स्फुट
मी सध्या थ्री कप्स् ऑफ टी हे पुस्तक वाचत आहे .. साधारण ७०% एव्हढं वाचून झालं आहे .. आतापर्यंत पुस्तक खूप खूप एन्जॉय केलं .. अजूनही करतेच आहे पण काल-परवापासून जो भाग वाचत आहे तो वाचून थोडं उद्विग्न झाल्यासारखं वाटलं म्हणून हा प्रपंच ..
मी सध्या थ्री कप्स् ऑफ टी हे पुस्तक वाचत आहे .. साधारण ७०% एव्हढं वाचून झालं आहे .. आतापर्यंत पुस्तक खूप खूप एन्जॉय केलं .. अजूनही करतेच आहे पण काल-परवापासून जो भाग वाचत आहे तो वाचून थोडं उद्विग्न झाल्यासारखं वाटलं म्हणून हा प्रपंच ..
हल्लीच यलोस्टोन नॅशनल पार्कची ट्रिप करून आले .. काही वर्षांपुर्वीच्या मोठ्या वणव्यामुळे पार्कमधला बराच भाग (forestation, पाईन इ. वृक्ष) जळून गेला आहे .. पण निसर्गाची कमाल अशी की वणव्यातल्या उष्णतेमुळे पाईन कोन्स फुटून परत बीजांकुरण झालेलं आहे आणि बर्याचशा भागात नविन तरुण पाईनचे वृक्ष दिसून येतात .. तसे पाईन कोन्स मी रहाते तिकडेही खुपच दिसतात पण हे यलोस्टोनमधले आकाराने छोटे वाटले आणि का कोण जाणे जास्त सुंदर वाटले (सुट्टी असल्याने चिंतामुक्त असलेलं मन, वेगवेगळ्या स्वरुपात ठायी ठायी दिसणारा जादूगार निसर्ग ह्यांचा परिणाम असावा :)) ..
मैने कहा फुलोंसे हसो तो वो खिलखिलाके हस दिये ..
परवा सहज कुठल्यातरी संभाषणात आमीर खानच्या 'दिल चाहता है' आणि 'थ्री इडियट्स' मधल्या रोल्स ची तूलना केली गेली .. तर असा एक पोल घ्यावा असं वाटलं .. (हा प्रश्न 'प्रश्न' मध्ये विचारला तर चालेल का?)
आमीर खानचा कुठला रोल तुम्हाला जास्त आवडतो?
'दिल चाहता है' मधला आकाश की 'थ्री इडियट्स' मधला रँचो उर्फ फुनसुख वांगडू?
(बरेच लोक थ्री इडियट्स मधला रँचो असं 'अकॅडेमीक' उत्तर देतील असं वाटतंय तर दुसरा प्रश्न आहे की ) ह्यापैकी कुठलं कॅरॅक्टर मुलींनां जास्त आवडेल असं तुम्हाला वाटतं?
(दोन्ही प्रश्नांची उत्तरं द्या शक्य असेल तर .. :))
या वीकेन्ड ला Cherry picking ला गेलो होतो तेव्हा काढलेले हे दोन फोटो ..
1. Red Cherry
2. White cherries