भरपूर पैसे मिळवावेत असे कोणाला वाटणार नाही? बहुतांश लोकांना तसे वाटते तरी किंवा भोवतालची परिस्थिती तरी त्यासाठी प्रयत्न करायला भाग पाडते. भारत हा अफाट लोकसंख्या असलेला देश आहे. साहजिकच इथे संघर्ष खूप आहे, भ्रष्टाचारसुद्धा बराच आहे. शिवाय भारतात श्रममूल्य हे पाश्चात्य देशांच्या तुलनेत कमी आहे. अशा परिस्थितीतून प्रयत्न करुन आर्थिक समृद्धी आणण्याचे महत्कार्य पार पाडावे लागते.
थिंक अँड ग्रो रिच हे श्रीमंत कसे व्हावे या विषयावर बरेच गाजलेले पुस्तक विशेषत: अमेरिकन जनता डोळ्यासमोर ठेवून लेखक नेपोलियन हिल यांनी हे पुस्तक लिहिले होते. यालाही साधारण ८४ वर्षे होऊन गेली.
लहानपणी पावसाळ्यात अंदाजे ३२ पायांचा कधीकधी केसाळ तर कधी पाठीवर रंगीत ठिपके असलेला सरपटणारा छोटा जीव दिसायचा त्याला आम्ही पैसा म्हणायचे. मी सध्या US la राहतो आणि अश्या प्रकारच्या सरपटणाऱ्या जीवाचे दर्शन कमीच. त्यात पहिल्या मजल्यावर घरामध्ये तर दर्शन दुर्मिळच. तर झाले असे की हा पैसासदृश प्राणी परवा मला बाथरूम मधून बाहेर तुरुतुरु पळताना दिसला. मी त्याला अलगदपणे पानावर उचलून बाहेर टाकला. परंतु अजून एक तसाच आज बाथटब मध्ये निवांत पहुडताना दिसला. असे म्हणतात की का 'पैसा' दिसला की घरात पैसा येतो.
उत्तर कमी प्रश्न फार
सुटणार कसे? याचा भार
ना देव ना नाती ना सोबती
पैसा जीवनी खरा आधार
खिशात पैसा असे सुख भारी
शितांच्या भुतांना येई उभारी
पैसा नसणे दु:ख ही भारी
वाढे खात्यात उपकारांची उधारी
पैसा आनंद घेऊन येतो
गर्वाची सुबत्ता भाळी आणतो
जाताना उदास करुन जातो
स्वाभिमानी धार बोथट करतो
पैसा पाहुणा येतो जातो
अगत्य याचे करा आदराने
प्रामाणिक कष्ट जिथे दिसते
त्या घराशी हा जपतो नाते
-निखिल १३-०३-२०१८
“बहनो और भाईयों“ अशी प्रेमाने साद घालून पंतप्रधानांनी 8 नोव्हेंबरच्या रात्री 8 वाजता त्यांच्या भाषणात चलनबंदीची घोषणा करून अख्या भारतालाच नाही तर सगळ्या जगाला एक जोरदार धक्का दिला. या निर्णयाचे फायदे तोटे यावर आज एक वर्षांनंतरदेखील जोरदार चर्चा झडत आहेत. या निर्णयाने काळ्या पैशाच्या वापरावर बंधने येतील असे जोरदार प्रतिपादन करण्यात आले. त्या धाग्याला धरून आणि आज या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होते आहे त्याचे निमीत्त साधून एक कथा आपल्या समोर सादर करत आहे. ही कथा, घटना व यातील पात्रे ही पूर्णपणे काल्पनिक असून यांचा वास्तविक जीवनाशी काडीमात्र संबंध नाही आणि असल्यास तो निव्वळ एक योगायोग समजावा.
तुम्ही आपल्या मुलांना शिक्षण का देता?
मुलांना एक उत्तम मनुष्य बनवायला?
त्यांच्या व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास घडवायला?
त्यांना देशाचा (किंवा समाजाचा) एक आदर्श नागरीक बनवायला?
की त्यांच्यावर पैश्याची गुंतवणूक करून पैसे कमवायला?
>>>>>
धागा सुचायला संदर्भ हायझेनबर्ग यांची माझ्या खालील धाग्यावर आलेली शिक्षण आणि जुगाराची तुलना करणारी पोस्ट -
>>>>>>
http://www.maayboli.com/node/63125?page=2
>>>>>>>>
सध्या थोडेसे पैसे जमा आहेत अन कन्फ्युजनही वाढले आहे. पैश्याला पैसा जोडुन तो वाढावा ही किमान अपेक्षा. फ्लॅट आहे सध्याचा अन मी दुसरा घेणे म्हणजे परत रेंट ने देणे आले अन त्यात घर खराब होणार ते नको वाटते. कुठली गुंतवणुक चांगली आहे? पुण्यात कुठल्या एरियात?
जाणकार माहीती देतील ही अपे़षा. पैसे विदाउट रीक्स कुठेच नाही.
एक विनोद ऐकला होता. एका व्यापा-याला एकदा हृदयविकाराचा झटका येतो. शस्त्रक्रीयेनंतर जेंव्हा त्याला शुद्ध येते तेंव्हा जमलेल्या आपल्या मुलांना, बायकोला तिजोरी, गाडी, शेअर्स, याबाबतचे प्रश्न विचारतो. तिजोरी सुखरूप आहे, गाडीला काही झालं नाहीये, शेअर मार्केट तेजीत आहे वगैरे कळल्यावर अचानक दचकून विचारतो,"तुम्ही सगळे इथे आहात, मग दुकानात कोण आहे??"
अशी खरंच काहींची अवस्था असते. पैसा नसलेल्याला झोप न येणं रास्त आहे, पण अमाप पैसा असलेल्यांनाही झोप महाग होते. पैशाचा अति विचार किंवा अति पैसा आणि मग त्याचा विचार यापैकी एक आजार जडतो त्यांना. आणि मग त्यात असे गुंततात की सुटका कठीण होते. म्हणूनच,