घायाळ

Submitted by जोतिराम on 1 March, 2012 - 23:21

जीव गुंतलेला भाव मांडलेला
अंधारल्या मनाचा आधार सांडलेला

दिसते तशी समोरी
का काळजात आहे
निघता मला निघेना
हा तीर खोचलेला
अंधारल्या मनाचा.........

रक्ताळल्या मनाला
इकडे दवाच नाही
तिकडे तिच्या नखांनी
हा खेळ खेळलेला
अंधारल्या मनाचा.........

आता हवी नशा ही
मदीरा किंवा धुराची
बुजवायची कशाने
हि भेग काळजाला
अंधारल्या मनाचा.........

जगतो तसाच जैसा
निष्प्राण देह आहे
कर्पुरा परी जळालो
काही न राहिलेला.
अंधारल्या मनाचा.........

--जोतिराम

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

रक्ताळ्ल्या मनाला
इकडे दवाच नाही
तिकडे तिच्या नखांनी
हा खेळ खेळलेला
अंधारल्या मनाचा.........>>

वा हसरत देहलवी

(काही ठिकाणी किंचित मात्रा दोष आहे तो घालवता येईलच म्हणा) Happy

मस्त !