Submitted by जोतिराम on 20 June, 2011 - 09:07
तु न बोलता, मला समजले
मलाच कळले, मला उमगले.....
आठवल्या मग गोड आठवणी
मन झाले मग पाणी - पाणी
पाहुन हास्य त्या ओठावरचे
तुझ्याबरोबर मनही हसले
तु न बोलता.....
प्रिय सखेगं हसलीस जेंव्हा
बहरले मन तेव्हा - तेव्हा
प्रेम तुझ्या त्या नजरेमधले
तु न खुणवता मलाच दिसले
तु न बोलता.....
वाट पाहिली, आलीच नाहीस.
का गं ? माझी तु झालीच नाहीस.
काय प्रेम ते तुला न कळले
मला समजले मला उमजले.
तु न बोलता.....
---------------------जोतिराम
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
जोतिराम छान साधी कविता... पण
जोतिराम छान साधी कविता...
पण हे जरा सुधाराल?
आठवनी -आठवणी
खुनवता-खुणवता
आलीस-आलीच
झालीस-झालीच
पल्ली आपले आभार सुधार
पल्ली आपले आभार
सुधार होईल......
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुलेशु
आशय चांगला आहे. 'तू' असे
आशय चांगला आहे. 'तू' असे 'तु' ऐवजी लिहिल्यास बरे.
धन्यवाद पल्ली.. धन्यवाद
धन्यवाद पल्ली..
धन्यवाद विदेश..
पुलेशु
धन्यवाद जाईजुई
धन्यवाद जाईजुई