तेचबुक - स्टेटस - मुपीफेम ज्यु. ब्रम्हे
ज्यु. ब्रम्हे - आज काकांनी पुन्हा एका तरुणीला लुनावर लिफ्ट दिली आणि साडे चार हजार रुपये गमावून बसले.
इन्स्पेक्टर महेश : डॅम इट! पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे. काहीतरी करायला हवे.
(लाईक्स : ज्यु. ब्रम्हे, ब्रम्हे काका, दया, एसीपी प्रद्युम्न, चुलबुल पांडे, सिंघम आणि समस्त हिरो पोलीस दल) (डिसलाईक्स : समस्त गुन्हेगार मंडळी)
गणेश-
(गणेशचतुर्थी)
आज मूषकावर बसून मामाच्या गावाला चाललो होतो.
इम्बॅलन्स होऊन गाडी स्कीड झाली.
एक दात अर्धा तुटला.
सोंडेला खरचटलं.
(डी पी- दात तुटलेल्या आणि खरचटलेल्या सोंडेचा सेल्फी)
लाईक्स- १९८७६५४३२
अनलाईक्स- १५
रिध्दी- ओह नो! तरी तुला सांगते गाडी बदल!
लाईक्स-७८६
अनलाईक्स-२- मूषक, शंकर, पार्वती
सिद्धी- आई गं! घरी ये. टी टी इंजेक्शन घ्यायला जाऊ.
लाईक्स- ८९७६
पार्वती- त्यापेक्षा मामींनी दिलेलं कैलासजीवन लाव!
लाईक्स- ऑल मायबोलीकर
अनलाईक्स-सिद्धी.
कार्तिकेयाचा मोर-
पण उंदीरमामा कसे आहेत? त्यांची कुणाला काळजी आहे का?
स्टेटस अपडेट
कृष्ण : आज धम्माल नुसती दहा मटकी फोडली. लोणी, दही, दूधाचा पूर नुसता. सगळ्या गँगने मनसोक्त हाणलं दही, लोणी. त्यात संध्याकाळी राधेची पाण्याची घागरही फोडली रंगपंचमी नसतानाही साजरी केली. कसली भडकलेली राधा. नेमकी नव्वीकोरी साडी नेसलेली, अनयने दिलेली. त्या अनयचा तर चेहरा पार पडला
लाईक्स : सुदामा आणि गँग, इतर टवाळ पोरं
डिसलाईक्स : राधा, अनय, गोकुलातल्या मोठ्या बायका ज्यांचे लोणी-दही कृष्णाने पळवले, पेंद्या