वेळ कसा घालवावा ?

Submitted by ढंपस टंपू on 1 August, 2023 - 11:20

कधी कधी वेळच जात नाही. कितीही वेळाने वेळ विचारली तरी वेळ तीच असते. एखादा मिनिट इकडे तिकडे झालेला असतो आणि तासन तास घालवायचे असतात.

कधी कधी रेल्वे लेट होते. कधी बहीणीची बस आली नाही म्हणून २५ किमी वरच्या कॉलेजमधे आपण सोडायला जातो. तिथे समजते कि संध्याकाळी पण बस नाही. मग थांबायला लागते.

कधी कधी काहीही कारण नसताना वेळ जात नाही.
अशा वेळी वेळ कसा घालवावा ?

या क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिनेमे बघा एकामागून एक ओटिटिवर...
पुस्तके वाचून संपवा धडाधड...
चालायला जा गाणी ऐकत झपाझप...
योगासने घाला १०० एका वेळी...
मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारा...
सेल्फीज काढत बसा भारंभार...
अजून आठवून सांगेन.

आपल्या आवडीच्या किंवा आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत त्यासंबंधी एखाद्या विषयातले काही समजले नसेल अथवा एखादी समस्या सुटत नसेल तर हा वेळ ते समजून घेण्यावर चिंतन मनन करण्यासाठी द बेस्ट असतो असा माझा स्वानुभव.

आजकाल तर अजून सोपे झाले आहे. अक्षरशः हाताच्या बोटाशी जगातले सारे ज्ञान हात जोडून उभे आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरू नये असा आजचा काळ आहे. गुगल आणि ChatGPT इत्यादी वर आपण असे प्रश्न विचारून जगातले कोणतेही ज्ञान समजून घेऊ शकतो.

मायबोलीवर पावलोपावली प्रचंड समृद्ध धागे आहेत आणि त्या प्रत्येक धाग्यावर परांचे केलेले हजारो कावळे दिशा भरकटुन वाट्टेल तसे उडत असताना ‘वेळ कसा घालवावा?’ असा प्रश्न विचारणारा घ्धागा त्याच माबोवर निघावा याचे वैषम्य वाटते.

तरी, सल्ला देणे हे आद्य कर्तव्य असल्याने - वेळ घालवण्यासाठी -

१. कुठलाही धागा उघडा आणि मनाला येईल ते खरडत बसा. धाग्याशी असुसंगत लिहिता आले तर अतिउत्तम. खुप चांगला प्रतिसाद म्हणुन तुमचे कौतुक होईल. बघा प्रयत्न करुन.

२. पन्नास आयडी काढा. एका आयडीने एक धागा काढा. विषयाचे बंधन नाही, विषय जितका जास्त फालतु तितका धागा सतत पहिल्या पानावर राहायचे जास्त चान्सेस. उरलेल्या ४९ आयडींपैकी अर्ध्यामधुन सहमतीचे प्रतिसाद द्या. उरलेल्या अर्ध्यांमधुन विरुद्ध आघाडी उघडा. बाकीचे लोक तोवर येतीलच मदतीला. १००० प्रतिसाद सहज होतील. वेळ तर कापरासारखा भुरभुरेल.

इंटरनेट असेल तर मायबोली वाचत बसायचे. इंटरनेट नसेल तर पुढचा धागा कुठला काढायचा यावर विचार करण्याची प्रक्रिया सुरु ठेवायची. धागा काढायचा नसेल तर निसर्गाचे ( दगडे/ धोंडे/ वनस्पती/ पक्षी.... माणसे/ जनावरे/ माती) निरीक्षण करा.... बरेच काही शिकवेल मग तुम्ही आम्हाला पण शिकवा. Happy

इतरांचा वेळ जावा म्हणून धागा काढलात का...धन्यवाद....
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती
बोटे कष्टविती धागे काढूनी...

१)तुमचं वय ठरवेल.
२) न केलेल्या गोष्टी करायला,शिकायला सुरूवात करणे. आणि त्याची वाच्यता न करणे.
३) मनोरंजन - सिनेमे पाहणे वगैरे या कामातून सवड काढून करायच्या गोष्टी आहेत. वेळ घालवण्याच्या नाहीत.

वेळ जात नाही म्हणजे तुमचे आयुष्य दीर्घ आहे. कॅच २२ कादंबरीत एक माणूस बेड वर आडवे पडून छताकडे तासनतास पाहत असतो, आयुष्य वाढवण्यासाठी. कारण प्रचंड बोर झाल्यावर प्रत्येक क्षण आपण लक्ष देत जगतो.

सध्याचे युग हे धावपळीचे व स्पर्धेचे युग आहे, असे म्हणता येईल. आज प्रत्येक व्यक्ती या स्पर्धेच्या युगात स्वतः चे अस्तित्व टिकविण्यासाठी जीव तोडून मेहनत करताना दिसत आहे. स्वतः च्या अस्तित्वाच्या लढाईत मनुष्य हा या जीवघेण्या स्पर्धेचा एक भाग बनत चालला आहे. अशावेळी त्याला मोठ्या ताणतणावाचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्याचे आयुष्य हे नरकापेक्षा देखील भयावह होऊन बसते.

रोजच्या त्याच त्याच कामाने आणि दगदगीने तो स्वतः कडे तसेच परिवाराकडे म्हणावे तसे लक्ष देऊ शकत नाही. विरंगुळा तर फक्त नावालाच शिल्लक राहतो. कारण विरंगुळा म्हणून एखादी गोष्ट करावी तर नित्याचे काम त्याच्या मानगुटीवर बसलेलेच असते.

मित्रांनो हीच बाब लक्षात घेऊन आपल्यासाठी येथे मराठी भाषेतून मराठी लोकांचा मराठी वेळ घालवण्याची खाणच उपलब्ध करून दिली आहे ह्याकरिता मनःपूर्वक धन्यवाद !

महिलामंडळ दुसऱ्यांसाठी स्वतःचा वेळ घालवत असतात. पुरुषमंडळी फक्त उभे किंवा बसून त्यांचा स्वतःचा वेळ घालवायला पैसे खर्च करतात. त्यावर धागेही काढून मतं मागवतात.
त्यामुळे दोन वेगळे धागे काढावेत ही विनंती.

सर आपण ज्या वेगाने विविध विषयावर धागे काढता त्यावरून तुमच्याकडे वेळच वेळ असावा आणि धागे काढून काढून तुमच्या कडे वेळ शिल्लक नसावा असा आमचा समज झाला होता. Light 1
पण इतके सारे धागे काढूनही वेळ उरत असेल तर प्रत्येक धागा शतक कसे यासाठी उलासुलट प्रतिसाद देने, आपल्याच धाग्यावर वेगवेगळ्या रुपात प्रकट होऊन गोंधळ घालणे व त्यातुन पब्लीकला वेड्यात काढणे. असे अनेक उपक्रम राबवता येतील.

द हंट फॉर वीरप्पन बघा नेटफ्लिक्सवर चार एपिसोड्स प्रत्येकी चाळीस मिनटं..चांगली आहे..दुसरा एपिसोड थरारक आहे..चांगला वेळ जाईल.

वेळ मिळाला की वाचन करा.
एकदा वेळ निघून गेली की परत येत नाही, कितीही पैसे द्यायची तयारी असली तरी. वेळ फार बहुमूल्य आहे, वाया घालवू नका.