जायचे होते 'तुंग' पोचलो 'तिकोना'ला !!!

Submitted by MallinathK on 28 December, 2012 - 01:01

सकाळ सकाळी ६.३० ला जाग आल्यावर कंटाळा येण्यासारखं काय असतं? तेही शनिवारी? पण तरी कंटाळा आला.
मग काय, मित्राला फोन करुन विचारले 'जायचे का कुठेतरी ट्रेकला?'
पलीकडुन एकच शब्द ऐकु आला 'चल'. बिच्यार्याला झोपेतुन सुद्धा निट जागे होउ दिले नव्हते. Proud

त्याला ४ वाजता काम असल्याने इथे नको, तिथे नको, हे नाही, ते नाही करत, ३ पर्यंत कसंही करुन परत यायचे ठरवुन जायचे पक्के झाले. आता ३ पर्यंत परत यायचे म्हणुन ठिकाण तैलबैला नको, घनगड नको, तिकोणा मी आधीच केलाय म्हणत म्हणत तुंगला जायचे ठरले.

मग काय स्वार्या निघाल्या हुंदडायला...

वाटेत एक तलाव्/बंधारा लागला. नाव आठवत नाहीय, जाणकार पाणी आय मीन प्रकाश टाकतीलच म्हणा.

पण सरळ इच्छीत ठिकाणी पोहोचलो तर आम्ही भटके कसले. मित्राने शॉर्ट्कट म्हणुन कुठेतरी वळवले आणि आम्ही पोचलो तिकोण्याच्या पायथ्याशी. तुंग तिथुन अजुन ५-६ किमी दुर होते. खराब रस्त्यांमुळे गाडी चालवायचा कंटाळा म्हणुन 'तु तिकोणा पाहीलायस, मी नाही पाहीले, आज तिकोणाच करु, तुंग पुन्हा कधीतरी!' असं म्हणत त्याने गाडी तिकोण्याकडेच वळवली.

हा आम्हाला येताना भेटलेला तलाव/बंधारा...

१० मिनीटात गडावर पोहचता तुम्ही.

हा गडाचा दरवाजा... वेताळ दरवाजा !!!

हनुमान शिल्प

तिथुन पुढे गेल्यावर एक विहिर आणि गुहेतील तुळजादेवी मंदीर लागते.

तिथुन पुढे चालत गेल्यावर चुन्याची भट्टी लागते, त्याच्या पुढे गडाचा दुसरा दरवाजा लागतो.

दुसर्या दरवाज्यातुन आत गेल्यावर पायर्या लागतात. पावसाळ्यात या पायर्यांवर शेवाळं तर जमलेलं  अस्तंच, वर पाणीही वाहत असते. पण यावेळेस हिवाळ्यात जायचा योग आल्याने पायर्यांचे उघड दर्शन झाले.

गडाचा हा तिसरा दरवाजा. या दरवाजाची खासीयत अशी की आतल्या बाजुने हा दरवाजा दिसत नाही. गडाच्या आतल्या बाजुने पाहील्यास हा फक्त एक चौकोनी कट्टा असल्या सारखा दिसतो.

हा बालेकिल्ला...

             
गडावरील त्र्यंबकेश्वर मंदीर

गडावरील टहळणी बुरुज

टेहळणी बुरुजावरुन दिसणारा तुंग किल्ला

बाकी असेच काही...

 

- मल्लिनाथ करकंटी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रचि छान आहेत. वर्णन करताना हात दुखतात का?

दहा वर्षांपुर्वी पावसाळ्यात केला होता. आजही त्या आठवणी हिरव्या आहेत. Happy

प्रचि छान आहेत. वर्णन करताना हात दुखतात का?
अरे हापिसात एक तर माबो ब्लॉक्ड आहे. आणि त्यात उधारीच्या डोकोमोवर काम भागवतोय, कुठलं वर्णन करु अन काय करु Proud

मस्त!!!

मल्ल्या हा किल्ला आणी त्यावरच्या त्या पायर्‍या ह्याची मजा पावसाळ्यात जाम असते. शिवाय पावसाळ्यात बरेच हौशी फ्लोटर्स, रिबॉक, आदीदासला घसरगुंडी करताना बघुन आपला अ‍ॅक्शन लयी खदाखदा हसतो. Proud

फोटु मस्त. Happy

मस्तच....

अशा अचानक ठरलेल्या ट्रेकला जास्त मजा येते.....
आम्हीही असेच एकदा संध्याकाळी ७ ला पुण्यातून जायला निघालो. पिरंगुट च्या चौकात एक मित्र म्हणाला कि त्याने अजुन राजगड बघितला नाही म्हणून तिकडे जाऊ या. आम्ही तसेच तिकडून राजगड ला गेलो. रात्री १२ ला रायगडच्या पायथ्याला पोचलो, पहाटे ३ वाजता गडावर पोचलो. मस्त मजा आली. भन्नाट ट्रेक झाला......

आता सॉलीड स्वच्छता झालेली दिसतीये...आम्ही ३-४ वर्षांपूर्वी गेलो होतो तेव्हा जाम झाडोरा माजला होता...
तुंगचा फोटो फार अप्रतिम आला आहे....

सुरेख फोटो मल्ल्या!! reflections अप्रतिम आली आहेत!! Happy

वर्णन करताना हात दुखतात का?
>> Lol

सुर्रेख फोटो आहेत.

रच्याकने - ते ऑर्किड नाहीये (<< बाकी असेच काही मध्ये ऑर्किड चा फोटो ४ वेळा रिपीट झालाय का?>>) बोगनवेल आहे आपली नेहेमीची......

सर्वांचे आभार. Happy

आता सॉलीड स्वच्छता झालेली दिसतीये.>> अरे एका प्रतिष्ठानने सर्व स्वच्छता वै केली आहे.
होय, शिवाजी ट्रेल संस्थेने स्वछता केलीय. आणि किल्ल्याबद्दल माहीती देणारे फलक सुद्धा लावलेय. आम्ही गेलेलो तेव्हा सिमेंट वाळुचे पोती वाहुन नेण्याचे काम काही स्वयंसेवक करत होते.


मल्ल्या हा किल्ला आणी त्यावरच्या त्या पायर्‍या ह्याची मजा पावसाळ्यात जाम असते. शिवाय पावसाळ्यात बरेच हौशी फ्लोटर्स, रिबॉक, आदीदासला घसरगुंडी करताना बघुन आपला अ‍ॅक्शन लयी खदाखदा हसतो.

झक्या, पावसाळ्यात आम्हाला अ‍ॅक्शन, रिबॉक, आदीदास, आणि सँडल, चप्पल वगैरे सगळंच हातात घेउन चढावे लागलेले. नंतर तर वैतागुन पुढच्या वळणावर सोडुन अणवानीच गड हिंडलेलो आम्ही. Happy