पाईन कोन्स
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
7
हल्लीच यलोस्टोन नॅशनल पार्कची ट्रिप करून आले .. काही वर्षांपुर्वीच्या मोठ्या वणव्यामुळे पार्कमधला बराच भाग (forestation, पाईन इ. वृक्ष) जळून गेला आहे .. पण निसर्गाची कमाल अशी की वणव्यातल्या उष्णतेमुळे पाईन कोन्स फुटून परत बीजांकुरण झालेलं आहे आणि बर्याचशा भागात नविन तरुण पाईनचे वृक्ष दिसून येतात .. तसे पाईन कोन्स मी रहाते तिकडेही खुपच दिसतात पण हे यलोस्टोनमधले आकाराने छोटे वाटले आणि का कोण जाणे जास्त सुंदर वाटले (सुट्टी असल्याने चिंतामुक्त असलेलं मन, वेगवेगळ्या स्वरुपात ठायी ठायी दिसणारा जादूगार निसर्ग ह्यांचा परिणाम असावा :)) ..
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
छान फ़ोटो. पाईन, प्रोटिआ सारखी
छान फ़ोटो. पाईन, प्रोटिआ सारखी काही झाडे वणव्याची वाट्च बघत असतात. त्या शिवाय त्यांच्या बिया रुजत नाहीत
दोनच का प्रचि? अजून असतील तर
दोनच का प्रचि? अजून असतील तर येउदेत! छान आहेत ही.
सशल यलोस्टोन नॅशनल पार्कचे
सशल यलोस्टोन नॅशनल पार्कचे फोटो पण टाक ना .
सशल, और फोटू मंगताय. दुसरा
सशल, और फोटू मंगताय. दुसरा फोटो छान आहे.
सशल दोन्ही फोटो सुरेख आलेत,
सशल दोन्ही फोटो सुरेख आलेत, मला खूप आवडले..
मोठ्ठा व्रूत्तांत लिहा.
मोठ्ठा व्रूत्तांत लिहा. सुट्टी असल्याने चिंतामुक्त असलेलं मन, वेगवेगळ्या स्वरुपात ठायी ठायी दिसणारा जादूगार निसर्ग ह्यांचा परिणाम असावा >> हे वाक्य खूप छान आहे. नीरव जंगलात उभे राहून डोळे मिटून वास घेतला का? वूडी, मॉसी, ग्रीन, ग्रासी, विथ पाइन टॉप नोट?
अहा.. मस्त फोटो. हिमालयातल्या
अहा.. मस्त फोटो. हिमालयातल्या चकराता मधे बघितलेल्या ब्लू पाइन्सची सलग, लांबच्या लांब अरण्यं अशक्य सुंदर होती. खूप कोन्स गोळा करुन आणलेले त्यावेळी.
मामी देवदार वृक्षांच्या आसपास जरी असलं तरी सेडारचा जो सुवास येतो तो काय सुंदर असतो!