असे कधीच म्हणू नये.
कारण,
- लोकांना आनंद होतो. बरं झालं पीडा गेली असे म्हणतात
- वाचूनही अनुल्लेख केला जातो. त्यामुळे सोडून जाणार्यास जास्त त्रास होतो. मला कुणी जवळ घेत नाही असा हंबरडाच फोडायचा राहतो.
- लोक अंदाज घेत राहतात कि किती दिवस संकल्प टिकतोय.
- आपण ठरवून काही होत नसते. दीवार मधे मदनपुरी यांनी म्हटलेले आहे. ये वन वे ट्रॅफीक है. यहा आनेका रास्ता है,जानेका नही.
- अशी घोषणा केल्यानंतर जर सांत्वन सोहळा पार पडला नाही तर माघार घेणे अवघड होते. माबोकर गप्प बसून गंमत पाहण्यात वस्ताद आहेत.
आणखी काही मुद्दे सुचले तर कळवा.
कधी कधी वेळच जात नाही. कितीही वेळाने वेळ विचारली तरी वेळ तीच असते. एखादा मिनिट इकडे तिकडे झालेला असतो आणि तासन तास घालवायचे असतात.
कधी कधी रेल्वे लेट होते. कधी बहीणीची बस आली नाही म्हणून २५ किमी वरच्या कॉलेजमधे आपण सोडायला जातो. तिथे समजते कि संध्याकाळी पण बस नाही. मग थांबायला लागते.
कधी कधी काहीही कारण नसताना वेळ जात नाही.
अशा वेळी वेळ कसा घालवावा ?
या क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत..
जग अनेकानेक चित्रविचित्र गोष्टींनी आणि घटनांनी भरलेलं आहे. अनेकदा अशा काही अतर्क्य घटना घडतात की त्यांची उकल होत नाही अथवा त्यांमागे काहीतरी अनाकलनीय कार्यकारणभाव आढळून येतो. पूर्ण खात्रीलायक आणि नि:संग्दिध उत्तर मिळत नाही. अशा काही घटना माहीत असल्यास त्या इथे नोंदवता येतील.
शिवाय इतरही काही रोचक जे जे वाटेल त्याची इथे नोंद आणि चर्चा करावी. वेगळ्या संकल्पना, वेगळे अनुभव, वेगळा विचार .... असं काहीही असू शकतं. आपल्या नेहमीच्या रटाळ जीवनापेक्षा वेगळं आणि इंटरेस्टिंग असं काहीही.
तेवढाच विरंगुळा!
मतला:
मजेमजेचे गार हवेचे चार दिवस तू भोगून घे
आहे जोवर चान्स तुला, जीवन-हला तू झोकून घे!
मक्ता:
आयुष्याच्या संध्याकाळी, म्हणतो आहे आ.रा.रा...
माझ्या वंशजा जे आम्ही तोडले, जमले तर तू जोडून घे
*
गझलेत शेर भरा, ही न. वि.
धाग्यावर विनोदी प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. आत्ता भयंकर झोप येत असल्यामुळे धागा उघडला आहे. कृपया या गहन समशेवर उपाय सुचवावा. गंभीर प्रतिसाद अमलात आणले जाणार नाहीत
संयोजकांना काम नाही
स्पर्धकांना आराम नाही
डोके उठले प्रतिसादांनी
घरात आज का बाम नाही
आयडी घेतले चारदोन
एकच असे मला नाम नाही
सगळेच येथे रंगलेले
कोणीच भोळा साम नाही
लिहीली जरी मेहनतीने
गझलेस माझ्या दाम नाही
मात्रा- १६
वृत्त- रंगलेलं
[साम= सांब= शिवशंकर]
टिप-
अ) संयोजकांना दुखावण्याचा बिल्कुल हेतू नाही.
आ) आजवरच्या जगभरातील सर्व गझलकारांची सपशेल माफी मागून.
_हाडळीचा आशिक
मैत्रिण म्हणजे
लालूंच्या भाषणातल्या हेमाच्या गालांसारखी मलमल
धावपळीच्या दिवसांत अटलबिहारींच्या भाषणातल्या पॉजसमान अवखळ
प्रेयशी म्हणजे
चिंता ओळखून फसवं आश्वासन देणा-या शरद पवारांसारखी शुभ्रमेघ
कशावरूनही रूसून बसणा-या अण्णा हजारेंसारखी पाषाणावरची रेघ
मैत्रिण म्हणजे
अचानक प्रधानमंत्री बनलेल्या देवेगौडांसारखे अनपेक्षित जग
मोदींच्या जुमल्यांप्रमाणे कधीही न बरसणारा फसवा ढग
प्रेयशी म्हणजे
चिडली कि वंदना खरेंवर घसरलेल्या कणेकरांसारखी बोटाळ
हसली कि दवणिय कवितेतल्या डायबेटिक वर्णनांसारखी मधाळ
कसला विचार करतोस रामैय्या?
"काही नाही रे, ते हर्बसोर्स घरी नाही म्हणून ही भांडून माहेरी निघून गेलीय.असल्या भिकार घरी परत येणार नाही म्हणाली.मीपण साफ सांगितलं, "हर्बसोर्स हो या क्रॅशकोर्स, नही मिलेगा!!!"
"अरे येडा की खुळा तू मर्दा?तुझी बायको घरची नुसती लक्ष्मी नाय, वनलक्ष्मी हाय वनलक्ष्मी!!!घरच्या लक्ष्मीला हर्बल आधार देणं हेच तर सामाजिक हर्बीकरणाचं उद्दीष्ठ!!जा पळ जाऊन घेऊन ये हर्बसोर्स!!"
"अरेपण हे प्रकरण कुठून घ्यायचं, कितीला घ्यायचं काही सांगशील की नाय?"
मराठी सिनेमाची सुधारलेली वितरण व्यवस्था आणि मल्टिप्लेक्स यांच्या कृपेने जळगावसारख्या छोट्या शहरांत मराठी चित्रपट प्रदर्शित होऊ लागले आहेत. त्यामुळे रवी जाधवांचा ’टाईमपास’ फर्स्ट डे ला पाहता आला. त्याचीच ही थोडक्यात ओळख-
चित्रपटाचे नाव- टाईमपास
निर्माते- नितीन केणी, निखिल साने, मेघना जाधव
कथा / दिग्दर्शक- रवी जाधव
प्रमुख भूमिका- प्रथमेश परब, केतकी माटेगावकर, वैभव मांगले, भाऊ कदम, मेघना एरण्डे इत्यादि
संगीत- चिनार-महेश