पैसा झाला खोटा
“बहनो और भाईयों“ अशी प्रेमाने साद घालून पंतप्रधानांनी 8 नोव्हेंबरच्या रात्री 8 वाजता त्यांच्या भाषणात चलनबंदीची घोषणा करून अख्या भारतालाच नाही तर सगळ्या जगाला एक जोरदार धक्का दिला. या निर्णयाचे फायदे तोटे यावर आज एक वर्षांनंतरदेखील जोरदार चर्चा झडत आहेत. या निर्णयाने काळ्या पैशाच्या वापरावर बंधने येतील असे जोरदार प्रतिपादन करण्यात आले. त्या धाग्याला धरून आणि आज या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होते आहे त्याचे निमीत्त साधून एक कथा आपल्या समोर सादर करत आहे. ही कथा, घटना व यातील पात्रे ही पूर्णपणे काल्पनिक असून यांचा वास्तविक जीवनाशी काडीमात्र संबंध नाही आणि असल्यास तो निव्वळ एक योगायोग समजावा.