गतिमान 'जाणता राजा'
Submitted by DrSheetalAmte on 20 November, 2010 - 13:45
काल जाणता राजा हे नाटक पहिल्यांदा बघितले. त्यातील ते अतिभव्य सेट, अचाट कलाकुसर आणि कलावंतांचा काफिला बघताना मन हरवून गेले. बाबासाहेब पुरंदर्यांच्या कल्पनाशक्तीची कमाल वाटते. ज्याकाळी हे एवढे प्रचंड नाटक नुसते स्वप्नात डोळ्यांपुढे उभे करणे कठीन, तिथे त्या माणसाने ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवून दा़खवले. नुसते दाखवूनच नाही तर चालवूनही दाखवले आणि अजूनही शंभर वर्षे त्या नाटकाला मरण नाही.
गुलमोहर:
शेअर करा