अजूनही त्याच्या आठवणी

Submitted by विजय२००६ on 7 August, 2011 - 00:33

गेला श्रावण मला खूप सुखावून गेला
कारण माझ्याही नकळत
‘ तो ‘ माझ्या आयुष्यात आला.

तो आला माझ्या आयुष्यात
तेव्हा कळलं
यालाच प्रेम म्हणतात.

मग मी वहातच गेले
प्रवाहासारखी खळाळून गात गेले

मी विचारलं त्याला, ” आपण कोण आहोत ?”
तो म्हणाला, ” आत्मा एक असलेली
वेगवेगळ्या ठिकाणी धडधडणारी दोन हृदयं.”

मग आम्ही दोन हृदयांना एक करण्यासाठी धडपडलो
वेळ पडली तेव्हा प्रवाहाच्या विरुद्धही पोहत गेलो.

मग लाभला आयुष्याला एक नवा सूर
कधी आनंदाचा पूर
कधी विरहाची हुरहूर

चिवचिवणारे पक्षी, आभाळातली नक्षी
वाटलं निसर्ग आपल्या प्रेमाला साक्षी……..
……………..
………………
तो आलेला असतो त्याच्याच पावलांनी माझ्या आयुष्यात
पण जातो मृत्युच्या हात घालून हातात
……………….
अजूनही त्याचं हृदय माझ्या बाजूला उभं असतं
‘ आयुष्य उधळून टाकणाऱ्या आठवणी, फिक्या झाल्या असतील ना ? ‘ विचारतं

अजूनही त्याच्या आठवणी
माझ्या बाजूला उभ्या रहातात
अंधारातून सहज मला
प्रकाशाकडे घेऊन जातात

गुलमोहर: