कसला विचार करतोस रामैय्या?
"काही नाही रे, ते हर्बसोर्स घरी नाही म्हणून ही भांडून माहेरी निघून गेलीय.असल्या भिकार घरी परत येणार नाही म्हणाली.मीपण साफ सांगितलं, "हर्बसोर्स हो या क्रॅशकोर्स, नही मिलेगा!!!"
"अरे येडा की खुळा तू मर्दा?तुझी बायको घरची नुसती लक्ष्मी नाय, वनलक्ष्मी हाय वनलक्ष्मी!!!घरच्या लक्ष्मीला हर्बल आधार देणं हेच तर सामाजिक हर्बीकरणाचं उद्दीष्ठ!!जा पळ जाऊन घेऊन ये हर्बसोर्स!!"
"अरेपण हे प्रकरण कुठून घ्यायचं, कितीला घ्यायचं काही सांगशील की नाय?"
"सांगतो ना!!!
आजच्या युगात मनुष्य तऱ्हेतऱ्हेच्या ताणतणावांना सामोरं जातो.कोळश्याचा फेसवॉश वापरतो.जरदाळूचा शॅम्पू वापरतो.कॉफीचा साबण वापरतो.सिगारेट च्या वासाचा डियो वापरतो.लोणच्या चटणी च्या फ्लेवर चं आणि काय काय वापरतो.अरे इतकं सगळं वापरता तर धकाधकीच्या जीवनात कपडे प्लेन का वापरायचे?सो ओल्ड स्कुल!!!वापरा हर्बसोर्स चे शर्ट, कुर्ते, लेगिंग आणि स्कर्ट!!
पायात वेदना?मग सुतशेखर पॅन्ट आणि स्कर्ट आणा ना!
पायाला भेगा?कोकमाच्या सालीचे लालचुटुक मोजेवापरू लागा!!
गळा दुखून येतोय थकवा?आमच्या भीमकापूर टाय ने दाबून प्रश्नच मिटवा!!
डोळेही जळजळतायत?वापरा त्रिफळा हिरडा चष्मा आणि खतम करा उष्मा!!
सर्दी झाली, डोकं ठणकतंय?वापरा स्कल कॅप विथ वेखंड आणि चालत राहा अखंड!!!
अहो, आजच आणा हर्बसोर्स!!!सर्व पोस्ट ऑफिसेस, सिनेमा घरे,ए टी एम आणि चहाच्या दुकानांमध्ये उपलब्ध!!!किंमत फक्त 999 रुपये 99 पैसे!!कृपया सुट्टेच आणा."
"गड्या, तू माझे डोळेच उघडलेस बघ!!आताच जातो आणि हर्बसोर्स घरी आणतो!!"
हा शहाणा झाला, तुम्हीही वेळीच शहाणे व्हा, आणा हर्बसोर्स!!!
मस्तच
मस्तच
मस्त नेहमीप्रमाणेच
मस्त नेहमीप्रमाणेच
मस्त
मस्त
मस्त
मस्त
अनुजी, आपल्या विनोदबुद्धीला _
अनुजी, आपल्या विनोदबुद्धीला __/\__
भारी!
भारी!
भारी! :Lol:
भारी!
भारी!
भारी!
गळा दुखून येतोय थकवा?आमच्या भीमकापूर टाय ने दाबून प्रश्नच मिटवा!!
डोळेही जळजळतायत?वापरा त्रिफळा हिरडा चष्मा आणि खतम करा उष्मा!!
सर्दी झाली, डोकं ठणकतंय?वापरा स्कल कॅप विथ वेखंड आणि चालत राहा अखंड!!! >>
आणि शेवटचे वाक्य तर पोस्टर बाॅईज स्टाईल!
Sahi!
Sahi!
मस्त आहे हे
मस्त आहे हे
मस्त. कल्पक प्रॉडक्टस
मस्त. कल्पक प्रॉडक्टस
शॉलेट जमलंय!
शॉलेट जमलंय!
शॉलेट जमलंय!
शॉलेट जमलंय!
अनु, काय भारी लिहिलंय गं!
अनु, काय भारी लिहिलंय गं! रेडिओ ऐकते का? एक कार्यक्रम लागतो त्याच नाव नाही आठवतं शासकीय योजना ची माहिती दिल्या जाते त्याची आठवण झाली.... वाचताना श्रृतिका ऐकत होते
(No subject)
(No subject)
(No subject)
गळा दुखून येतोय थकवा?आमच्या
गळा दुखून येतोय थकवा?आमच्या भीमकापूर टाय ने दाबून प्रश्नच मिटवा!! =___^_____
खतरनाक
खतरनाक
सॉलिड
सॉलिड
(No subject)
भारी जमलिय, खूप आवडली.
भारी जमलिय, खूप आवडली.
मस्त. आवडली
मस्त. आवडली
(No subject)
अग ए, किति हसवशिल?
अग ए, किति हसवशिल?
गळा दुखून येतोय थकवा?आमच्या
गळा दुखून येतोय थकवा?आमच्या भीमकापूर टाय ने दाबून प्रश्नच मिटवा!!>>>>>>>
छान आहे जाहिरात
भारीच
भारीच
>>गळा दुखून येतोय थकवा?आमच्या
>>गळा दुखून येतोय थकवा?आमच्या भीमकापूर टाय ने दाबून प्रश्नच मिटवा!!
भारी....
पायात वेदना?मग सुतशेखर पॅन्ट
पायात वेदना?मग सुतशेखर पॅन्ट आणि स्कर्ट आणा ना!
पायाला भेगा?कोकमाच्या सालीचे लालचुटुक मोजेवापरू लागा!!
गळा दुखून येतोय थकवा?आमच्या भीमकापूर टाय ने दाबून प्रश्नच मिटवा!!
डोळेही जळजळतायत?वापरा त्रिफळा हिरडा चष्मा आणि खतम करा उष्मा!!
सर्दी झाली, डोकं ठणकतंय?वापरा स्कल कॅप विथ वेखंड आणि चालत राहा अखंड!!!
छान ,
छान आहे
छान आहे