मैत्रीण आणि प्रेयशी ( बायको पण)

Submitted by किरणुद्दीन on 11 October, 2018 - 06:36

मैत्रिण म्हणजे
लालूंच्या भाषणातल्या हेमाच्या गालांसारखी मलमल
धावपळीच्या दिवसांत अटलबिहारींच्या भाषणातल्या पॉजसमान अवखळ

प्रेयशी म्हणजे
चिंता ओळखून फसवं आश्वासन देणा-या शरद पवारांसारखी शुभ्रमेघ
कशावरूनही रूसून बसणा-या अण्णा हजारेंसारखी पाषाणावरची रेघ

मैत्रिण म्हणजे
अचानक प्रधानमंत्री बनलेल्या देवेगौडांसारखे अनपेक्षित जग
मोदींच्या जुमल्यांप्रमाणे कधीही न बरसणारा फसवा ढग

प्रेयशी म्हणजे
चिडली कि वंदना खरेंवर घसरलेल्या कणेकरांसारखी बोटाळ
हसली कि दवणिय कवितेतल्या डायबेटिक वर्णनांसारखी मधाळ

दोघीतली एक बायको झाली कि
उरलेली म्हणजे

सरकली कि मायबोलीच्या पेटत्या धाग्यावरची फुलझडी
थकली कि अ‍ॅडमिनने गोठवलेला शांत क्लांत आयडी

प्रेयसी हा शब्द प्रेयशी असा आहे हे समजल्याने तो तसा वापरला आहे. ही कविता चोरीची नसून इथल्याच कुणा थोरकवीपासून प्रेरणा घेतलेली आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

प्रेयसी हा शब्द प्रेयशी असा आहे हे समजल्याने >>>>>हे कुठुन समजलं? शब्दाच्या धाग्यावर का? Happy
नवीन Submitted by सस्मित on 11 October, 2018 - 17:16

प्रिय + अशी = प्रेयशी ~ प्रेयसी