महाराष्ट्रातील किल्ले ... गतवैभवाचे मानकरी ... आजचे भग्नावशेष ... !
संदर्भ ग्रंथ - 'सह्याद्री' - स. आ. जोगळेकर.
संदर्भ ग्रंथ - 'सह्याद्री' - स. आ. जोगळेकर.
१० नोव्हेंबर १६५९ रोजी झालेल्या अफझलखान वधाने हादरलेल्या आदिलशहाने दुप्पट मोठी फौज देऊन 'रुस्तुम-ए-जमा' याला पुन्हा मराठ्यांवर हल्ला करायला धाडले. त्याच्यासोबत होता बापाच्या वधाचा सूड उगवायला आलेला अफझलखानाचा मुलगा 'फाझलखान'. ह्या प्रचंड फौजेचा शिवरायांच्या नेतृत्वखाली पराभव करत मराठ्यांनी कोल्हापूर पावेतो मजल मारली आणि आदिलशाहीचा सर्वात बळकट असा 'पन्हाळगड' काबीज केला. खुद्द राजे मिरजेच्या किल्ल्याभोवती वेढा टाकून बसले. आता स्थिती अजून हाताबाहेर जायच्या आधी आदिलशहाने 'सिद्दी जोहर'ला त्याहूनही अधिक फौज देऊन मराठ्यांवर पाठवले.
आषाढ शुद्ध पौर्णिमा उर्फ़ गुरूपौर्णिमेच्या आदल्या रात्री शिवरायांनी पन्हाळ्यावरुन अद्भुतरित्या स्वतःची सुटका करून घेतली होती. तर गुरूपौर्णिमेच्या दिवशी घोड़खिंड बाजीप्रभुंच्या रक्ताने पावनखिंड बनली. अवघ्या २१ तासात ६४ किलोमीटर अंतर त्यांनी पार पाडले होते. या वर्षी गुरुपौर्णिमेला नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाला ३५० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने लिहिलेला हा लेख...
१६६५च्या मार्च महिन्यात शिवाजीराजे मराठा आरमाराची पहिली मोहीम संपवून गोकर्ण महाबळेश्वर येथे पोचले होते. मराठा हेरांनी पक्की बातमी आणली. मिर्झाराजा जयसिंग लाखभर फौज घेऊन स्वराज्यावर चालून येतोय. राजांनी घाईघाईने राजगड गाठला. औरंगाबादहून निघालेल्या शाही फौजा सासवडला पोचल्या होत्या. २९ मार्च रोजी पुरंदरला वेढा पडला. १५ दिवस घमासान लढाई झाली. १४ एप्रिल रोजी पुरंदरचा जोडकिल्ला वज्रगड मुघलांनी काबीज केला. आता अंतिम लढाई सुरु झाली होती. किल्लेदार मुरारबाजी यांनी जीवाची बाजी लावली. मराठा इतिहासामध्ये ते अमर झाले.