सूक्ष्म पातळीवरील गप्पा

Submitted by मंदार-जोशी on 7 February, 2012 - 01:52

काल दुपारी अमेरिका खंड अचानक वर आला अर्थात पहिल्या पानावर दिसू लागला. त्यातली काही पाने परिचयाची होती तर काही अस्तित्वात आहेत हे सुद्धा माहित नव्हते. भा.प्र.वे. प्रमाणे रात्री साधारण आठ ते साडेआठ दरम्यान अचानक युरोप खंड वर आला. मायबोलीवरच्या माझ्या दोन वर्ष आणि सदतीस आठवड्यांच्या आयुष्यात ही शहरे आणि देश मी पहिल्यांदाच बघत होतो. मग लक्षात आलं की मराठी भाषा दिनानिमित्त संयोजक जवळजवळ प्रत्येक गप्पांच्या पानावर जाहीरात डकवत आहेत.

त्यामुळे पुढील उपक्रम कधी असेल परमेश्वर जाणे असा विचार आला आणि ती पाने डोळे भरून पाहून घेतली. अशाच प्रकारे देशपातळी, शहर पातळी असे करत करत जर उपनगर पातळीपर्यंत गप्पांची पाने सुरू झाली (तशी काही आहेतच, पण घाऊक प्रमाणावर सुरू झाली) तर काय होईल असा विचार चमकून गेला. त्याचीच ही मुक्ताफळे. यामधे आपणही भर घालावी.

कोथरुड बाफ

संयोजक | 5 February, 2012 - 09:00
aMicroLevelGappa.JPG

अमुक_तमुक | 5 February, 2012 - 09:30
अग्गोबाई नवीन उपक्रम वाट्टं. पण अजून कुणीच कसं नाही इथे?

मी_कुणीतरी | 5 February, 2012 - 09:40
अग अमके, आज रविवार. कुणी नसायचंच. तुझं बोल, काय करत्येस?

अमुक_तमुक | 5 February, 2012 - 09:45
तू आहेस वाटतं. अग्गं तसही इथे कोण असतं रोज. बर मला सांग तू कुठे राहतेस?

मी_कुणीतरी | 5 February, 2012 - 09:47
मी ना, कोथरुडात Proud

अमुक_तमुक | 5 February, 2012 - 09:45
ते कळ्ळं गं. हा कोथरुड बाफ आहे मग तू कोथरुडातलीच असणार.

मी_कुणीतरी | 5 February, 2012 - 09:47
अस्सं काsssssssही नाही गो. ते बेपर्वा शायर आहेत ना, कोथरुडातले, पक्के पुणेकर असून ते असतात का पुपुवर? ते असतात गप्पागोष्टी, बे एरिया, कट्टा, इलिनॉयच्या गप्पा, मिनेसोटा, पार्ल्याच्या गप्पा, मिशिगनच्या गप्पा, सिंहगड रोड - तात्पर्य, पुपु सोडून सगळीकडे संचार करतात.

अमुक_तमुक | 5 February, 2012 - 10:05
बाप्रे! काय गो बये तुझा अभ्यास!!

मी_कुणीतरी | 5 February, 2012 - 10:07
मग, करावाच लागतो. रोमात राहून बरंच काही करता येतं बरं का Wink

अमुक_तमुक | 5 February, 2012 - 10:09
हुश्शार गो बाई तू Happy बरं मी काय म्हणत होते, कोथरुडात ते ठीके, पण तू नक्की राहतेस कुठे इथे?

अमुक_तमुक | 5 February, 2012 - 10:11
मी ना, मी सिटिप्राईड आहे ना आपलं, त्याच्या शेजारच्या गल्लीत फलाणा सोसायटीत ए विंग मधे राहते. तिसर्‍या मजल्यावर.

अमुक_तमुक | 5 February, 2012 - 10:15
कॉय साँगतेस कॉय? मी बी विंग मधे राहते . तिसर्‍याच मजल्यावर.

अमुक_तमुक | 5 February, 2012 - 10:17 <बहुतेक गॅलरीत डोकाऊन आल्यावर एकदम येक्साईट होऊन>
ए ए ए आत्ता ती गुलाबी बरमुडा दिसत्ये ती तुझ्याच घराबाहेर आहे का?

