गेल्या महिन्यात श्रीशैलला
जाण्याचा योग आला. वाटेत कोणत्यातरी गावी आम्ही थांबलेलो (गावाचं नाव लक्षात नाहीय
आता. ) जिथे गाडी थांबवलेली होती, तिथेच शेजारी काही मुर्ती दिसल्या.
उत्सुकेपोटी थोडं पुढं
गेलो तर पाहीले की दुकानाच्या मागेच मुर्ती टाकण्याचं काम चालु आहे. मग न राहवुन त्यांच्याशी
बोललो. त्यांनीही मनमोकळेपणानं माहीती दिली.
एका पेक्षा एक मुर्ती
घडवल्या होत्या. काहींचं काम चालु होतं, तर काही पुर्णावस्थेत होत्या. काही मुर्त्यांना
शेवटचा हात चालु होता.
त्यातलंच एक शिल्प....
मी फोटो घेउ का विचारल्यावर
त्यांनी स्वतःहुन एक मुर्ती दाखवली. ती द्वारपालची
मुर्ती होती. आजुबाजुला पडलेला कचरा साफ करुन मुर्ती सुद्धा स्वच्छ करुन दिली.
नुकतीच पाउसाची सर
येउन गेल्याने मुर्ती निट दिसत नव्हती. त्यांना मुर्तीवर थोडं पाणी टाकता का विचारल्यावर
त्यांनी पळत जाउन बादलीभर पाणी आणलं आणि मुर्तीवर ओतलं. मुर्तीची सुबकता मला शब्दात
नाही मांडता येणार. तुम्हीच पाहून घ्या....
द्वारपालचा हा दुसरा
जोडीदार... यावर पाणि टाकले नसल्याने मुर्ती पांढरी दिसतेय.
मुर्ती कोरण्यासाठी
हव्या असलेल्या आकाराचा अखंड खडक शोधला जातो. ज्या आकारात मुर्ती कोरायची आहे त्या
आकारात त्याला छाटले जाते. नंतर मुर्तीचे अवयव ढोबळ पण मापात कोरले जातात. त्यासाठी
नको असलेला भाग छाटण्याकरीता कटरचा वापर करता.
अगदीच सुरवातीच्या
स्टेज मध्ये असलेली आणखीण एक मुर्ती ...
नंतर त्यावर छन्नी
हातोडी वापरुन आकारांना समरुपकता देता.
जशी जशी मुर्ती आकार
घेत जाते, तसं तसं त्यांचं काम मंदावतं, जोखीमीचं आणि नाजुक होत जातं. कारण चुकुन एक
छळका जरी उडाला तर ती पुर्ण मुर्ती बाद होते. त्याहुन वाईट म्हणजे आता पर्यंतचे त्या
मुर्तीवर घेतलेले कष्ट वाया जातात.
इथे मला कागदावर काढलेल्या
चित्रांना निट कान डोळे काढता येत नाही, आणि या कलाकारांनी तर दगडाला देव पण दिलेले...
मी तर एक एक मुर्ती डोळ्यात साठवन्याचा केविलवाना प्रयत्न करत होतो.
अपुर्णावस्थेतील आंजनेयाची मुर्ती. दक्षीणेकडे हनुमानाला आंजनेय म्हणतात.
आणि हि पुर्णावस्थेतील...
दगडी खांब कोरताना.
खांबावरील नक्षीतर
पाहण्याजोगे होते. एक छोटासा गणपती, एक मोर असं खुप काही होतं.
शेजारीच एकजण बालाजीच्या
मुर्तीचं काम करत होता. एक्दम तंद्रीत काम चालु होते त्याचे, मी फोटो काढतोय हे लक्षात
आल्यावर तो काम सोडुन उभाच राहीला. मलाच शरल्या सारखे वाटले. त्याला समजाउन सांगुन
त्याचं त्याचं काम चालु ठेवायला सांगितलं. तरीही तो, फोटो काढताना थोडं का होईना सरकुन
फोटो काढाय्ला वाव द्याय्चा.
हे त्याच्या कष्टाचं
चिज.....
हे त्यांचा छोट्याश्या
दुकाना मागचं अंगण जिथे सागळं काम चालतं.
म्हणतात ना टाकीचे
घाव सोसल्या शिवाय देवपण येत नाही. इथे तर देव देवतांसोबत इथे काही राजकारणीही आकार
घेत होते
स्टोन कटर.. (चित्रात
मागे ट्रॅक्टर दिसतो, त्यावरुन कटरच्या साईजचा आंदाज घ्यावा. )
- मल्लिनाथ करकंटी.
इथे पुर्वप्रकाशीत.
मल्ल्या, मस्तच रे
मल्ल्या, मस्तच रे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान प्रचि मल्ली
छान प्रचि मल्ली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बापरे..किती मेहनतीचं काम आहे
बापरे..किती मेहनतीचं काम आहे हे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुबक आहेत मूर्ती
छान रे..
छान रे..
छान माहिती
छान माहिती
सुंदरच. कलाकारांचे कष्ट आपण
सुंदरच. कलाकारांचे कष्ट आपण लक्षातच घेत नाही कधी.
या मूर्तींचे ग्राहक कोण असतात ? बहुतेक हॉटेल्स किंवा मोठे उद्योगपति असावेत.
पण मला नाही वाटत, हे कलाकार थेट ग्राहकांपर्यट पोहोचू शकत असतील.
कष्ट यांचे आणि फायदा मध्यस्तांचा असेच चित्र, या क्षेत्रातही असणार.
मस्तं प्रचि आणि माहिती..
मस्तं प्रचि आणि माहिती..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जबरदस्त ! माहितीपूर्ण आहे.
जबरदस्त !
माहितीपूर्ण आहे. या गावाचं नाव लक्षात नसेल तरी खूण सांगू शकाल का ? श्रीशैल पासून किती किमी आहे ? या गावाच्या आधी कुठलं मोठं किंवा प्रसिद्ध गाव आहे ? तिथून किती मिनिटांच्या अंतरावर ? कुठल्या रस्त्याने गेला होतात वगैरे. कदाचित जिज्ञासूंना या माहितीचा उपयोग होईल.
खरच काही काही कामांमागची
खरच काही काही कामांमागची मेहनत लक्षात येत नाही. सुंदर फोटो. व अशा मुर्ती घडवणार्या मेहेनती हातांना ________/\________
सुंदर फोटो. एक एक मुर्ती
सुंदर फोटो. एक एक मुर्ती घडवण्यात रमलेले कलाकार आणि दगडातुन साकार होत जाणारी मुर्ती, या सार्यांचे दर्शन घडवल्याबद्द्ल अनेक धन्यवाद!
मस्त!
मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्रीशैल म्हण्जे आंध्रात का???
श्रीशैल म्हण्जे आंध्रात का??? शिवाजी गोपुर पाहिले का तिथे??
कष्ट यांचे आणि फायदा
कष्ट यांचे आणि फायदा मध्यस्तांचा असेच चित्र, या क्षेत्रातही असणार.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
>> हो..हो.. अर्थात. कारागिरांना असे कितिसे पैसे मिळणार...
इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद!
इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद!
सुंदरच. कलाकारांचे कष्ट आपण
सुंदरच. कलाकारांचे कष्ट आपण लक्षातच घेत नाही कधी.
या मूर्तींचे ग्राहक कोण असतात ? बहुतेक हॉटेल्स किंवा मोठे उद्योगपति असावेत.
पण मला नाही वाटत, हे कलाकार थेट ग्राहकांपर्यट पोहोचू शकत असतील.
कष्ट यांचे आणि फायदा मध्यस्तांचा असेच चित्र, या क्षेत्रातही असणार.
दिनेशदा, अगदी अगदी.
ती जी द्वारपालाची मुर्ती आहे त्याची किंमत त्यांनी एक लाख सांगितले. ती मुर्ती पुर्ण करायला साधारण एक महीना वगैरे लागतो, त्या पेक्षा जास्त नाही असं समजलं. एवढी सुबक मुर्ती एवढ्या सवस्तात जात असेल तर बाकीचे मुर्तीचे असे किती पैसे येत असतील.
आणि त्यांचा कच्चा माल तरी काय, अखंड खडक, तोही हव्या त्या आकाराचा मिळायला हवा.
एकंदरीत कष्टाची खरी किंमत मिळत नाही असंच चित्र होते.
सेन्या, गोपुर पहाय्चे झाले
सेन्या, गोपुर पहाय्चे झाले नाही, पण जेव्हा गोपुर बाहेरून पाहीले, तेव्हा तु आठवलेलास.
च्यामारी आता हा मला शिव्या घालणार हाच विचार डोक्यात आलेला.. ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मस्त माहिती आणि फोटोही
मस्त माहिती आणि फोटोही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मल्ली फोटो मस्त काढले आहेत
मल्ली फोटो मस्त काढले आहेत रे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माहिती देखील उत्तम लिहिली आहेस.
स्वारपाल आणि सुरवातीच्या फोटोतील हनुमान मुर्ती पाहुन त्यांची कंबर छोटी केली आहे अस जाणवतं.
माहिती नि प्रचि चांगली रे
माहिती नि प्रचि चांगली रे मल्ल्या..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मल्ल्या मस्त माहिती...
मल्ल्या मस्त माहिती...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्रीशैलमच्या रस्त्यावर नाक्यानाक्यावर राजकारणी लोकांच्या मुर्ती दिसतात. त्याचे खरे कारण आता समजले :p
जियो मल्ल्या... मस्तच आलीत रे
जियो मल्ल्या...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच आलीत रे सगळे प्रचि, माहितीबद्दल आभार
छान माहिती आणि प्रचि
छान माहिती आणि प्रचि![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुपच छान माहिती व प्रचि.
खुपच छान माहिती व प्रचि.
सही रे मल्ल्या. सगळी प्रचि
सही रे मल्ल्या. सगळी प्रचि आणि माहिती आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर मुर्त्या छान फोटो आणि
सुंदर मुर्त्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान फोटो आणि माहिती ... इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद मल्ली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त. त्यांचं कोरिवकाम करत
मस्त.
त्यांचं कोरिवकाम करत असतात ते बघताना फार छान वाटतं.
खुप छान माहीती आणि तेव्ह्डेच
खुप छान माहीती आणि तेव्ह्डेच छान फोटो.
फोटो आणि माहिती दोन्ही छानच.
फोटो आणि माहिती दोन्ही छानच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदरच. कलाकारांचे कष्ट आपण लक्षातच घेत नाही कधी.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
या मूर्तींचे ग्राहक कोण असतात ? बहुतेक हॉटेल्स किंवा मोठे उद्योगपति असावेत.
पण मला नाही वाटत, हे कलाकार थेट ग्राहकांपर्यट पोहोचू शकत असतील.
कष्ट यांचे आणि फायदा मध्यस्तांचा असेच चित्र, या क्षेत्रातही असणार.>>>>>>दिनेशदा याचचं फार वाईट वाटत.
छान माहिती रे
छान माहिती रे
छान आहेत रे फोटो आणी माहीतीही
छान आहेत रे फोटो आणी माहीतीही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages