नमस्कार मायबोलीकर,
हा आपला एक हलकाफुलका 'आपला कट्टा'..येथे थोड्याफार गप्पा मारू, हितगुज करू. हलकेसे विनोद टाकू..भरपूर हसू... नविन काही शिकू -शिकवू.. विचार मांडू ,त्यांची देवाणघेवाण करू.
एकदुसर्यांच्या आवडीनिवडी जाणून घेऊ. अनुभव सांगू...
येथे येणाऱ्या सर्वांचे मनापासून स्वागत
हे वाहते पान आहे.
प्रसंग : सायना नेहवाल (सा ने) आणि पुल्लेला गोपीचंद (पु गो) लंडनहून परत येताहेत...
सा ने : दमले बुआ... एक तर खेळ खेळ खेळायचं, हिला हरव, तिला हरव...वर जरा मनासारखं खायला मिळेल तर तेही नाही. तिथे तुमची मेली ती शिस्त आडवी येते सारखी.
पु गो : मान्य. पण म्हणून तर टिकलीस ना.
सा ने : हे बरीक खरं हं गुर्जी. पण..पण.. आता मला खूप भूक लागली आहे... अब नही मै रुकुंगी, सारे बंधन तोड दुंगी, सारा जंक फूड खाउंगी... हिहाहाहा...
काल दुपारी अमेरिका खंड अचानक वर आला अर्थात पहिल्या पानावर दिसू लागला. त्यातली काही पाने परिचयाची होती तर काही अस्तित्वात आहेत हे सुद्धा माहित नव्हते. भा.प्र.वे. प्रमाणे रात्री साधारण आठ ते साडेआठ दरम्यान अचानक युरोप खंड वर आला. मायबोलीवरच्या माझ्या दोन वर्ष आणि सदतीस आठवड्यांच्या आयुष्यात ही शहरे आणि देश मी पहिल्यांदाच बघत होतो. मग लक्षात आलं की मराठी भाषा दिनानिमित्त संयोजक जवळजवळ प्रत्येक गप्पांच्या पानावर जाहीरात डकवत आहेत.