मी_कुणीतरी | 5 February, 2012 - 10:20
(मनातल्या मनातः तरी मी यांना सांगत असते असले रंग आणत जाऊ नका. कहर म्हणजे ती केशरी रंगाची बरमुडा घालून गेलेत आज.......या टवळीनं बघितलं तर? अवघडे.......जौदे)
<पतीप्रमादप्रसिद्धीपरायण नसल्याने नवर्‍याचा गाढवपणा शोन्यावर, म्हणजे मुलावर, खपवायला हवा असा विचार करुन>
अगदी बरोबर. आमच्या शोन्याची आहे ती. कॉलेजमधे उद्या मिसमॅच-डे आहे म्हणे.

अमुक_तमुक | 5 February, 2012 - 10:22
ते मरुदे, तुझं खरं नाव काय? नाही, अवलोकनात दिसलं नाही म्हणून विचारते आहे हो, नाही सांगितलंस तरी चालेल.

मी_कुणीतरी | 5 February, 2012 - 10:25
ह्याsss!!! न सांगायला काय झालं, थांब हं आत्ताच प्रोफाईल अपडेट करते. अगो टाकायचंच राहिलं बघ.

अमुक_तमुक | 5 February, 2012 - 10:30
अग्गोबाई तू का? लायब्ररीत डिव्हीडी घ्यायला येतेस ती रोज? रजिस्टर मधे नाव वाचलं होतं बरेचदा.
आत्ता च्या आत्ता घरी ये. आत्ताच आलू पराठे केलेत. माझा टोणगा गेलाय सक्काळी सक्काळी क्रिकेट खेळायला. तू काही केलं नसशील तर आपण मस्त गप्पा हाणू आणि तोंडी लावायला पराठे. ये लवकर.

मी_कुणीतरी | 5 February, 2012 - 10:32
टोणगा म्हणजे तुला पण मुलगा आहे?

अमुक_तमुक | 5 February, 2012 - 10:33
छे गं, मला दोन मुली. टोणगा म्हणजे...... Blush

मी_कुणीतरी | 5 February, 2012 - 10:35
बरं ते जाऊदे.............सोने पे सुहागा बघ! मी आत्ताच चहा केलाय. येतेच घेऊन थर्मासात. आमचा टोणगा गेला होता मागच्याच महिन्यात ऑनसाईट तेव्हा आणलाय. खिडकीतून हाय करते तुला आणि येतेच पाच मिनीटात.

aMicroLevelGappa_KHIDAKI.jpg

< कोथरुड बाफ बोंबलला. पुढच्या उपक्रमाच्यावेळी संयोजकांनी वर आणेपर्यंत. तेव्हा भेट होईलच आपली. आजच्या ठळक गप्पा संपल्या, नमस्कार >

गुलमोहर: 

Rofl

कोथरुडमध्येही डहाणूकर एक आणि वनाझ कॉर्नर दुसरा. असे जर दोन वेगळे केले नाहीत तर मी, तुम्ही, भिडे आणि लिमये एकाच पानावर दिसू लागतील. Lol

मी आता प्रवासाला निघत असल्याने उद्या एक बाफ काढून स्वतःचे मनोरंजन करून घेईन

मस्त धागा

-'बेफिकीर'!

हा हा हा........... Happy

असे होउ शकते हा पण................

सत्यघटनांवर आधारीत असे लिहि वरती Happy

मी पण काल एकदम चक्रावून गेलो होतो... पण माझ्या चाणाक्ष आणि तल्लख बुद्धीने लगेच ओळखले ही तर संयोजकांची रिक्षा... Wink

लॅन शिकत होतो ते दिवस आठवले,
ऊगाचच "ऊठ रे, किती बडवशील कि बोर्ड" किंवा " कालचे छायागीत बघितलेस का ?" असले मेसेज अगदी शेजारी बसलेल्या मित्राला जात असत.

टोणगा म्हणजे तुला पण मुलगा आहे?

अमुक_तमुक | 5 February, 2012 - 10:33
छे गं, मला दोन मुली. टोणगा म्हणजे...... इश्श !

हा हा जबरी पंचेस मंदार Happy

सॉरी मंदार, मला आधी हे नेहमीप्रमाणे स्नॅपशॉटसच वाटले म्हणून मी डोक्यावर हात मारला आणि बाफ बंद केला..!!! वाचलेच नव्हते.. वाचल्यावर Lol

मंदार, सिक्सर!!!!! Rofl सह्हीच निरीक्षण.

>>>> पुढील उपक्रम कधी असेल परमेश्वर जाणे असा विचार आला आणि ती पाने डोळे भरून पाहून घेतली. >>> Biggrin

Pages