मायबोली गणेशोत्सव २०१४ अंतर्गत यंदा 'अशी ही अदलाबदली' ही पाककृती स्पर्धा तसेच 'तेचबूक' ही विनोदी लेखनस्पर्धा अश्या दोन स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. या दोन्ही स्पर्धांना मायबोलीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. दोन्ही स्पर्धांना मिळालेल्या उदंड प्रतिसादांमुळे यंदा आलेल्या प्रवेशिकांमधून सर्वाधिक मत मिळवण्यार्या पहिल्या तीन प्रवेशिका विजेत्या म्हणून घोषित कराव्यात असा निर्णय संयोजक मंडळाने घेतलेला आहे. स्पर्धांचे विजेते अर्थातच मायबोलीकरांकडून झालेल्या मतदानानुसार निवडले आहेत.
तर विजेते आहेत -
अशी ही अदलाबदली - पाककृती स्पर्धा
बाळंतपण सासरीही नको माहेरीही नको, असं श्री- जान्हवी ठरवतात.
पेपरात 'फक्त जोडप्यांनाच भाड्याने जागा देणार' अशी जाहिरात पाहून तिथे शिफ्ट होतात.
जान्हवी स्टेटसः-
Shifting today to our new house..
नवीन पत्ता: लीलाबाई काळभोर बंगला, पाषाण रोड, पुणे
लाईक्सः श्री, आई आजी, कला
डिसलाईक्सः बेबी आत्या आणि तत्सम .
कॉमेन्ट्सः
पार्वती माने: नव्या सूनेने घरात येताना उखाणा घेण्याची पद्धत आहे घ्या घराची !
लाईक्सः श्री, आई आजी, बेबी आत्या आणि तत्सम.
जान्हवी: हो का.. ! बरं घेते...
गोखल्यांची सून आता होणार लीलामावशींची भाडेकरु
गोखल्यांची सून आता होणार लीलामावशींची भाडेकरु
तेचबुक - स्टेटस - मुपीफेम ज्यु. ब्रम्हे
ज्यु. ब्रम्हे - आज काकांनी पुन्हा एका तरुणीला लुनावर लिफ्ट दिली आणि साडे चार हजार रुपये गमावून बसले.
इन्स्पेक्टर महेश : डॅम इट! पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे. काहीतरी करायला हवे.
(लाईक्स : ज्यु. ब्रम्हे, ब्रम्हे काका, दया, एसीपी प्रद्युम्न, चुलबुल पांडे, सिंघम आणि समस्त हिरो पोलीस दल) (डिसलाईक्स : समस्त गुन्हेगार मंडळी)
खालील चित्र फक्त मी नेटवर पाहिलेले. पण रंग आणि शेडींग हि माझी कल्पना आहे. नाव मी स्वतःच्या हातानेच डायरेक्ट स्केचपेनने लिहिले आहे.
स्केचपेन आणि वॉटर कलर्स मिक्स आहेत.
रंगवल्यावर,
वयाच्या अटीत बसत नाही म्हणून ही प्रवेशिका ग्राह्य नाही. नसणारच आहे तर दुसराही नियम मोडला. माझ्या भाचीला चित्रं रंगवायला फार आवडतं, गेल्या ५-६ महिन्यांपासून. वयाच्या मानाने रंगवतेही छान. तिला इथली चित्रे दाखवली आणि तू रंगवणार का विचरले तर हो म्हणाली. ही दोन तिने रंगवली. अजून एक प्रिंटआउट दे ना गं आत्तू असं पण म्हणून झालय पण ते उद्यासाठी ठेवलय.
हे पहीलं. थोडे खडू थोडे स्केचपेन. पण स्केचपेन बराच वेळ घासल्याने कागद फाटला. मधेच अभ्यास आठवला तर त्यात अक्षरं पण आलीत.
गणपती बाप्पा मोरया!
लैला म्हटलं की मजनू आठवलाच पाहिजे आणि शिरीन म्हटलं की फरहाद. पाउस म्हटलं की छत्री आठवते आणि मे महिना म्हटला की उन्हाळ्याची सुट्टी. काही काही गोष्टींची खूणगाठ आपल्या मनात इतकी पक्की बसली असते की त्यांतली एक आली की दुसरी आपसूक येतेच, जसा मायबोलीचा गणेशोत्सव म्हटला की प्रकाशचित्रांचा झब्बू स्मित
खाद्यजगतही त्याला अपवाद नाहीच आणि यातल्या जोड्याही अश्या मजेशीर की जुळवत गेलो तर एक साखळीच बनून जाते. म्हणजे पाव म्हटलं की वडा आठवतो आणि वडा म्हटलं की सांबार. सांबाराबरोबर इडली येते आणि इडली म्हटलं की चटणी. चटणीबरोबर भाकरी येते आणि भाकरीबरोबर कांदा.
ज्युनिअर चित्रकार उपक्रमाची घोषणा झाल्यापासूनच यांत भाग घ्यायचे नक्की केले होते. पण नेमकी दुष्ट परीक्षा सुरू होती.
पण काल परीक्षा संपताच लगेचच कागद आणि रंग काढले कपाटातून आणि हे चित्र काढले.