"मुलींकडे बघू नकोस." दारातून बाहेर पडता पडता अदितिच्या वाक्याने मी दारातच थबकलो .. थोड्याश्या आनंद मिश्रित आश्चर्याने तिच्या कडे बघत मी काही म्हणनार तेवढ्यात ती पुढे म्हणाली."मुंबईला चालला आहेस ना? मुलींकडे बघत बसू नको.. कामाकडे लक्ष्य दे..नाही तर काम राहील बाजूला." असे म्हणून तिने एक गोड स्मितहास्य दिले. आज दोन वर्षात पहिल्यांदाच ती असे आपलेपणाने बोलत होती "आणि हो परत आल्यावर येऊन जा." आश्चर्य आणि आनंदाने तोंडून शब्दच फुटले नाहीत. "कधी येणार आहेस परत?".."आठवडा तरी लागेल." "ठीक आहे मी वाट बघतिये." " हो हो "म्हणत मी जिना जणू तरंगतच उतरलो
मोटर सायकलला किक मारून निघालो ...
अदिति ....... पाच सहा पूर्वी सांभाजी उद्यानात "है ओळखलास का?" असे अचानक समोर येऊन म्हणणारी हीच ती अदिति. मी काही म्हणायच्या आत मित्रिणीन कडे वळून तीच म्हणाली, "थांबाहा. ओळख करून देते.. हा राहुलचा मित्र. ......"
राहुल...... कॉलेजच्या सेकंड ईयर पासून शेजारी राहणार्या अकरवीतल्या मुली बरोबर जमवयचा प्रयत्नात होता. काही महिन्यांन पृवीच आपले जमल्याचे सांगून त्याने माझी आणि अदितिची ओळख करून दिली होती. अदिति फारच सुंदर होती. एखाद्या स्त्री कडे असायला पाहिजेत त्या सर्व गोष्टी तिच्यात होत्या प्लस अतिशय खेळकर आणि आनंदी स्वभाव होता तिचा. पहिल्या भेटीतच अदितिने आपली छाप पाडली होती.
परीक्षा जवळ आल्या आणि क्याम्पस सेलेक्श्नची धूम सुरू झाली. राहुलला बांगलोर स्थित एका मोठ्या कंपनीने ऑफर दिली. नौकारीची पार्टी मी, राहुल आणि अदिति सेलेब्रेट करायला एका चायनिज रेस्तरन्त मध्ये गेलो होतो. संपूर्ण पार्टीमध्ये अदितिचे लक्ष्य माझ्याकडेच होते असे माला उगाचच वाटत होते....माझ्या छोट्या छोट्या जोक्सना सुद्धा ती मनमुराद दाद देत होती. हॉटेल मधून बाहेर येताच अदिति राहुला म्हणाली होती " तुझ्या सगळ्या मित्रात मला हा आवडला .. एकदम डाउन टु अर्थ आहे आणि अतिशय हजरजवाबी." थोडी चढलेला राहुल म्हणाला "खर तर हिचे आणि तुझेच जमायचे ... लेकीन आब ये मेरी है."
राहुल बंगलोरला रवाना व्हायच्या आधी त्याचा आणि अदितिचा साखर पुडा झाला..
पुढे मी माझ्या जॉब मध्ये व्यस्त झालो आणि इतर वास्तवतेशी संबंदच तुटला. दोन वर्ष नौकारी केल्या वर स्वत:चा व्यवसाय सुरू करून नौकरी सोडली. घरच्या वातावरणाचा म्हणजे आई वडलांच्या सततच्या कुरबुरींचा आता कंटाळला आला होता. म्हणून लग्न करायचे पण टाळत होतो . पण अखेर सर्व नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या आघ्रहा खातर मला लग्न करावे लागले. माझ्या लग्नानंतर लगेचच आई बाबा विभक्त झाले. बायको बरोबर बारीक सारिक कुरबुरी रोजच असायच्या. ह्या सर्व गोष्टींचा व्यवसायावर व्हयचा तोच परिणाम झाला. . .धंदा कमी होत गेला, परणामी उत्पन्न घटले. छोट्या छोट्या कुरबुरी आता वावटली झाल्या आणि एक दिवस बायको मुलीला घेऊन घर सोडून गेली.
दुपारचा वेळ घालवायचा म्हणून आज अनेक दिवसांनी निलयामला सिनेमाला आलो होतो. टिकिट काढून गर्दीतून जरा बाजूला गेलो. कोणीतरी आपल्या कडे बघताय असे वाटून त्या दिशेला बघितले. अदिति? तिच्या समोर जाऊन उभा राहिलो. "अदिति? काय म्हणतेस? कशी आहेस?" रंग गेलेल्या कपड्या सारखे दिसणार्या, ओकयाबोक्या गळ्याच्या आदिती कडे बघवत न्हवते. काही तरी जबरदस्त बिनसल्याचे जाणवले. "मी ठीक आहे तू कसा आहेस?" एक छोटीशी स्मित रेषा चेहर्यावर उमटवत ती म्हणाली "थांब आईशी ओळख करून देते, आणि बाजूलाच असलेल्या आईशी तिने माझी ओळख करून दिली "आई हा....... आमच्या वर्गात होता." वर्गात? मी जरा चमकलोच...राहुलचा मित्र का नाही म्हणाली ? जाऊ देत म्हणत मी जास्त विचार नाही केला.
