गुप्तहेर रॉबिन आणि भूतबंगल्याचे रहस्य - भाग ७ (अंतिम)
रात्र चांगलीच पडलेली होती. बंगल्याच्या आसपास नेहमी असते तशीच भयाण शांतात होती, बंगल्यातील आरडाओरडा आणि भयानक किंकाळ्याचे आवाज आता बंद पडलेले असले तरी एक प्रकारची विचित्र शांतता अजूनही तिथे होती. बंगल्याच्या आतल्या भागात एका मोठ्या हॉलवजा खोलीमध्ये एका खुर्चीच्या मागे रॉबिन लपून बसलेला होता. शेजारच्याच खोलीत इ. इनामदार देखील लपलेले होते. अंधाऱ्या रात्री कोणी गुपचूप बंगल्यात प्रवेश केलाच तर त्याला बेसावध गाठून पकडण्याचा इरादा केला गेला होता.