पुलंनी कुठेतरी मर्ढेकरांच्या ओळी उद्धृत केल्यात 'हर गार्डाची शिट्टी न्यारी'. मुक्तांगणच्या समुपदेशकांच्या बाबतीत ही गोष्ट अगदी खरी आहे. आपल्याला वाटतं कि व्यसनी माणसांना समुपदेशन करणारे सर्वजण वेगळं असं काय सांगणार? पण येथे प्रत्येकाची खासियत वेगळी आहे. प्रत्येकाचा ढंग न्यारा आहे. समस्येशी भिडताना प्रत्येक जण जरी समोरच्याला व्यसनमुक्त करण्यासाठी धडपडत असला तरी त्यांच्या पद्धतीत फरक आहे. त्यामुळे यांच्याशी बोलताना कधीही कंटाळा येत नाही. मुक्तांगणला गेलात कि आधी कसुन तपासणी होते. अंबाड्यातुन तंबाखु लपवुन नेण्याचे प्रकार आढळल्याने तपासणीला पर्याय नाही. आत शिरलात कि डावीकडे वायंगणकरसर.
तेरे आने की आस है दोस्त
शाम फिर क्यों उदास है दोस्त
महकी महकी फिजां ये कहती है
तु कहीं आसपास है दोस्त
तु कहीं आसपास है दोस्त
गुरुवर्य नरहर कुरुंदकरांनी एकदा म्हटलं होतं कि समाज व्यवहार हा गुंतागुंतीचा आणि अनेकपदरी असतो. तो सोपा करुन पाहता येत नाही. मोदी जिंकले ते प्रामुख्याने विकासाच्या मुद्द्यावर. समाजव्यवहारात विकास हा फक्त आर्थिक असु शकेल काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही धरणं बांधाल, खेडोपाडी वीज खेळवाल, रस्ते बांधाल. पुल होतील. घराघरात लॅपटॉप्स येतील, दारिद्र्य रेषेखालील असणार्या माणसांची संख्या कमी होईल. प्रत्येकाला काम मिळेल. हा विकास आहेच. पण त्यामुळे मग उच्चवर्णिय मुलिवर प्रेम केलं म्हणुन हत्या होणं थांबणार आहे काय? खैरलांजीमध्ये ज्याप्रमाणे बायकांना विटंबना करुन मारलं गेलं ते थांबणार आहे काय?