सिनेमाला फार गर्दी न्हवती त्या मुळे मी त्यांच्या शेजारीच बसलो. सिनेमा संपल्या वर तिच्या आईने मला घरी चालयचा आग्रह केला. माझ्या कडे त्या कसल्याश्या अपेक्षेने बघता आहेत असे उगाचहच वाटले. "आज नको प्लीज परत नक्की येईन" असे म्हणत मी तिथून निघालो आणि ऑफिस वर गेलो.
"सर कुठे होतात ?" "का काय झाले?" "काही नाही सर आपण जी ऑर्डर मिळवायचा प्रयत्न करत होतो त्याची ट्रायल ऑर्डर सहा महिन्यां साठी मिळाली आहे.".. " ग्रेट" असे म्हणेस तोवर तो म्हणाला "त्याहूनही एक मोठी बातमी आहे." "काय?" "सर आपले ........... कंपनीत अडकलेले सगळे पेमेंट आले" अदिति? माझे मन विचारांच्या वावटळीत अडकले.
"कॉफी घेना गार होईल." निलयाम वरच्या भेटी नंतर मी प्रथमच अदिति कडे आलो होतो. "हो घेतो." "विचारांच्या मालिकेततुन बाहेर येत मी म्हणालो "अदिति, राहल..." मला पुढे काहीही बोलू न देता "मला ह्या विषयावर काहीही बोलायचे नाहीये" अदिति म्हणाली "तू बस मी जरा जाऊन येते..अन्वय ला घेऊन येते.".. "अन्वय?" "हो तुझ्या राहुलचा प्रसाद." असे म्हणून ती गेली सुद्धा. "ती खूप दुखवलेली आहे" तिची आई म्हणाली "राहुल लग्नाला आलाच नाही.. बंगलोरलाच कुठल्या तरी इंडस्ट्रियल फ्यामिलीत त्याने लग्न केले" "काय?" मला हा शॉकच होता. "काय म्हणता?" "मग अन्वय?" "लग्ना आधीच" माझे वाक्य पूर्णा व्हायच्या आतच तिची आई म्हणाली.
आता मी आठवड्यातुन एकदा तरी अदिति कडे जात असे. धंद्यालाही आता चांगलीच बरकत आली होती. अदितिच्या नेहमीच्या स्मिथहास्याच्या जागी आता हळू हळू हसू येऊ लागले होते. रंगने परत आपली जागा घेतली होती. गळ्यात आता एखादी चेन तरी असे. मी दिलेली कानातली आवर्जून कानात असत. हे सगळे पाहून एक दिवस मी तिला प्रपोज केले. "मी आता कुठल्याच रिलेशन मध्ये जाऊ इछीत नाही आय अॅम सॉरी " म्हणत ती कॉफी करायला निघून गेली. ह्या गोष्टीलाही आता वर्ष होत आले.. आणि आज अचानक . . . आज अचानकच अदितिने थोडी जवळीक दाखवली होती.
मोटरसायकलला कीक मारून निघालो. थोड अंतर पुढे जातोय तोच मागून कसला तरी गलका ऐकू आला...पकडा मारा पकडा मारा..काय आहे म्हणून मोटरसायकल स्लो केली आणि मागे बघतो तोच कोणी मोटरसायकल वर मागच्या सीट वर बसला.."चल पळव गाडी" असे तो ओरडत होता. मागे उघड्या तलवारी हातात नाचवत काही लोक पळत येत होते. गडबड गोंधळात गाडीचा गियर पडेना...गाडीही बंद पडली...गलका आता अगदी जवळ आला होता आणि अचानक माझ्या डोळ्या समोर अंधार झाला ..
सुन्न पणे अदिति हॉस्पिटल मध्ये बसली होती पोलिस इंस्पेक्टर आणि डॉक्टर समोरून येतांना दिसले म्हणून ती त्यांच्या कडे निघाली..कानावर डॉक्टरांचे वाक्य पडले ... "आय अॅम सॉरी इंस्पेक्टर प्राप्त परिस्थित ह्या पेक्ष्य जास्त काही करता येईल असे वाटत नाही...जखम गळ्या वर आहे आणि खोल आहे.. पेशंट जगणे मुश्किल आहे."
राहुलचे कळल्यावरही न रडणारी अदिति आज ओकसाबोक्षी रडत होती.. "आई आज मी दुसर्यांदा तुटले ग...दुसर्यांदा तुटले ..का बोलवलेस तू त्याला घरी? "
जबर्दस्त!
जबर्दस्त!
कथा जमली नाही असे वाटते.
कथा जमली नाही असे वाटते.
आवडली
आवडली
छोटीशीच आहे पण छान आहे.
छोटीशीच आहे पण छान आहे. पुलेशु