आपल्या मायबोलीवर काही अप्रतिम, एव्हरग्रीन आणि अशक्य विनोदी धागे आहेत. हे धागे म्हणजे डिप्रेशनवर रामबाण उपाय. जरा 'लो' वाटायला लागलं तर यापैकी कोणताही धागा उघडून सरळ वाचायला सुरुवात करा आणि आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करा. प्रतिसादात जे धागे सुचवले जातील त्यातील निवडक इथे एकत्र साठवून ठेवण्यात येतील.
कृपया धाग्याचे नाव, धागा काढणार्या आयडीचे नाव आणि धाग्याची लिंकही खालील फॉरमॅटमधे द्या.
* लहानपणीचे नसते उद्योग - योडी - http://www.maayboli.com/node/8242
* मला चुकीची ऐकू आलेली गाणी - परदेसाई - http://www.maayboli.com/node/2660
कालच्या एका दिवसात ३-३ टुल्ली पेयकृत्या आल्या आणि अजुन पेयकृत्या येण्याच्या वाटेवर आहेत असे 'जाणकार' म्हणतायत.
पण या पेयांबरोबर खायच्या फिंगरफूड बद्दल कुणीच बोलेना....म्हंटल एक धागाच काढु...
काल दुपारी अमेरिका खंड अचानक वर आला अर्थात पहिल्या पानावर दिसू लागला. त्यातली काही पाने परिचयाची होती तर काही अस्तित्वात आहेत हे सुद्धा माहित नव्हते. भा.प्र.वे. प्रमाणे रात्री साधारण आठ ते साडेआठ दरम्यान अचानक युरोप खंड वर आला. मायबोलीवरच्या माझ्या दोन वर्ष आणि सदतीस आठवड्यांच्या आयुष्यात ही शहरे आणि देश मी पहिल्यांदाच बघत होतो. मग लक्षात आलं की मराठी भाषा दिनानिमित्त संयोजक जवळजवळ प्रत्येक गप्पांच्या पानावर जाहीरात डकवत आहेत.
वेळ : सकाळी ७:०० वाजता
स्थळ : एका तारांकित हॉटेलातील कॉफी शॉप
वार : रविवार
काचेच्या एका भल्या मोठ्या फ्रेंच विंडोजवळची दोन - तीन टेबले पकडून गुबगुबीत सोफ्याच्या आणि मखमली खुर्च्यांच्या आत रुतलेले अस्मादिक. आजूबाजूला स्वतःला आजही तरुण म्हणवून घेणार्या एके काळच्या सहाध्यायांचे नळकोंडाळे. बहुतेकांच्या चेहर्यावर रविवारी भल्या पारी उठायला लागल्याची उद्विग्नता. कोणी पालथ्या हाताने तोंड झाकून जांभई दडपतंय तर कोणी नाक चिमटीत पकडून बसलंय. अजून डोळ्यांवरची झापड गेली नसल्याने वातावरणात एक प्रकारचे चिंतनशील झोपाळू स्पंदन! 
स्लो शटरस्पीड वर केलेला प्रयोग. कॅमेरा सेटींग- f.no-22, s.speed-b(bulb mode), iso-400.
नेहमी स्लो शटरस्पीडला कॅमेरा स्थीर ठेवला जातो पण या वेळी मी रस्त्यावरील वाहन ,त्यांनची हेडलाईट्,ब्रेकलाईट
ही मुहमेंट करताना व रस्त्यावरील दिवे चालु असताना. माझ्या कॅमेराचे शटर दाबुन वेगवेगळ्या तह्रेने कॅमेरा
हलवला आणि शीवाय अँगल बदलत. पहा आवडल तर प्रयोग करुन बघा मजायेते.
प्रचि १

प्रचि २

प्रचि ३