकारी खात्यातील माणूस गावातील २-३ ग्रामपंचायत सदस्यांसोबत कसलीतरी चर्चा करत बसलेला होता.
उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला होता. रस्त्यावरून चाकरमान्यांची कामाच्या ठिकाणी जायची लगबग चालू होती. सकाळी अगदी नऊच्या सुमारास या बागेमध्ये लहान मुले आणि बिनकामाचे म्हातारेकोतारे लोक फेरफटका मारायला येत. त्यातले काही आपापल्या नातवांना घेऊन येत तर काही म्हातारे पाय मोकळे करायच्या नावाखाली मुलांच्या किंवा मुलींच्या संसारातील कागाळ्या एकमेकांना सांगायला येत असत. बाग तशी खूप मोठी होती. दुपारी १-४ काही तास बंद असायची आणी सकाळी ६ वाजताच उघडायची. आजसुद्धा बागेमध्ये बऱ्यापैकी लहान मुले आणी म्हातारी माणसे यांची गर्दी होती. सकाळचे कोवळे उन जाऊन आता त्याची जागा कडक उन्हाने घेतली होती.
आढ्याला करकर आवाज करत फिरणाऱ्या पंख्याकडे पाहत आपल्या दोन्हीही तंगड्या टेबलावर ठेवून रॉबिन आपल्या खुर्चीमध्ये रेलून बसला होता. दोन्ही हात डोक्यामागे बांधून शून्यात पाहत असल्याप्रमाणे तो वर फिरणाऱ्या पंख्याकडे मलूल पणे पाहत होता. त्याचा समोरच्या टेबलावर टेलीफोन, चहाचा कळकट कप आणि सिगरेटची काही थोटके रॉबिनप्रमाणेच मलूल पडलेली होती. तसं पाहायला गेलं तर या छोट्याशा घरात रॉबिन एकटाच राहत होता. मागे झोपायची एक खोली तिथे एक बेड, कपाट, त्याला चिटकुनच न्हाणीघर आणि पुढे हॉल मध्ये एक टेबल आणि २ खुर्च्या काही लोखंडी पेट्या एवढाच काय तो ऐवज होता.