Submitted by जोतिराम on 27 June, 2011 - 10:20
ना मी करतो प्रेम कुनावर.
ना मी झुरतो खास कुनावर
अश्रु नाहीत डोळ्यांमध्ये
कुसळच सलते उगाच सर - सर
ना मी करतो.....
म्हणती मजला उदास का तू
म्हणती मजला भकास का तू
भकास आणि उदास चेहरा
असाच दिसतो पाहता वर - वर
ना मी करतो.....
हसता मी ;" तू उगाच हसतो"
बसता मी ;" का उदास बसतो ?"
खरे बोलता "खोटे" म्हणती
" सांग मला तुज कसली हुर - हुर "
ना मी करतो.....
काय करावे मला कळेना
कसे ? हसावे मला कळेना
दु:ख आतले आतच राहुन
तरी का दिसते असेच जगभर.
ना मी करतो.....
गुलमोहर:
शेअर करा
कशी आहे?
कशी आहे?
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)